माझ्याच जवळच्या माणसाने माझ्या मनाच्या हळव्या-दुखर्या वर्मावर वार केल्यावर..... यथावकाश मी अंतर्मुख झालो. या सगळ्या वेदनांचे पुढे काय होत असेल ? त्या कुठे जात असतील ?
माझ्या मनाच्या भिंतींवर, जागोजागी लटकणारी चित्रं मला आठवली.. त्यातली कुरुप बीभत्स चित्रं उघडीनागड्या लावसटींसारखी माझ्यावर धावुन येत होती, जणु त्यांचेच अस्तित्व त्या चार भिंतीत राज्य करते असे ठसवायचा प्रयत्न करत होती. वेदनांची अशीच कुरुप चित्रे होत असावीत. त्रस्त भिंतींनी या बटबटीत चित्रांना फिकट करायची विनवणी करत रहावी आणि त्या चित्रांनी भिंतींच्या हतबलतेवर कृरपणे खदाखदा हसावे.
त्या चित्रांवरच्या वेडावाकड्या रेघोट्या दरवेळी वेगवेगळी भाषा बोलतात, नवा अर्थ लावायला भाग पाडतात. त्यांचा उन्मत्त भडकपणा भिंतींना कोळपुन टाकतो, अव्ययाहत कोळपल्याने भिंतीनी तरी बेदरकारीचे पापुद्रे का धरु नयेत ? त्यांचा हिरवा रहाण्याचा अट्टहास दमछाक करवतो, थकवतो आणि कणाकणाने झिजवतो. अपेक्षाभंगाच्या जाणीवा, पराभूत होण्याची भिती यातून नवी चित्रे हळूहळू आकार घेतात. त्यांनाही वाचण्याचा आणि अर्थ लावण्याचा शाप माझ्या भाळी गोंदलेलाच असावा.
-
आनंदयात्री
प्रतिक्रिया
21 May 2011 - 12:58 am | सहज
थपाथपा थापलेस. बदाबदा फेकलेस. कानभर शेंदलेस.
लावसट म्हणजे काय?
खरच ते चित्रकार कॅनव्हासवर बदाबदा रंग फेकून नवचित्रनिर्मीती करतात तसे काहीसे वाटले.
21 May 2011 - 1:22 am | प्रचेतस
लावसट म्हणजे सरणावरची लहान मुलांची प्रेते खाणारी बाई. चू.भू.दे.घे.
21 May 2011 - 1:18 am | टारझन
आमचा आनंदयात्री म्हणजे भावनांचा एक जिवंत ज्वालामुखी आहे. तो खदखदत असतोच , पण जेंव्हा त्याचा धाग्यातून उद्रेक होतो , तेंव्हा हजारो मैल लांब त्याच्या झळा जाणवतात .. !
- डाखू ज्वालाप्रकाश
25 May 2011 - 9:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आनंदयात्री म्हणजे भावनांचा एक जिवंत ज्वालामुखी आहे. तो खदखदत असतोच ,
पण जरा अधिक तपशील आले पाहिजेत असे वाटले.
-दिलीप बिरुटे
21 May 2011 - 1:27 am | प्रचेतस
बर्याच दिवसांनी लिहिलेस पण लै भारी लिहिलेस.
21 May 2011 - 1:41 am | पिवळा डांबिस
इथे सहजशी सहमत! (या पापाबद्दल हे देवा तू मला माफ कर!!!:))
जरा जास्तच बर्बन मारून वरती कंग पाव चिकन खाऊन झोपलेल्या एफओबी ला जी भयावह स्वप्ने पडतील ती वर्णन केल्याप्रमाणे वरील लिखाण वाटलं...
:)
प्रस्तुत लेखकामध्ये यापेक्षा कितीतरी दमदार लिहिण्याची क्षमता आहे हे अनुभवाने ठाऊक आहे. वाचकांपर्यंत भावना पोहोचवण्याच्या दृष्टीने वरील लिखाण त्रोटक वाटलं.
स्पष्टोक्तीबद्दल मनःपूर्वक क्षमस्व. पुलेशु...
21 May 2011 - 8:20 pm | अलख निरंजन
डांबीसांशी सहमत आहे. कसला आगा ना पिछा..कसल्यातरी तारेतच लिहिल्यासारखे वाटत आहे.
श्री. टारझण ह्यांणी ह्याचे छाण विडंबण पाडूण आणंयांत्री ह्यांचे बोरडम घालवावे, म्हणजे अशा भिषण लेखणापासूण मिपाकरांणा सुटका होईल.
21 May 2011 - 9:06 pm | धनंजय
वाचावेच लागले. :-)
लेखकाच्या नावलौकिकाप्रमाणे हळवे आणि दुखरे.
(मला उपमांवर उपमांची लगड भावत नाहीत. ही बाब वैयक्तिक आवडीनिवडीची आहे. लावून घेऊ नये. मनातल्या व्यवहारांसाठी "भिंतीवरची चित्रे" ही उपमा. मग "भिंतीवरची चित्रे" यासाठी "लवासटींची" उपमा. भिंतीवरची चित्रे हळवेपणाने रंगवून त्या उपमेने मनःस्थिती खरी करण्याऐवजी आता लवासटींच्या कल्पनेत वाचक म्हणून भरकटलो.)
22 May 2011 - 9:53 am | तिमा
तुमच्या भन्नाट कॅलिडोस्कोपमधे माझे अनुभव घालून बघितले. त्यामुळे लिहिलेले सगळे जिवंत वाटले. एक विलक्षण अनुभव.
---- (म्हणुनच तिरशिंगराव झालेला) माणूसघाणे
22 May 2011 - 10:48 am | सुहास..
अर्थापर्यंत पोहोचल्याचा भास झाला की पोचलो ते कळेपर्यंत , लेखकाने धारण केलेले " टोपणनाव " आठवले . काही जखमा, मरेपर्यंत साथ देतात पण काही मने, त्या जखमा मुद्दामुन उकरुन काढत जिवंत ठेवतात. हे लेखण त्याच जखमांना आणि अविरत दुखी मनांना साक्षाकिंत ठेवुन स्वमनाची, त्यातील यातनेची, एक छोट्या श्या उलाढालीची , स्वताच्या च मनाने व मानाने केलेली 'उकल' असावी असे वाटते ,
झकास !
28 May 2011 - 6:38 am | गोगोल
असेच म्हणतो
22 May 2011 - 11:35 am | पैसा
आवडले आणि अनुभवले.
23 May 2011 - 4:00 pm | विसोबा खेचर
नेहमीप्रमाणेच क्लासिक..!
(आनंदयात्रीचा चाहता) तात्या.
23 May 2011 - 5:39 pm | मृगनयनी
आ.या. ... तू काय लिहिलेस.. ते 'कॉन्शस' माईन्डच्या नजरेतून बघितले.. पण नाही समजले... पण "सबकॉन्शस" माईन्ड्च्या दृष्टीकोनातून पाहिले.. तर ७० % समजले!......
पण मला नॉर्मल लेव्हल'ला इतकेच कळते की जगाच्या पाठीवर कुठेही एखाद्या ठिकाणी खड्डा पडला... तर दुसरीकडे मातीचा ढीग नक्कीच बनत असतो!!.... त्यामुळे एखाद्या जवळच्या व्यक्तीचे नख चुकुन तुझ्या एखाद्या जखमेला लागले.. तर कदाचित त्याला मलम लावण्यासाठी अनेक हात कापूस घेऊन कदाचित सज्ज असतील!!..
फक्त तू त्या "लासवटी"च्या कॅलिडोस्कोप्'मध्ये न अडकता..... त्या कापूसवाल्या हातांकडे बघ!...
कदाचित त्या औषध लावणार्यांच्या "इम्पॅक्ट"मध्ये येऊन "ते" तुझ्या जखमांना नखं लावणारे हातही नन्तर डेटॉलयुक्त्त कापूस घेऊन तुझी शुश्रूषा करतील!!! :) ... आणि मग तुझ्या कल्पनेतल्या त्या वेदनायुक्त लक्तरांच्या जागी कदाचित आनंदाचे उल्हसित तुषारकण असतील!! :) कारण चांगल्या माणसाना दिल्या गेलेल्या प्रत्येक शापाला "उ:शाप" हा असतोच्च! :)
चू. भू. दे. घे. :)
- नयनी. :)
23 May 2011 - 6:02 pm | नरेशकुमार
एखादा लेख वाचुन जर वाचकाचा जिव गेला तर जबाबदार कोन ?
याचे उत्तर मिळाल्याशिवाय No comments !
25 May 2011 - 4:39 pm | विजुभाऊ
अंद्या तू सध्या अरविंद गोखले वाचायला लागला आहेस का रे?
25 May 2011 - 5:15 pm | नितिन थत्ते
हे काय आहे?
शरदिनीतैंची कविता वाचल्यासारखं वाटलं.
25 May 2011 - 6:34 pm | धमाल मुलगा
आता कशाला हे विचार?