"आदर्श " सुंदर हाच आमचा बंगला

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
19 May 2011 - 12:52 pm

( चाल : असावा सुंदर चॉकलेटचा बंगला -)

"आदर्श " सुंदर हाच आमचा बंगला
सरकारी दरबारी 'कुणकुण 'ता चांगला !

ह्या आमच्या बंगल्याला संधीचं दार -
भेसळींच्या पोत्यातनं तिथून वसूल फार !

रोज रोज नोटांच्या ' पेटया ' दोन -
' आल्या आल्या ! '- म्हणायला, छोटासा फोन !

' बिस्किटां'च्या प्राप्तीवर जोर छानदार -
' परमिटां'च्या भांडणात फुल्ल हाल हाल !

खंडणी-खोरामागे बंदा हा रहातो,
मोठ्याशा फायलीशी लपाछपी खेळतो !

' उच्च उच्च डोक्यां-'चा खेळ रंगला ;
लफड्यांचा घोटाळा ' वर ' टांगला !

किती किती सुंदर हाच आमचा बंगला !
भूखंड लाटूनी छानछानसा बांधला !!

विडंबनमौजमजा

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

19 May 2011 - 10:12 pm | नरेशकुमार

हे हे हे. लय भारी !

अरुण मनोहर's picture

23 May 2011 - 8:18 am | अरुण मनोहर

आदर्शची व्याख्या बदलायला हवी!