सकाळची गोष्ट आहे,
साक्षीला एस.पी.च पोष्ट आहे.
अशीच एक रिक्षा,एम.८०ला येऊन धडकली,
सवयीनेच रिक्षा आधी,एम८०वाली भडकली...
काय रे मेल्या,कुठे बघतोस?डोळे तुझे फुटले का?
रागाऊ नका गोखलेकाकु,गाडीचे काही तुटले का?
खरंतर चुक काकुंचीच होती,अचानक ब्रेक मारलेला
पण, गर्दीनेही कल पाहुन,रिक्षावाल्याला धरलेला...
लांबुनच मी पाहात होतो,रिक्षातही १काकु होत्या...
कदाचीत त्याही 'अपटे' असाव्यात,कारण लांबुनच पाहात होत्या...
रिक्षावालाही भलताच शुर,पन्नास जणांशी लढत होता.
त्यामुळे काकुंचा आवाज,एरवी पेक्षा चढत होता.
माघार कोणिच घेईना,एवढ्यात कोणितरी पोलिस धाडला.
ह्यांचं भांडण लांबच,पोलिसाचाच अवाज वाढला....
चढ्या अवाजात पोलिस बोलला,ए...बाकिच्यांनी दूर व्हा...
मी मनात म्हणालो,अता पोलिसाचा डाव पहा...
चुक काकुंचीच होती,पण पोलिस रिक्षावर धावला.
काकुंनाही चुक कळली होती,पण त्यांना पोलिस पावला...
पोलिसानी मग शिताफीनी,दोघांचाही बोका केला.
दोन्ही कडलं लोणी खाऊन,यांच्या हाती तराजु दिला...
मग दोघं म्हणाले,पोलिसानी आपल्याला लुटलं...?
त्याचा फायदा झाल्यावर,आपलं भांडण सुटलं...
मग कशाला भांडत बसलो?समजुन घेतलं असतं तर?
म्हणुनच दोन वहानात,राखावं सुरक्षित अंतर.
पराग दिवेकर..........
प्रतिक्रिया
18 May 2011 - 6:32 am | मिसळलेला काव्यप्रेमी
कविता छान आहे.
अवांतरः
तुम्हाला आपटे म्हणायचे आहे कां?
हो का रे स्पावड्या? आमच्या वहिनी तिथे भांडत होत्या कां? ;)
18 May 2011 - 6:41 am | नगरीनिरंजन
मजेशीर आहे. :)
4 Sep 2013 - 2:27 pm | अभ्या..
कसली भारी कविता.
कसले भारी यमक.
.
>>>>>>राखावं सुरक्षित अंतर.
पराग दिवेकर.<<<<<<<
वा वा वा वा एकदम सुपर्ब :-D
4 Sep 2013 - 3:40 pm | अत्रुप्त आत्मा
अंतरा'वर बरच दुरून लक्ष गेलं की बे... तुझं! =))
4 Sep 2013 - 3:31 pm | प्रचेतस
वाह बुवा वाह...
प्रसंग अगदी डोळ्यांसमोर उभा केलात.
4 Sep 2013 - 4:59 pm | पैसा
बुवा, अॅक्टिव्हावर होतात का?
*yahoo*
4 Sep 2013 - 6:43 pm | अत्रुप्त आत्मा
नाय.... M80 ही गाडि जेंव्हा महिला वापरत होत्या,त्या भूत'काळातली ही जिल्बी आहे. :-D
4 Sep 2013 - 5:36 pm | मालोजीराव
बुवा हि कविता 'पुणे ट्राफिक' च्या फेसबुक पेज वर टाकायची परवानगी द्या
5 Sep 2013 - 8:32 am | अत्रुप्त आत्मा
टाकली. :)
4 Sep 2013 - 10:29 pm | अन्या दातार
चचाचे (लील्याचे) बंधू शोभलात खरे या कवितेत! ;)
5 Sep 2013 - 2:07 am | चित्रगुप्त
इतुके आले जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन
धुंदपणी त्या अंधपणी त्या भान राहिले नाही हे पण
इतुके आले जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन
__ इति मंगुअण्णा
5 Sep 2013 - 10:53 am | जेनी...
डोळ्यात पाणी आनलत गुर्जि !
वा ... एकदम वाच
:D