पु.ल. आणि अत्रे-एक दर्पण

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
9 May 2011 - 11:32 pm

ह्या कवितेच वर्गिकरण मि हास्य रसात केलय,पण मुलत: तो असला नसला तरि फारसा फरक पडणार नाहि.कारण हास्यरस हा या दोन माणसान्च्या व्यकक्तित्वाचा अविभाज्य घटक होता.दर्पण हे या कवितेच न्निवळ नाव नसुन तो खरच या कवितेचाहि स्वभावधर्म आहे...हास्यवेदाचार्य-आचार्य अत्रे आणि हास्ययज्ञनारायण-पु.ल.देशपान्डे...यान्ना अर्पण... १)कधि कधि मि पु. ल.न्चा,कधि कधि मि अत्र्यान्चा.प्रश्न उरतो मधे फक्त वेलान्ट्या आणि मात्रान्चा२)पु.ल.म्हणत भगवन्त ना,तो तुमच्या साथ आहे.अत्रे म्हणत भगवन्त ना,तो तुमच्या 'आत' आहे.३) म्हणजे पु.ल न्च खद्य हे,दहि आणि भात होते. तर अत्रे क्रुष्ण उपासक,ते गोपाळ काल्यात होते.४) त्या गोपाळाला काला सोडुन,,जगता कधि आलेच नाहि.तर हा गोपाळ मुळातच काल्यातला,त्याला काल्यानि सोडले नाहि.५)काला म्हणजे कला,कि कला म्हणजे काला?,जाउ दे ह्या कोड्याना,मि का करु कलकला?६)पु. लना विनोदाचि गोडि होति,तर अत्र्यान्ना खोडि होति.कहि का असेना शेवटि,एकच घोडागाडि होति७)पु.लना वाचक मिठि मारतात,तर अत्र्यान्ना घडतो सलाम.म्हणजे पुल ला(ई)फ बॉय साबण,तर अत्रे सणसणित हमाम.८)म्हणजे मि कुणाचा?दह्याचा कि हन्डिचा?अहो हे दोघ माझे,एरवि असतो कोण कुणाचा?९)विनोदाच्या कान्डिने,बसते कधि झुकान्डि.पण कधिच होत नाहि,वाट त्यान्चि एकान्गि १०)फटाक्यान्च्या माळाच या,सम्पल्या असे म्हणायचे.पण नाद दडलेले कनि,ते कसे सुटायचे?

हास्यकविता

प्रतिक्रिया

शुचि's picture

10 May 2011 - 12:38 am | शुचि

ही घ्या शुद्ध लेखनात -
_______________________
कधी कधी मी पु. लं.चा,
कधी कधी मी अत्र्यांचा.
प्रश्न उरतो मधे फक्त वेलांट्या
आणि मात्रांचा||१||
पु.ल.म्हणत भगवंत ना,
तो तुमच्या साथ आहे.
अत्रे म्हणत भगवंत ना,
तो तुमच्या 'आत' आहे.||२||
म्हणजे पु.लं च खाद्य हे,
दही आणि भात होते.
तर अत्रे कृष्ण उपासक,
ते गोपाळ काल्यात होते.||३||
त्या गोपाळाला काला सोडुन,
जगता कधी आलेच नाही.
तर हा गोपाळ मुळातच काल्यातला,
त्याला काल्यानी सोडले नाही||४||.
काला म्हणजे कला,
की कला म्हणजे काला?,
जाउ दे ह्या कोड्याना,
मी का करु कलकला?||५||
पु. लना विनोदाची गोडी होती,
तर अत्र्यांना खोडी होती.
काही का असेना शेवटी,
एकच घोडागाडी होती||६||
पु.लना वाचक मिठी मारतात,
तर अत्र्यान्ना घडतो सलाम.
म्हणजे पुल ला(ई)फ बॉय साबण,
तर अत्रे सणसणीत हमाम.||७||
म्हणजे मी कुणाचा?
दह्याचा कि हंडीचा?
अहो हे दोघ माझे,
एरवी असतो
कोण कुणाचा?||८||
विनोदाच्या कांडीने,
बसते कधि झुकांडी.
पण कधिच होत नाही,
वाट त्यांची एकांगी ||९||
फटाक्यांच्या माळाच या,
सम्पल्या असे म्हणायचे.
पण नाद दडलेले कानी,
ते कसे सुटायचे?||१०||
____________________________________

धी (dhee)
नी (nee)
कां(kaM)
सं (saM)

अत्रुप्त आत्मा's picture

10 May 2011 - 2:46 pm | अत्रुप्त आत्मा

पुनर्लेखना बद्दल धन्यवाद...ह्र्स्व पटकन कळत पण दीर्घ समजायला वेळ लागतो,हाही माझ्या नवीन कवितेचा विषय होउ शकतो...फक्त अनुस्वार कळत असुन वळत नव्हता,तोही कळला.आता फक्त ते एकाखाली एक ओळ कशी टाईप करायचि तेवढ कळल,कि झाल....आपण केलेल्या मदती बद्द्ल पुन्हा एकदा धन्यवाद...पराग दिवेकर.

अत्रुप्त आत्मा's picture

10 May 2011 - 2:52 pm | अत्रुप्त आत्मा

शुचि...पुर्न लेखनाबद्दल धन्यवाद...ह्र्स्व पटकन कळत पण दीर्घ समजायला वेळ लागतो,हाही माझ्या नवीन कवितेचा विषय होउ शकतो...फक्त अनुस्वार कळत असुन वळत नव्हता,तोही कळला.आता फक्त ते एकाखाली एक ओळ कशी टाईप करायचि तेवढ कळल,कि झाल....आपण केलेल्या मदती बद्द्ल पुन्हा एकदा धन्यवाद...पराग दिवेकर.

मस्त कविता.
शेवट खूप आवडला.

अत्रुप्त आत्मा's picture

10 May 2011 - 3:01 pm | अत्रुप्त आत्मा

धन्यवाद

अत्रुप्त आत्मा's picture

10 May 2011 - 3:01 pm | अत्रुप्त आत्मा

धन्यवाद

अत्रुप्त आत्मा's picture

10 May 2011 - 3:03 pm | अत्रुप्त आत्मा

धन्यवाद

अत्रुप्त आत्मा's picture

11 May 2011 - 1:17 am | अत्रुप्त आत्मा

आपल्या कविता वाचल्या,अवडल्याहि...ईतर मराठि संकेतस्थळांचि माहिती मिळाली...बरे वाटले...माझ्या कवितेला दिलेल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद...पराग दिवेकर.

मुलूखावेगळी's picture

10 May 2011 - 10:30 am | मुलूखावेगळी

छान आहे कविता.

सानिकास्वप्निल's picture

10 May 2011 - 1:36 pm | सानिकास्वप्निल

प्राजु म्हणते तसं शेवट खुप आवडला :)

नि३सोलपुरकर's picture

10 May 2011 - 1:57 pm | नि३सोलपुरकर

फटाक्यांच्या माळाच या,
सम्पल्या असे म्हणायचे.
पण नाद दडलेले कानी,
ते कसे सुटायचे?|

सुंदर......

ajay wankhede's picture

10 May 2011 - 7:34 pm | ajay wankhede

आवडली कविता

मृत्युन्जय's picture

10 May 2011 - 9:38 pm | मृत्युन्जय

छान आहे कविता. पुलेशु

अविनाशकुलकर्णी's picture

10 May 2011 - 11:42 pm | अविनाशकुलकर्णी

छान..... दोघेहि दैवते..
या वरुन एक विनोद आठवतो..
पु.ल च्या एका सभेला अत्रे अध्यक्ष होते..भाषणात म्हणाले..
पु.ल. म्हनजे प्रचंड साहित्य निर्मिति..
व मागे वळुन त्यांच्या कडे बघत म्हणाले..
ज्याच्या नावातच..पु..व ल.. दोनहि आहेत तिथे निर्मितिला काय कमी...

पाषाणभेद's picture

11 May 2011 - 2:03 am | पाषाणभेद

छान काव्य आहे.

पराग, मस्त कविता! दोघांच्याही स्वभावातला फरक आणि लेखनातला फरक छानरित्या मांडला आहे!!

पु.ल. आणि अत्रे ह्यांमधला फरक म्हणजे मला नेहेमी सँप्रास आणि आगासी किंवा शूमाकर आणि हॅकिनन मधे असणार्या फरकासारखा वाटतो! दोघेही तितकेच भारी पण दोघांची स्टाईल मात्र वेगळी!