नमस्कार,
चिंचवड येथे भटक्या विमुक्त मुलांसाठीचा एक प्रकल्प चालतो. त्याचे माहिती पत्रक मराठी मध्ये आहे. ते इंग्रजीतूनही असण्याची आता गरज भासत आहे. त्या संदर्भात मदत हवी आहे. मराठीतून असलेले पत्रक इंग्रजीत अनुवादित करायचे आहे.
ज्यांना आवड आणि सवड असेल त्यांनी कृपया मदत करा. पत्रकाची स्कॅन कॉपी मी पाठवू शकेन.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
5 May 2011 - 10:37 am | अन्या दातार
तयार आहे अनुवाद करुन देण्यासाठी. माझा ई-मेल आय डी व्यनि करत आहे.
5 May 2011 - 10:51 am | प्रचेतस
मी चिंचवडलाच राहत असल्याने प्रकल्पात सहभागी होउ इच्छितो, तरी कुठल्या प्रकारचा सहभाग अपेक्षित आहे ते कळवावे.
5 May 2011 - 11:02 am | गवि
सुदैवाने यशवंत एकनाथ हे व्यावसायिक इंग्रजी -मराठी किंवा मराठी - इंग्रजी अनुवादक मिपावर उपलब्ध आहेत.
आपल्या कार्यास शुभेच्छा..
5 May 2011 - 1:07 pm | गणेशा
माझे इंग्रजी कच्चे असल्याने आपल्यास मदत करू शकत नाही.. त्याबद्दल खेद वाटला..
आपल्या कार्यास शुभेच्छा
5 May 2011 - 1:43 pm | नरेशकुमार
आपल्या कार्यास शुभेच्छा
5 May 2011 - 4:37 pm | पिंगू
मितानताई तुझ्या कामाबद्दल थोडीशी मौलिक माहिती मिळाली आहे. तरी काही सहभाग लागल्यास अवश्य कळवावे.
- पिंगू
5 May 2011 - 9:32 pm | संपत
मी चिंचवडलाच राहत असल्याने प्रकल्पात सहभागी होउ इच्छितो. कृपया प्रकल्पाची अधिक माहिती द्यावी.
5 May 2011 - 10:58 pm | मितान
मित्रांनो धन्यवाद !
या प्रकल्पाविषयी लिहायला खरंच सवड मिळत नाहीये :( अनेकांना गप्पांमध्ये मी लिहिणार लिहिणार अशी आश्वासनेच दिली जातायत आणि ती पाळली न गेल्याने मलाच लाज वाटतेय.
असे असूनही इथे मदत मिळेल अशी खात्री होती. म्हणून आज धागा टाकला.
उद्या परवा मुले आपापल्या पालकांकडे जातील. त्यामुळे जून पर्यंत गुरुकुलात गजबज नसेल तरीही तुम्ही येऊ शकता.
पत्ता -
पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्
गावडे जलतरण तलावाजवळ, चापेकर शाळेच्या परिसरात. ( हा पोस्टल अॅड्रेस नाही. थेट येता यावे असा आहे.)
6 May 2011 - 8:18 pm | ५० फक्त
मी पण तयार आहे अनुवाद करुन देण्यासाठी. माझा ई-मेल आय डी व्यनि करत आहे.