Trace Evidence

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in कलादालन
4 May 2011 - 6:35 pm

'ट्रेस एव्हीडन्स' नामक चित्रप्रदर्शन वेव्हज आर्ट गॅलरी, पुणे, इथे शुक्रवारी सुरू होणार आहे. जानिस मिलीगन या कनेडीयन कलाकाराचं हे भारतातलं पहिलंच प्रदर्शन आहे.


प्रदर्शनातल्या एका चित्राचा फोटो. चित्राचं नाव: InterFERometry

शुक्रवार, ६ मे रोजी, संध्याकाळी ६-८ उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. १४ मे २०११ पर्यंत सकाळी १०:३० ते रात्री ८:०० पर्यंत (रविवार सोडून) प्रदर्शन खुले राहिल.
ठिकाणः वेव्हज आर्ट गॅलरी, B-२०४ परमार ट्रेड सेंटर, वासवानी चौक, पुणे.

जवळजवळ वीस वर्ष क्लिनीकल सायकॉलॉजिस्ट म्हणून काम केल्यानंतर जानिस मिलीगन चित्रकलेकडे वळल्या. चार वर्ष विद्यापीठात रितसर शिक्षण घेऊन आता जानिस लोह-ऑक्साईड (सामान्य भाषेत गंज) वापरून चित्र काढतात. फ्री लान्स आर्टीस्ट म्हणून काम करणार्‍या जानिस सध्या एन.सी.आर.ए., पुणे येथे "Artist in Residence" आहेत.

कला

प्रतिक्रिया

स्वाती दिनेश's picture

4 May 2011 - 6:39 pm | स्वाती दिनेश

गंज वापरुन चित्रे काढण्याची वेगळी, नॉवेल कल्पना वाटली..
प्रदर्शनासाठी शुभेच्छा!
जानिस यांची ओळख चित्रातून होईलच , तरीही त्यांचे एखादे प्रकाशचित्र डकवले तर छान होईल अदिती,
स्वाती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 May 2011 - 6:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"गंज वापरून चित्र" याबद्दल माझ्या कल्पना आधी थोड्या विचित्र होत्या. जानिस यांची पद्धत अशी की कापडावर लोखंडी पदार्थ गंजत ठेवायचे आणि त्याचा 'ट्रेस' कापडावर येतो. हातात ब्रश न घेताही एखादं चित्र पूर्ण होऊ शकतं. जानिस यांनी विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या वर्कशॉपमधे विद्यार्थ्यांनी बनवलेलं एक चित्र इथे डकवते आहे.

मी आत्ता नेमकी फिरतीवर असल्यामुळे संग्रहातले जानिस यांचे फोटो डकवता येणं कठीण आहे. त्यांच्याकडूनच एखादा फोटो मागून इथे डकवते.

स्वाती दिनेश's picture

4 May 2011 - 6:45 pm | स्वाती दिनेश

चित्र फार सुंदर आहे ग,
फोटो सावकाशीने डकव.
स्वाती

सूर्यपुत्र's picture

4 May 2011 - 7:11 pm | सूर्यपुत्र

खूपच छान आहे. :)

अवांतर : असेच जर बुद्धीला लागलेला गंज वापरुन चित्रं काढली तर.... ;)

-सूर्यपुत्र.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 May 2011 - 9:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

जानिस यांचं एक टॉक ऐकलं होतं. टॉक आणि त्यानंतर झालेल्या चर्चेचा काही भाग माझ्या शब्दांत.

गंज वापरून चित्र काढणे ही कला खूप पुरातन आहे. बुद्धीला गंज लागला तरी तो फार टाकाऊ नाही असं ही चित्र पाहून म्हणता येईल. ;-)

लोखंड हे सर्वात जास्त स्थिर मूलद्रव्य आहे. लोखंडाच्या अणूकेंद्रात आणखी प्रोटॉन्स समाविष्ट करून जड मूलद्रव्य बनण्यासाठी बाहेरून ऊर्जा द्यावी लागते. हायड्रोजनच्या अणूंपासून हेलियम बनताना ऊर्जा बाहेर पडते. तार्‍यांच्या केंद्रातलं इंधन संपत आलं की आत लोखंडी गाभा तयार व्हायला सुरूवात होते, ही तार्‍याच्या मृत्युची सुरूवात असते. आपल्याला जे लोखंड दिसत आहे ते जुन्या तार्‍यांच्या मृत्युमधून आलेलं आहे.

सदर प्रदर्शनासंदर्भात एक बातमी इथेही मिळाली.

रामदास's picture

4 May 2011 - 6:49 pm | रामदास

तळात असलेल्या जुन्या कापडावर अशी चित्रे दिसायची.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 May 2011 - 6:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

एकदम "रामदास काका" प्रतिसाद!

माझ्याकडे एक कापड होतं, बरेच दिवस कपाटात होतं तेव्हा कपाटाचा गंज त्याला लागला आणि मग ते फेकून द्यावं लागलं. अरेरे, ते ठेवलं असतं तर आज मी पण कलाकार म्हणून नाव कमावलं असतं!

आणि ट्रंकेतल्या वस्तूंना जुनाट वास यायचा तेही आठवले.
तो वाईट नसायचा पण त्यावेळी आवडत नसे.

छान कल्पना.. जमल्यास प्रदर्शन पाहीन.

सहज's picture

5 May 2011 - 6:21 am | सहज

व नक्की लिहा.

प्रीत-मोहर's picture

4 May 2011 - 10:58 pm | प्रीत-मोहर

मस्त!!!

ऋषिकेश's picture

5 May 2011 - 9:07 am | ऋषिकेश

मस्त कल्पना!

नरेशकुमार's picture

5 May 2011 - 5:00 pm | नरेशकुमार

लोखंड आनि गंज खुप भिति वाट्ते. हाताला लागलकि व्हायरस होतो.
चित्रे जपुन काढा. चित्रे समजली नाही. पन आवडली.

परिकथेतील राजकुमार's picture

5 May 2011 - 5:51 pm | परिकथेतील राजकुमार

मस्तच दिसतय हे.

बाकी अदिती हुच्चभ्रु होणार तर लवकरच.

धमाल मुलगा's picture

5 May 2011 - 6:14 pm | धमाल मुलगा

बरं दिसतंय खरं. काही कळलं नाही, पण बघायला चांगलं वाटलंय.

>>बाकी अदिती हुच्चभ्रु होणार तर लवकरच.
तुला प्रगल्भ म्हणायचंय का रे? :D

श्रावण मोडक's picture

6 May 2011 - 10:43 am | श्रावण मोडक

नाही. इथं 'कचऱ्यातून कला' असा प्रकार असल्याने हुच्चभ्रूच बरोबर. त्याच्या उलट असेल तर त्याला प्रगल्भ म्हणतात.
नाही पटत? मग एक उपक्रम घे हाती. प्रगल्भपणाचा दावा करणारे बरेच जण तुला माहिती आहेत. ते काय करतात हे पाहात जा. मग हा सिद्धांत ;) पटेल तुला. ;) कसे? :)

धमाल मुलगा's picture

6 May 2011 - 1:05 pm | धमाल मुलगा

थोडाथोडा ज्ञानप्रकाश पडतो आहे गुरुदेव. :D
'कलेचा कचरा' हा आविर्भाव नक्कीच आधुनिकोत्तर जाणिवांच्या उलट प्रवासाचा परिपाक असावा काय असा प्रश्न पडल्यावाचून राहिला नाही.

खरं तर गंज हा लौकिकार्थानं काही कचरा ठरावा असे वाटत नाही. योग्य वापराअभावी अचेतन किंवा अव्यवहार्य राहिलेल्या धातूचा तो यल्गार असावा असे वाटते मला नेहमीच. त्याचा सुयोग्य वापर करुन घेणार्‍या ह्या क्यानेडियन बाईंचं कौतुक करावं तेव्हढं थोडंच.
आणि हो, त्यांच्या ह्या सुंदर कार्याची ओळख इथे करुन देणार्‍या अदितीबाईंचेही आभार.

श्रावण मोडक's picture

6 May 2011 - 1:43 pm | श्रावण मोडक

खरं तर गंज हा लौकिकार्थानं काही कचरा ठरावा असे वाटत नाही. योग्य वापराअभावी अचेतन किंवा अव्यवहार्य राहिलेल्या धातूचा तो यल्गार असावा असे वाटते मला नेहमीच.

तुम्हाला वाटते. म्हणून तुम्हाला प्रगल्भ म्हटलेले नाही. :)

धमाल मुलगा's picture

6 May 2011 - 3:11 pm | धमाल मुलगा

वाचलो बुवा.

श्रावण मोडक's picture

6 May 2011 - 5:36 pm | श्रावण मोडक

आता भविष्यात 'समाज नावाची गुंतागुंतीची चीज' याबरोबरच 'कचऱ्यातून कला' आणि 'कलेचा कचरा' असे दोन शब्दप्रयोग ऐकायला मिळू लागतील... कसे? ;)

धमाल मुलगा's picture

6 May 2011 - 7:15 pm | धमाल मुलगा

म्हणजे हो?
वर्जिनॅलिटी कुडंय? ह्ये म्हंजी बिच्चार्‍या अल्ताफ राजाची गाणी गुलझारभौंनी चोरल्यागतच झालं की. :D

आनंदयात्री's picture

6 May 2011 - 10:54 pm | आनंदयात्री

>>योग्य वापराअभावी अचेतन किंवा अव्यवहार्य राहिलेल्या धातूचा तो यल्गार असावा असे वाटते मला नेहमीच.

हा हा हा .. लै भारी रे धम्या. थोडी कल्पनाशक्ती असेल तर "डुकराच्या जगण्यातील तत्वज्ञान" सुद्धा शोधता येईल ;)
लै भारी.

यावरुन एक गोष्ट आठवली (संदर्भ आठवत नाहीत)

एक चित्रकार असतो. आता कलाकार माणुस, शौक पाणी असणारच. या पठ्ठ्याला पान खायचा शौक. महाशयांचा रोजचा शिरस्ता म्हणजे सकाळी स्टुडिओ कम आर्ट गॅलरीत जाणे, चित्रे काढणे, आधी काढलेली चित्रे गिर्‍हाईकांना विकणे.
एके दिवशी त्याच्या स्टुडिओत एक श्रीमंत माणुस येणार असतो, काही चित्रे खरेदी करायचा त्याचा मानस असतो. नेमकी त्याच दिवशी चित्रकाराची सकाळी सकाळी बायकोबरोबर तणातणी होते, रागारागातच हा स्टुडिओत पोचतो. श्रीमंत माणुस अजुन यायचा असतो. तोवर काम करावे म्हणुन हा माणुस ब्रश हातात घेतो, दोन चार फराटे कॅनव्हासवर ओढतो, रागावुन कॅनव्हास फाडुन टाकतो. अजुनच चिडतो. भक्कम कात चुना लावलेले एक पान बनवतो आणि खातो. पुन्हा कामाला सुरुवात करतो, पण आज मन ठिक नसते, जे काढायचा प्रयत्न करतो ते बिघडत असते. शेवटी वैत्तागतो ... आणि शुभ्र कॅनव्हासवर पच्चकन थुंकतो आणि रागारागात स्टुडिओ बाहेर निघुन जातो.

थोड्या वेळाने त्याला त्याच्या स्टुडिओतल्या मदतनीसाचा फोन येतो, हा गेल्यावर श्रीमंत माणसाने ते चित्र 'मॉडर्न आर्ट' समजुन, ते चित्र चिकत घ्यायला कैक हजार डॉलर्सची ऑफर दिलेले असते.

----------------------------------------------------------------

गंजचित्रकारितेबद्दल नो ऑफेन्स मिन्ट .. वरचे गंजचित्र सुरेखच आहे.

राजेश घासकडवी's picture

9 May 2011 - 6:40 am | राजेश घासकडवी

वेगळं माध्यम, व त्यातून निर्माण होणारा परिणाम आवडला. चित्र पाहून का कोण जाणे आदिमानवांनी काढलेल्या गुंफामधल्या चित्रांची आठवण झाली. तशी चित्रं किंवा वारली शैलीतली चित्रं या माध्यमात उठून दिसतील असं वाटतं.

विजुभाऊ's picture

9 May 2011 - 6:55 am | विजुभाऊ

वा वा वा वा......आता माधवराव पटवर्धनाना सांगायला हवे त्यांच्या आर्ट स्टूडीओ ( कोण म्हणाला री की गॅरेज म्हणुन ) मधली मातीआणि मृद तेलाने बनलेले चित्रे असलेले उपवस्त्रांचे प्रदर्शन लावायला. त्यांचा गेल्या वीस वर्षाचा गाढा व्यासंग आहे.

चिंतातुर जंतू's picture

9 May 2011 - 12:07 pm | चिंतातुर जंतू

माहितीबद्दल धन्यवाद. प्रदर्शन छोटेखानी पण खूप चांगले आहे. कॅनव्हासवर गंजक्या वस्तूंचा गंज उतरतो तेव्हा वस्तूच्या आकारामुळे त्याचा कॅनव्हासवर आकार नक्की कसा येईल, याविषयी काहीशी कल्पना असते, पण वस्तू किती दिवस ठेवल्याने गंज कसा पसरेल आणि मूळच्या आकाराला कितपत रेखीव ठेवेल, याबाबत अनिश्चितता असते. वस्तूंच्या आकारावरून काही अनुमाने बांधून चित्रकर्तीने त्यांच्या रचना केल्या आहेत. जिथे मूळ वस्तूंचा आकार स्पष्ट रहातो, तिथे या रचना भौमितिक आकारांनी बनलेल्या दिसतात. मोन्द्रिआन या चित्रकाराच्या शैलीशी त्या रचनांचे असलेले नाते चित्रकर्ती मान्य करते. जेव्हा गंज कॅनव्हासवर आडवातिडवा पसरतो तेव्हा कापडावर पसरणार्‍या शाईच्या डागांप्रमाणे त्यातून अद्भुत रचना घडतात. त्या मूळ वस्तूंच्या रचनेशी काहीशी एकनिष्ठता दाखवत कॅनव्हासशी चांगलाच व्यभिचार करतात! चित्रकर्तीचे कौशल्य हे, की त्यातूनही जे निर्माण होते ते उत्स्फूर्त पण लयबद्ध अशा अमूर्त चित्रकलेच्या सौंदर्यानुभवानुसार किंवा गायकीतल्या लयकारीसारखा अभिजात आनंद देते.