मिपाचे कलादालन नेहमीच बहरलेले असते. मिपाकरांनी काढलेले सुरेख फोटो बघून मलाही स्फूर्ती झाली की आपणही फोटो काढून बघावेत. त्याच प्रयत्नात असताना केलेले काही प्रयोग इथे मांडतेय.
मला असलेलं फोटोग्राफीचं तंत्रज्ञान जवळपास शून्यच आहे. तीच स्थिती फोटोशॉप बद्दल! त्यामुळे जे कॅमेराने पाहिले तेच येथे दाखवले आहे. अज्ञानाचे आणखी प्रदर्शन करायचे झालेच तर मला यातल्या फुलांची नक्की नावंही माहिती नाहीत. जे सुंदर दिसलं त्याला टिपलं, एवढंच!
जाणकारांनी माहितीत भर घातल्यास उत्तम :)
प्रतिक्रिया
4 May 2011 - 3:35 pm | RUPALI POYEKAR
स्मिता खुपच छान आहेत फोटो
4 May 2011 - 4:34 pm | पियुशा
मला असलेलं फोटोग्राफीचं तंत्रज्ञान जवळपास शून्यच आहे
म्हनुनच फोटो इतके सुन्दर आले आहेत
मस्त ,भारि, लै आवड्ले मला :)
4 May 2011 - 6:41 pm | महेश काळे
शेवटुन दुसरा मला सगळ्यात जास्त आवडला..
धन्यु
4 May 2011 - 7:09 pm | गणेशा
अप्रतिम फोटो ... मस्त वाटले फोटो पाहुन ..
दवबिंदु असलेले लाल फुल खुप आवडले
4 May 2011 - 7:54 pm | यशोधरा
वरुन तिसरा आणि शेवटून दुसरा भारी आलेत :)
मस्त.
5 May 2011 - 10:53 am | नगरीनिरंजन
वरुन तिसरा आणि शेवटून दुसरा भारी आलेत.
शेवटून दुसरा पाहताना तर असं वाटतंय की मी भुंगा झालोय आणि आता त्या फुलावर बसणार आहे.
4 May 2011 - 8:48 pm | प्राजु
सुपर्ब!!
4 May 2011 - 9:01 pm | नीलकांत
काय सुंदर फोटो आले आहेत.
आधी तिसरा आवडला मग चौथा आवडला, पाचवा खासंच
खुप छान :)
4 May 2011 - 9:06 pm | शुचि
ते कृष्ण कमळासारखं लाल फूल कोणतं आहे?
4 May 2011 - 10:23 pm | ५० फक्त
ओ, हा प्रयत्न असेल तर ठरवुन काढलेले फोटो केवढे सुंदर असतील ह्याची कल्पनाच केलेली बरी.
4 May 2011 - 11:07 pm | अशोक पतिल
वा छान! कॅमेरा कोणता आहे ?
4 May 2011 - 11:26 pm | पैसा
विचार करत बसू नको. आपल्याला फोटो काढायला येतात की नाही याचा. असेच आणखी फोटो काढत चल!
4 May 2011 - 11:31 pm | प्रीत-मोहर
मस्त फोटो .. आव्दले :)
5 May 2011 - 8:26 am | टारझन
स्मिता.बेन फोटोवाला .. :) एक नंबर फोटुज .. :)
- टार्याभाई कमेंटवाला
5 May 2011 - 10:35 am | आनंद
खुपच छान काढले आहेत फोटो.
आणि ही फुल ज्यानी निर्माण केली त्या निर्मात्या समोर नतमस्तक!
5 May 2011 - 11:21 am | प्यारे१
माझा फटु काढायचा आहे. कधी येऊ?
(यांनी 'चमकवला' तर किमान बरा तरी येऊ शकेल)
5 May 2011 - 2:41 pm | स्मिता.
उत्साहवर्धक प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे मनापासून आभार!
शेवडून दुसरा फोटो माझाही आवडता आहे :)
शुचिताई, मला कोणत्याच फुलाचं नाव माहिती नाहिये :(
अशोकराव, SONY चा DSC-W320 कॅमेरा वापरला आहे.
प्यारे१, कधीही या हो फोटो काढायला... पण काढलेला फोटो तुम्ही सोबत घेऊन जाणारच याची गॅरंटी काय?
6 May 2011 - 10:48 am | प्यारे१
>>>>प्यारे१, कधीही या हो फोटो काढायला... पण काढलेला फोटो तुम्ही सोबत घेऊन जाणारच याची गॅरंटी काय?
अधोरेखित प्रश्नाचा काय रोख असू शकेल ते उमगले नाही.
निरागस पराला निरागसपणे विचारावे काय? ;)
6 May 2011 - 6:02 pm | स्मिता.
अधोरेखित प्रश्नाचा काय रोख असू शकेल ते उमगले नाही.
रोख-बिख काही नाही हो. मी ते अगदी सरळ लिहिलं होतं. मला वाटलं की मी काढलेला फोटो तुम्हाला आवडायचा नाही आणि तुम्ही तो नेणार नाही.
बाकी कुणाला काय विचारायचं ते तुमच्या जबाबदारीवर विचारा ;)
6 May 2011 - 10:09 am | पप्पू
खूप छान आलेत फोटो
परीक्षेत distinction ने पास
12 Jun 2011 - 10:08 pm | मॅन्ड्रेक
छान् ..