कलेला भाषेच्या सीमा अडवू शकत नाहीत हे पुन्हा सिद्ध होत असते. १ मे या एकाच दिवशी निर्मान झालेल्या गुजरात आणि महाराष्ट्र या शेजार्यांमध्ये केवल भौगोलीक नाही तर बर्याच गोष्टी समान आहेत.
संस्कृती,खाद्यपदर्थ लोकांचे स्वभाव , श्रिखंड , पुरणपोळी पोहे( गुजरातीत पौवा) सुरळीच्या वड्या( खाम्डवी) असे अनेक समान धागे आहेत.
पण या सगळ्याव्यतीरिक्त एक समान धागा गुजराती आण इमराठी भाषीकांच्यात समान आहे तो म्हणजे नाटक आणि रंगभूमीचे प्रेम.
मराठी रंगभूमीला १५० वर्षांची परंपरा आहे. तीच गोष्ट गुजराती रंगभूमीची..मराठी आणि गुजराथी नाट्य परंपरेला संस्कृत नाटकांचा वारसा लाभला
ज्या काळात बालगंधर्व, किर्लोस्कर नाटक कंपनी , गोविन्द बल्लाळ देवल यांनी मराठी रम्गभूमीला भक्कम पाया दिला अगदी त्याच काळात मदन थिएटर्स,देसी नाटक समाज तेच कार्य गुजराथी रंगभूमीवर करीत होते.
दोन्ही राज्यांची निर्मीती झाल्यानंतरचा गेल्या ५० वर्षाचा काल पाहिला तर आश्चर्यकाररित्या गुजराथी आनि मराठी रंगभूमीची धाव समांतरपणे झाले आहे.
गावोगावी होणार्या एकांकीका स्पर्धा नी नव्या मराठी रम्गभूमी चा पाया रचला. सिनेमा,टीव्ही सारख्या नव्या माध्यमांचे आव्हान समर्थपने पेलायला बळ दिले आहे.
पुरुषोत्तम करंडक ,राज्य नाट्य स्पर्धा , छबीलदास चळवळीने मराथी रंगभूमीला अनेक नव्या दमाचे समर्थ अभिनेते ,लेखक,दिग्दर्शक दिले. महेश एलकुंचवार , जब्बार पटेल, अतुल कुल्कर्णी , सतीश आळेकर ही नावे.
मुम्बई तील भारतीय विद्य भवन्स च्या स्पर्धा , आय एन टी च्या आंतर महाविद्यालयेन स्पर्धा नी गुजराथी रंगभूमी बबत हेच केले. या स्पर्धंमधून कांती मडीया , प्रबोध जोशी , परेश रावळ , मुकेश रावळ ,सुजाता मेहता , सिद्धार्थ रांदेरीया यांसारखी हिरे निर्माण केले.
साधारणतः १९६० च्या दशकात मराठी रंगभूमी वर बरेच बदल होत होते. जुन्या संगीत रंगभूमीचा जवळजवळ अस्तच झाला होता. नाटकाच्या संदर्भात नुसते तांत्रज्ञानातच नाही तर संहीतांच्या विषयांत सादरीकीकरणात बदल होत होए. लोकांच्या मानसीकतेतच बदल होत होते.
याच काळात गुजराथी रम्गभूमीदेखील अशाच संक्रमणातून जात होती.ज्येष्ठ गुजराथी रंगकर्मी कान्ती मडीया एक वेगळाच विचार केला. लोकानुनय आणी सवंग लोकप्रीयतेच्या फसव्या सापळ्यातून गुजराथी रंगभूमीला वाचवायचे असेल तर काही वेगळा माफ्ग अनुसरावा लागेल. या विचाराने ते झपाटून गेले.
मुम्बई ही नेहमीच गुजराथी आणि मराठी रंगभूमी साठी सांस्कृतीक राजधानी राहिली आहे. कान्ती मडीयांसाठी मराठी रंगभूमी हा नैसर्गीक पर्याय होता.
मो ग रांगणेकरांच्या नाट्य निकेतन मध्ये जाउ लागले. तेथे कान्ती मडीयांची गाठ पडली ती प्रभाकर पणशीकरांशी .
आणि गुजराथी रंगभुमीसाठी एक नवा अध्याय सुरु झाला. प्रभाकर पणशीकरानी मराठी नाट्यसंपदा मार्फत केलेली बहुतेक नाटके कान्ती मडीयानी गुजराथी नाट्यसंपदा मार्फत केली.
अशृंची झाली फुले , अखेरचा सवाल मला काही साम्गायचय , पुत्रकामेष्ठी , तो मी नव्हेच चा गुजराथी हुं ते नथीज हा सुपर हीट्ट अवतार होता.
ही बहुतेक नाटके मराठी प्रेक्षकवर्ग डोळ्यासमोर ठेवुन लिहीलेली होती. निर्मण केली होती. पण गुजराथी प्रक्षकाना सुद्धा त्यातली पात्रे ही गुजराथी समाजातीलच म्हणुनच भावली.
छेल चबीलो हा पुलंतेवधाचच्या तुझे आहे तुजपाशी चा गुजराथी अवतार तीच जादू करून गेला.
थोड्या वेगळ्या वीषयावर असलेल्या सतीश आळेकरांच्या बेगम बर्वे चा गुजराथी प्रयोग मास्टर फुलमणी हा अगदी चपखल पणे रंगला. गुजराथी प्रेक्षकाना त्याची नाळ पारशी थेअटर्स च्या जुन्या नाटकंशी जोडाविशी वाटली.
गुजराथी आनि मराठीतील नाटकांच्या कथावस्तु देखील अनेकवेळा समान असतात
पुलंचे " ती फुलराणी" आणि गुजराथी मधी "संतू रंगीली" ही दोन्ही नाटके पिग्मॅलीयन वर आधारीत आहेत. आत्रेंच्या मोरुची मावशी आनि गुजराथी "मनुनी मासी" यांचे विषय एकच आहेत.
" करायला गेलो एक" आणि गुजराथी " गुज्जु भाईये गाम गाजाव्या", मराटी नटसम्राट आणि गुजराथी अमारी दुनिया तमारी दुनिया , जागो मोहन प्यारे आणि गुजराथी पप्पु पास थई गयो , मराथी चूक भूल देणे घेणे आणि गुजराथी "जो जो वात बहार जाय नही" अशी एक ना अनेक नाटके गुजराथी आणि मराठीत समाईक उदाहरणे आहेत.
आई रीटायर होते हे गुजराथी मध्ये " बा रीटायर थाय छे" होऊन आले
या सर्वात गुजराथी आणि मराठी रसिकाना त्या नाटकातील पात्रे तितकीच आपल्या मातीतील वाटली.
आणि हीच गोष्ट आमच्या भाषा भले गुजराथी आणि मराठे अशा वेगवेगळ्या असतील पण आमची र्हदये एकाच तालात धडधड्तात हे सिद्ध करते.
प्रतिक्रिया
1 May 2011 - 9:00 am | रामदास
तारु लेखन गम्यु हो !
जरा घाईघाईत लिहीलेला लेख वाटला.
हवारनी उतावळ?
1 May 2011 - 4:41 pm | विनायक प्रभू
कळ्ळा.
1 May 2011 - 9:47 am | प्रभाकर पेठकर
विजूभाऊ,
मराठी आणि गुजराथी नाटकाच्या प्रवासाचा लेखाजोखा अभ्यासपूर्ण वाटला. अभिनंदन.
1 May 2011 - 5:07 pm | राही
गुजरातीतून मराठीत आलेल्या नाटकांपैकी दोन ठळक नावे आठवतात. एक आहे 'धुम्मस'. या २०/२५ वर्षांपूर्वीच्या नाटकात मूळ गुजरातीत प्रमुख भूमिका केलेल्या सरिता खटाव यांनीच मराठी धुम्मस मधेही प्रमुख भूमिका केली होती. दुसरे त्या मानाने अलीकडचे म्हणजे दिनकर जोषी यांचे 'प्रकाशनो पडछायो'. महात्मा गांधी आणि त्यांचे पुत्र हरिलाल यांच्यामधल्या गुंतागुंतीच्या नातेसंबंधांचे चित्रण करणारे हे नाटक मराठीत गांधी विरुद्ध गांधी या नावाने आले होते. या नाटकाने जोषी (ते आपले आडनाव असेच लिहितात) यांना खूप प्रशस्ती,कीर्ती,सन्मान मिळवून दिले.
अलीकडच्या गुजराती प्रायोगिक रंगभूमीवरचा लक्षात राहिलेला एकपात्री प्रयोग म्हणजे जैमिनी पाठक आणि रामू रामनाथन यांचा स्व. नारायणभाई देसाई(महादेवभाईंचे चिरंजीव)यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रावर आधारित प्रयोग. तीन/चार महिन्यांपूर्वी एनसीपीए मधे झालेला 'मीरा' ह्या थीम वरचा द्विपात्री प्रयोगही सुंदर होता.
आपल्या बालगंधर्वांप्रमाणे गुजरातीतही 'जयशंकर"सुंदरी" ' ही दंतकथेचा दर्जा प्राप्त झालेली व्यक्ती होऊन गेली. ते एका नाटकात 'गुणसुंदरी' या नावाची एक स्त्रीभूमिका इतकी सुंदर वठवीत की त्यांचे नावच जयशंकर सुंदरी पडले. ह्याच कथानकावर पुढे कित्येक दशकांनंतर सरस्वतीचंद्र या नावाचा चित्रपटही बनला.
1 May 2011 - 9:03 pm | रमताराम
ही सारी माहिती आम्हाला नवीन आहे. लै लै धन्यवाद.
जयशंकर सुंदरी यांच्याबद्दल मुद्रण माध्यम, जालावर वा इतरत्र कुठेही मराठी/हिंदी/इंग्रजी भाषांमधे लिहिले गेलेले असल्यास वाचायला, त्यांच्याबद्दल अधिक माहिती करून घेण्यास आवडेल. ते गद्य नट होते की गायक-नट, मुळात गुजराती रंगभूमीवर संगीत नाटक हा प्रकार कितपत प्रसिद्ध होता, त्यातील प्रसिद्ध गायक-नट कोण होते यावर अधिक प्रकाश टाकण्याची इनंती करतो आहे.
1 May 2011 - 10:02 am | चिरोटा
छान परिचय.
1 May 2011 - 10:08 am | ५० फक्त
ह्या बाजुनं कधी काही समोर आलंच नाही, आज पहिल्यांदाच कळाले छान वाटले वाचुन.
विजुभाउ तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला या दोन्ही भाषा येतात, समजतात. मजा आहे तुमची.
1 May 2011 - 11:07 am | आनंद
हे वन वे ट्राफीकच आहे की , गुजरातीतुन ही काही नाटक मराठीत आली आहेत?
1 May 2011 - 12:37 pm | प्रदीप
संगीत मराठी नाटकांचे प्रेरणास्थान पारशी रंगभूमि होती, असे वाचल्याचे स्मरते. तेव्हा दोन्ही पारंपारीक नाटकांत साम्य असल्याचे नवल नाही.
प्रायोगिक गुजराती रंगभूमिविषयी सविस्तर वाचावयास आवडले असते.
1 May 2011 - 12:59 pm | विजुभाऊ
हे वन वे ट्राफीकच आहे की , गुजरातीतुन ही काही नाटक मराठीत आली आहेत?
काही नव्या नाटकंची नावे आहेत. पण दुर्दैवाने हल्ली मराठी किंवा गुजराथी भाषेत नाटक सादर करताना मूळ लेखकाचा उल्लेख टाळला जातो. "पप्पू पास थी गयो" या नाटकाचे आणि सिद्धार्थ जाधवची भूमिका असलेले " जागो मोहन प्यारे" या नाटकाचे कथासूत्र अगदी समान आहे.
ऑल द बेस्ट नाटकाची संकल्पना प्रबोध जोशींच्या 'तीन बंदर" या जुन्या गुजराती एकांकीकेक्वर आधारीत आहे
अशी बरीच नाटके आहेत .पण कोणी कोणाकडून घेतले याबात गौप्य बाळगले आहे.
मला या लेखात त्या वादात पडायचे नाहिय्ये.
प्रायोगिक गुजराती रंगभूमिविषयी सविस्तर वाचावयास आवडले असते.
प्रायोगिक रंगभूमी ही प्रामुख्याने मुम्बई आणि अहमदाबादच्या परीसरात चालली.
त्यातही प्रबोध जोशीनी ४०० पेक्षाही जास्त एकांकिका लिहील्या. परेश रावळ , सुजाता मेहता , वगैरे प्रायोगीक रंगभूमीवरुनच उदयास आलेले आहेत.
८० च्या दशकात लेखकांच्या वर्क शॉप मधून बरेच प्रयोग झाले .आकंठ साबरमती , व्हिज्यूअल आर्ट सेन्टर , गॅरेज स्टुडिओ थिएटर या संस्थांनी लेखकांच्या वर्कशॉप चे प्रयोग केले
आता ही चलवल थंडावली आहे तरिही अधूनमधून अम्धायूग , मानवीनी भवई वगैरेंचे प्रयोग होत असातात गेल्या काही वर्षात दलीत थिएटर फेड इन थिएटर , बुधन थिएटर , जामनगर चे विरल रारछ. भावनगरमध्ये महेन्द्र परमार , राजकोत मध्ये शैलेष टेवाणी या सारखे ताज्या दमाचे लोक अनेक प्रयोग करत आहेत.
2 May 2011 - 1:13 pm | गणेशा
माहिती आवडली ..
आनखिन इतरही ही संस्कृतीविषय्क साम्य-फरकअभ्यासपुर्ण यावा अशी इच्छा ...
2 May 2011 - 6:03 pm | प्राजक्ता पवार
नवीन माहिती मिळाली , धन्यवाद .
2 May 2011 - 6:04 pm | प्राजक्ता पवार
नवीन माहिती मिळाली , धन्यवाद .