सवयीच्या तऱ्हा
सगळी माणस सारखीच म्हणजे हाती पायी सारखीच दिसायला पण प्रत्येकाचा चेहरा वेगळा, त्याच अंतरंग वेगळं,
त्याचा स्वभाव वेगळा, त्याच रंगरूप वेगळ इतकच काय प्रत्येकाच्या सवयीहि वेगवेगळ्या, माणूस एक सवयी अनेक व्यक्ती तितक्या प्रकृती तद्वत व्यक्ती तितक्या सवयी. आणि या सवयीतरी किती प्रकारच्या.सवय म्हटलं कि ती त्या माणसाच्या अंगवळणी पडते.
म्हणजे त्या माणसाची इच्छा असो अगर नसो ती गोष्ट त्याच्या हातून घडून जाते.
सवयीच्या नाना तर्हा आपल्याला पहायला मिळतात. जशा काही चांगल्या सवयी असतात तशा काही वाईटही
सवयी असतात. परन्तु चांगली सवय लागायला वेळ लागतो या उलट वाईट सवय चटकन लागते.
सवय म्हटली की ती सहजासहजी सुटत नाही. मग ती चांगली असो अगर वाईट.
एखाद्याची सवय कायमची लक्षात रहाते तर एखाद्याच्या सवयीचा दुसरयाला उपद्रव होतो.
कोणाला सकाळी लवकर उठायची सवय तर कोणाला रात्री जागायची सवय. कोणाला झोपेत बोलायची सवय
तर कोणाला नको ती इन्द्रिये खाजवायाची सवय तर कोणाला नुसतच डोक खाजवायाची सवय,
कोणाला वारंवार नाकाला हात लावण्याची सवय तर कोणाला बोलता बोलता डोळे मिचकावण्याची सवय.
कोणाला मध्ये मध्ये लुडबुडायची सवय तर कोणाला मूग गिळून बसण्याची सवय. कोणाला अति
कामाची सवय तर कोणाला काही न करता स्वस्थच राहण्याची सवय. कोणाला ओरडून घेण्याची
सवय तर कोणाला ओरडतच राहण्याची सवय. कोणाला टाळी देण्याची सवय तर कोणाला टाळी
घेण्याची सवय. कोणाला बोलता बोलता बर का बर का म्हणायची सवय तर कोणाला तर ना
तर ना म्हणायची सवय.
खाण्यापिण्याच्या सवयी तर अनेकांच्या अनेक असतात. कोणाला अंथरुणातच चहा प्यायची सवय
तर कोणाला चहा नंतर तंबाखू, सिगारेट्स प्यायची सवय. कोणाला चमचमीत खायची सवय तर
कोणाला झणझणीत खायची सवय तर कोणाला अगदीच मुळमुळीत खायची सवय. शेवटी माणूसच
तो सवयीचा गुलाम होऊन जातो.
अनिल आपटे
प्रतिक्रिया
29 Apr 2011 - 11:45 am | नरेशकुमार
छान निरिक्शन आहे.
29 Apr 2011 - 12:09 pm | ५० फक्त
२१ ओळीत ३६ वेळा सवय हा शब्द अगदि सवयिने आलाय, छान जमलंय मुक्तक. आता सवयीनं असेच छान छान लिखाण येउ द्या.
29 Apr 2011 - 2:47 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
छान निरिक्शन आहे. ;)
29 Apr 2011 - 10:25 pm | सुधीर१३७
.........एक करेक्शन आहे................. निरिक्शन नको हो, निरीक्षण............. :)
30 Apr 2011 - 12:21 am | पाषाणभेद
हं...हे तर एकदम छान निरीक्षण आहे.
30 Apr 2011 - 10:13 am | मृत्युन्जय
.........एक करेक्शन आहे................. निरीक्षण नको हो, निरिक्शन............. ;)
30 Apr 2011 - 9:58 am | शिल्पा ब
या लेखाचा पॉईंट काय आहे?
1 May 2011 - 12:05 am | पिवळा डांबिस
आपट्यांची सवय, दुसरं काय!!!!!
:)
30 Apr 2011 - 11:14 am | ५० फक्त
पॉईंट टु बी नोटेड मिलॉर्ड, की या लेखाचा पॉईंट काय आहे हे निरिक्शन किन्वा निरिक्षण करुन करेकश्न किंवा करेक्क्ष्ण करण्यात यावी ही नमर विननती.
2 May 2011 - 6:28 pm | हेरंब
सर्व वाचकांस, संपादक मंडळास व श्री आपटे यांस मी हे लक्षांत आणून देऊ इच्छितो की ह्याच विषयावरचा 'संवयी' हा लेख दि. २५/४/२००८ ला मी मिसळपाव वर लिहिला होता. ही त्याची कॉपी वाटत आहे.
11 Jun 2011 - 12:25 pm | अनिल आपटे
श्री हेरंब
मी मिसळपावचा सभासद ८/११/२०१० झालो . मी तुमचा २५.०४.२००८ चा लेख वाचला नाही
परंतु जर तसं साम्य असेल तर तो निव्वळ योगायोग समजावा.
अनिल आपटे
13 Jun 2011 - 12:24 pm | विजुभाऊ
हेरंब तुमच्या त्या लेखाची लिंक देता का?
11 Jun 2011 - 12:43 pm | दत्ता काळे
लिखाण 'पाठ केलेलं धडाधड म्हणून दाखवल्यासारखं' वाटलं. या लेखाचा पॉईंट काय आहे? हा नेमका विचार मलाही पडला.
13 Jun 2011 - 11:39 am | पांथस्थ
लेखनाची शैली मिपाचे एक सदस्य डॉ. श्रीराम दिवटे यांच्या शैलीशी साधर्म्य दर्शविते...
अवांतरः नको ते बोलायची आमची सवय काही सुटत नाही ;)