ये दौलतभी ले लो

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
26 Apr 2011 - 10:02 am

ये दौलत भी ले लो

गत दिनांची आठवण कोणाला येत नाही ? त्या दिवसांतील आठवणी निरनिराळ्या असतात. भर्तृहरि " सा रम्या नगरी महान स: नृपती.." म्हणेल व शेवटी "कालाय तस्मै नम:" म्हणून मोकळा होईल तर कोणाला पुण्यातील "बादशाही खानावळ " आठवेल. भवभुतीच्या उत्तर राम चरित्रातील राम व सीता यांना अयोध्येत, राजवाड्यात ऐषारामात असतांना सुद्धा वनवासातील झोपडीत गप्पा मारत कंठलेली रात्र आठवून " रात्रीरेव व्यंसरित " असे म्हणावे वाटेल. एखादा नभातील चंद्र पाहून "ती न आर्तता ऊरात ,," म्हणत दु:खाला वाट करून देत असेल तर दुसरा एकामेकावर उधळलेल्या फूलांची आठवण करत " गेले, ते दिन गेले " असे उसासे टाकत असेल. एखादे "प्रौढ लेकरू " खेड्यातील " घर कौलारू " आठवतो व ... आता या संदर्भात माहेरची आठवण काढणार्‍या सासुरवाशिणींच्या रम्य कविता तुमच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या असतील. काही आठवणी रम्य असतात व चालू रुक्ष जीवनांत थंडगार वार्‍याची झुळुक पसरवतात तर बहुतेक त्या काळीं काय गवसले ह्या पेक्षा काय गमावले याचीच जाणीव करून देऊन, भरल्या जखमेवरची खपली काढून, जणू हृदयातल्या सूप्त सलाला वाट करून देतात.

आज एक हिंदी कविता देत आहे. जगजीत-चित्रा यांनी गायलेली हे अतिशय लोकप्रीय गझल आहे. पण हे एक सुरेख भावगीतही आहे. आपला आवाज त्यांच्या इतका सुरेल नसला तरी स्वत:शी गुणगुणलात तर तुमच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आहेत असे तुम्हाला दिसून येईल. रसग्रहणात्मक काही लिहावे असे वाटत नाही पण एक नोंद अवष्य करीन की वर उल्लेखलेल्या कवितांत दु:ख असेल तर या कवितेत विष:णता आहे. गमावलेले जाणारच होते याची जाण आहे. ते जाणार हे अटळ होते व म्हणून दौलत, मानमतराब असल्या गोष्टींच्या बदल्यात "ते" परत मिळावे ही केविलवाणी विनवणी आहे.

ये दौलत भी ले लो ये शोहरत भी ले लो
भले छीन लो मुझसे मेरी जवानी
मगर मुझसे लौटा दो वोह बचपन का सावन
वो कागज की कश्ती वोह बारिश का पानी

महल्ले की सब से निशानी पुरानी
वोह बुढिया जिसे बच्चे कहते थे नानी
वोह नानी की बातों में परियों का डेरा
वोह चेहरे की झुरियों में सदियों का फेरा
भुलाए नही भूल सकता है कोई
वोह छोटी से रातें वोह लम्बी कहानी
वोह कागज की कश्ती ...

कडी धूप में अपने घर से निकलना
वोह चिडिया वोह बुलबुल वोह तितली पकडना
वोह गुडिया की शादी पर लडना झगडना
वोह झुलों से गिरना वोह गिरकर संभलना
वोह पिपल की छइयों के प्यारे से झोके
वोह टूटी हुई चूडियों की निशानी
वोह कागज की कश्ती ...

कभी रेत के उंचे टीलों पे जाना
घरोंदे बनाना बना कर मिटाना
वोह मासूम चाहत की तस्वीर अपनी
वोह ख्वाबो खिलौनों की जागीर अपनी
न दुनिया का गम था न रिशों के बंधन
बडी खुबसुरत थी वोह जिंदगानी
ये दौलत भी ले लो ये शोहरत बी भी ले लो
भले छीन लो मुझसे मेरी जवानी
मगर मुझको लौटा दो ....

( जर कोणाला जालावरून हे गाणे द्यावयाचे असेल तर कृपया जगजीत-चित्रा यांचे जुगलगीतच द्या, एकट्या जगजीतचे यु ट्युबवरील live programa चे नको.)

शरद

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

26 Apr 2011 - 1:48 pm | क्रान्ति

आस्वाद! खूप खूप आर्त गीत आहे हे! जवळजवळ प्रत्येकालाच आपलं काहीतरी हरवलंय, ते गवसावं असं वाटत रहातं, ते वाटणं या गाण्यातून उत्कटतेनं व्यक्त झालंय.

गाणं अप्रतिमच आहे वादच नाही. वर क्रांतीताईंनी म्हटल्याप्रमाणे फार आर्त गाणं आहे.
___________
पण थोडा वेगळा विचार -
मी नेहमी माझ्या एका मित्राशी वाद घालायचे की बालपण हाच सर्वात भाग्याचा काळ असतो. कारण बालपणी स्वप्न, आशा, कोवळीक असते. मनाची उभारी, विश्वास असतो. मला परत बालपण मिळालं तर किती मजा येईल.
वोह मासूम चाहत की तस्वीर अपनी
वोह ख्वाबो खिलौनों की जागीर अपनी
न दुनिया का गम था न रिशों के बंधन

पण माझा मित्र नेहमी म्हणत असे तू नीट विचार करशील तर - "बालपण हा खूप परावलंबी आणि "कुर्‍हाडीला धार लावण्याचा" काळ असतो. भविष्याची अनिश्चितता, परावलंबन, इतर सर्व बलाने/बुद्धीने वरीष्ठ असणे असे बरेच मुद्दे हे आपल्या विरोधात असतात. मला तरी बालपण परत आलेले आवडणार नाही"

हळूहळू मला त्याचे म्हणणे बरेच पटले.

प्राजु's picture

26 Apr 2011 - 7:36 pm | प्राजु

गाणं.. नो डाऊट अप्रतिम आहे. पण सुरूवात जी केली आहेस ना त्याला तोड नाही. सुंदर आस्वाद!! असेच आणखीही गाण्यांबद्दल येऊद्यात.

मिलिंद's picture

26 Apr 2011 - 8:27 pm | मिलिंद

हा दुवा पहा जरा... हे जुगलगीतच वाटतय.
http://www.youtube.com/watch?v=rrh-bwgtqAo

धमाल मुलगा's picture

26 Apr 2011 - 8:29 pm | धमाल मुलगा

गाणं तर गाणं, पण मला जास्त भावलं ते ह्या गाण्याच्या अनुशंगानं मांडलेलं मुक्तक.
फारच सुरेख.

....गाण्याच्या अनुशंगानं मांडलेलं मुक्तक.

धम्याचा प्रगल्भ होण्याचा आधुनिकोत्तर प्रवास सुरू झालाय तर! ;-)
असो, भावनांशी सहमत! Nostalgia is not what it used to be! :P

- मनिष

प्यारे१'s picture

29 Apr 2011 - 9:55 am | प्यारे१

सहमतीवर सहमती. धमुच्या धपु(???) होण्याबद्दलही.

राजेश घासकडवी's picture

27 Apr 2011 - 12:27 am | राजेश घासकडवी

कागदाची होडी आणि पावसाचं पाणी या प्रतिमेशी बहुतेक भारतीय नातं सांगू शकतात. त्यात ती वाहून गेलेली होडी, तिचं नक्की काय झालं? ती गेली कुठे? आणि आता ते पाणी तरी कुठे आहे? असे प्रश्न उपस्थित करतात. त्यांनी गायलेलं ते युगलगीत फारच सुंदर आहे. लाइव्ह मैफिलीतल्या एकट्याच्या गाण्याला तितकी मजा नाही हे खरंच. कधी कधी ते रंगवणं जरा अंगावर येतं.

ज्ञानेश...'s picture

27 Apr 2011 - 12:39 am | ज्ञानेश...

गाणे सुरेख, आणि परिचयही.
साधारण अशीच भावना असलेले जगजितचे आणखी एक गाणे मला फार आवडते-

"मुझको यकीं है सच कहती थी, जो भी अम्मी कहती थी..
जब मेरे बचपन के दिन थे, चांद में परियां रहती थी
"

आणि यातल्या काही ओळी-

"एक ये दिन जब अपनोंनेही हमसे नाता तोड दिया..
एक वो दिन जब पेडकी शाखें बोझ हमारा सहती थी
"

लाजवाब !

मदनबाण's picture

29 Apr 2011 - 8:21 am | मदनबाण

वा...इतकी सुंदर कविता इथे दिल्या बद्धल धन्यवाद... :)

मदनबाण's picture

29 Apr 2011 - 8:24 am | मदनबाण

***

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Apr 2011 - 9:16 am | ज्ञानोबाचे पैजार

तुम्हाला मी नेहमीच आवडीने वाचत असतो. पण आज माझ्या एका अतिशय आवडत्या गाण्याचे इतके सुंदर रसग्रहण वाचताना वेगळाच आनंद मिळाला.
पुलेशु.