चांदण्यांस मिठी मारतांना
चंद्रास गोड का वाटत असेल?
त्यास आलिंगनात भरतांना
रात्रीस मोह का आवरत असेल?
दिवस उजाडुच नये कधी
वाटत तिला ही असेल
मोहक चंद्रा च्या पाशातुन सुटतांना
जीव तारकांचा का आवळत असेल?
चंद्रा च्या कुशी खालून
अलगद पदर खेचून पहाटे
आंथरुणातून उतरत रात्र जेंव्हा असेल
सुटलेल्या केसांमधुनी
लाज आवरत पदरा खालील
मन तिचे का बांवरत नसेल?
मधु-चंद्र काय असावे
चंद्रास का ते कळत असेल?
रोजच असते रात्र त्याचीच
मोह मिलना चे का उमगत असेल?
चांदण्यांस मिठी मारतांना
चंद्रास गोड का वाटत असेल?
चंद्रास आलिंगनात भरतांना
रात्रीस मोह का आवरत असेल?
प्रतिक्रिया
13 Apr 2011 - 10:10 am | मिसळलेला काव्यप्रेमी
छान प्रयत्न....
14 Apr 2011 - 3:24 pm | टारझन
जमतंय जमतंय ... प्रयत्न करत रहा ... सफाई येईल हळु हळु
13 Apr 2011 - 9:52 pm | गणेशा
चंद्रा च्या कुशी खालून
अलगद पदर खेचून पहाटे
आंथरुणातून उतरत रात्र जेंव्हा असेल
सुटलेल्या केसांमधुनी
लाज आवरत पदरा खालील
मन तिचे का बांवरत नसेल?
विशेष आवडले ..
अवांतर : तुमच्या कवितेतील भावना .. कलप्ना सुंदर असतात ..
वरती रात्र बोलतेय अशी कविता असती तर वरील कडवे अजुनच सुंदर झाले असते आणि संपुर्ण कविताच एक वेगळ्या विश्वात गेली असते असे मला वाटले
तरी ही कविता रात्रीच्या माध्यमातुन वाचली.. थोडेशे बदल करुन खरेच खुप छान ..
एक उत्तर वरील कडव्यासाठी लिहिण्याचा प्रयत्न करतो .. चंद्राच्या माध्यमातुन बघु जमतोय का .. आवडेल ना लिहिलेले?
13 Apr 2011 - 9:53 pm | गणेशा
सोडताना मिठी अलगद तुझी
चांदण्यांचा पदर तुझा ढळुनी गेला
सोडविताना केस कुंतलाचा गुंता
सूर्यकिरणांचा ही मोह गळुनी गेला
- गणेशा
ऑफिस मधुन जातो आहे... उद्या जमले तर लिहितो पुढे .. तुम्ही लिहा नाहितर पुढे...
धन्यवाद
13 Apr 2011 - 11:04 pm | निनाव
गणेशा:
व्वाह्ह .. कित्ती सुंदर लिहिले आहे... मस्तच.. परत परत वाचल्या त्या ओळी.. मस्तच..
अर्थात कविता लिहितांना जसे येत गेले, लिहित गेलो... पण तुम्ही म्हणालात तसे, रात्र ही जर किरदार असेल तर जास्त सुंदर झाले अस्ते काव्य... आणिक तुम्ही तर अगदी सिद्धच करून दाखविले आहे.. :)
असेच सुचवत चला.. खूप बरे वाटले...
मी पुन्हा हा विषय लिहिण्याचा प्रयत्न नक्कि करेन.. तुम्ही इतुके प्रेरित केले आहे तर हे करावेच लागेल.. पण कविता कधि उतरेल मनातुन अजुन नेमके सांगता येत नाहि :).
-आ. विनम्न,
निनाव.
14 Apr 2011 - 2:25 pm | गणेशा
तुम्ही नक्कीच लिहा .. खरेच छान होयीलच याची मला खात्री आहेच.
रात्र चंद्राच्या कुशीतुन सुटताना पदर खेचते हळुच ही कलप्ना खरेच सुंदर आहे...
तुम्ही रात्र बनुन लिहा ... आपल्याला रात्र कशी वाटली या पेक्शा रात्र आणि प्रेयशी यांच्या मनाची गुंफण खरेच सुखावह होईलच ...
आनि फक्त तुमच्या कलप्नांनाच मी चंद्राच्या रुपाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.. आत्ताच आलोय .. लिहितो जमल्यास पुढे..
तुमच्या रात्रीचा प्रियकर चंद्र मस्त वाटेल लिहायला.. तुम्ही लवकर लिहा मात्र मी उत्सुक आहे वाचायला..
14 Apr 2011 - 3:04 pm | गणेशा
सोडताना मिठी अलगद तुझी
चांदण्यांचा पदर तुझा ढळुनी गेला
सोडविताना केस कुंतलाचा गुंता
कोवळ्या सूर्याचा ही मोह गळुनी गेला
गच्च पदर हळुवार ओढताना
निशब्द गारव्याची किनकिन
लाजेच्या केसरी रंगात न्हाहुनी
तव भाळी या चद्रमाचा कुमकुम
स्पर्श मखमली कातरवेळी
बावरलेला तव देह चंदणी
पुन्हा मिठीत गर्द ओल्या
गंध दरवळला माझ्या मनी ..
- चंद्र
15 Apr 2011 - 4:24 am | निनाव
प्रिय गणेशा,
तुमच्या शब्दां एवढे शब्द कोष अजुन श्रीमंत नाहित माझे. तेन्व्हा माझ्या कुवती प्रमाणे प्रयत्न केला आहे. लिहायला हे नक्किच आवडले तुम्ही सांगितल्या प्रंमाणे. आशा करतो आवडेल तुम्हास. इथल्या शिवाय एक स्वतंत्र कविता महणून देखिल प्रकाशित केली आहे. तुमच्या उत्सुकतेला पुर्ण न्याय देईल अशी उम्मीद बाळगतो. निराशित केले असेल तर पहिलेच क्षमा मागतो.
- आ. निनाव.
****
आले आहे पुन्हा सख्या रे
मिठीत तुझ्या आज पाहा रे
आवरे मोह मज न अधिक आता
पडदा तारकांचा पडू दे ना रे...
निजले जग, निजले तारे
अंतर असे हे मिटले सारे
माझ्या कुशीत तु उजळला अधिकच
तुझ्या आलिंगनात मज लाज ना रे
विझले कधी मी मलाच कळेना
तुझ्या कुशीतुन पदर सुटेना
उलगडली वेणी, उलगडले अशी मी
तुझ्या डोळ्यांत मज बघवेना रे
आले विरह ते किरणांचे मज
कलह मनाचा काही शमेना
दरवळते अजुनी तुझ्या श्वासांचे गंध,
पडेल तारकांचा पुन्हा पडदा ना रे?
आले आहे पुन्हा सख्या रे
मिठीत तुझ्या आज पाहा रे
न आवरे मोह मज अधिक आता
पडू दे तारकांचा पडदा ना रे...
15 Apr 2011 - 2:40 am | निनाव
अप्रतीम!!!!!!! वेगळीच उंची मिळाली काव्यास.
स्पर्श मखमली कातरवेळी
बावरलेला तव देह चंदणी
पुन्हा मिठीत गर्द ओल्या
गंध दरवळला माझ्या मनी ..
काय भन्नाट लिहिले आहे. मला अजुन अशक्यच आहे ह्या उंची वर जाण्यास !!! - जाहिर कबुली. :).
व्वाह..
पुन्हा मिठीत गर्द ओल्या
गंध दरवळला माझ्या मनी .. ... जबरा!!
नवकविता जन्म घेते आहे.. थोडं वेळ द्या. :)
15 Apr 2011 - 5:29 am | नरेशकुमार
खुप छान.
सकाळच्या गुलाबी थंडीची आठवन झाली.