आज ह्या वर्षाचा तुला भेटल्या-नंतरचा पहिला पाऊस..
बघना कसा छळतो..
तुझी आठवण ह्या मनात मेघांसारखी दाटून आणतो..
तुझी सोबत सुटल्याच्या वास्तविकतेला,
डोळ्यातून पाणी म्हणून बरसण्यास भाग पाडतो..
मग मीही साथ देते त्याला..
मी अन तो पाऊस..
आता एकत्र बरसतो..
अन सोबतीला... तुझी आठवण !!
उगीच काही थेंब तो शिंपडतो माझ्यावर..
जणू तुझ्याच स्पर्शाची ती जाणीव..
मोहरते मी.. कधी नुसतीच बहरते..
तुझ्या स्वाधीन व्हायला तयार.. सर्वस्वी..
नाही.. तुझ्या आठवणींच्याच म्हण की ..
तू नसतोस.. फ़क़्त माझ्या जाणीवेतला तुझा तो स्पर्श..
तूझं ते कानात गुपित सांगणं..
गुपित असं काही नसायचंच कधी..
तूझा तो एक बहाणा.. जवळ यायचा... नेहमीचाच !!
एक शिरशिरी येते..
मज भानावर आणते..
असाच वेळ जातो..
तो बाहेर बरसत असतो.. मी आत...
खिडकीला डोकं टेकून उभी... त्याला बघत..
अन सोबतीला .. तुझी आठवण !! ....
तो थांबवतो बरसणं ..
कि हारतो माझ्यापुढे ?
शेवटी मागे उरते फ़क़्त.. तुझी आठवण !! ....
डोळ्यातलं तसंच खिळलेलं पाणी ..
अन् तुझ्या आठवणींना गच्च मिठीत घेतलेली मी !!
--वैशाली
प्रतिक्रिया
12 Apr 2011 - 7:50 pm | जातीवंत भटका
खूप सहज शब्दात व्यक्त केलं आहे... सुंदर ...
वाचून माझ्याच काही जुन्या ओळी स्मरल्या ..
मी रडताना गालावर
ओघळली स्वप्ने होती ...
गात्रागात्रांतून माझ्या
थरथरला श्रावण होता ...
वेडा कवी.
12 Apr 2011 - 7:59 pm | गणेशा
स्वगत -मुक्तक जबरदस्त ...
बरसतानाही हरलेला पाऊस मस्तच ओळ आहे ही ...
मस्तच ..
12 Apr 2011 - 11:54 pm | प्राजु
सुरेख मुक्तक.
13 Apr 2011 - 11:30 am | sneharani
सुरेख! मस्तच!!
13 Apr 2011 - 7:12 pm | वैशाली .
धन्यवाद !! :)
13 Apr 2011 - 7:17 pm | नन्दादीप
सुंदर.... मस्त...!!!!
14 Apr 2011 - 4:14 pm | प्राजक्ता पवार
सुरेख !