मंडळी,
टारूशेटच्या भाषेत शिवशक्ती-भिमशक्ती एक झाल्या नंतरचा आमचा हा पहिला प्रयत्न. पहिलाच प्रयत्न असल्याने काही चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करा.
असो तर मिपा वरील सुप्रसिध्द बल्लवाचार्य गणपाशेटने यावेळेस एक अफलातून व्हेज पदार्थ दिलेला आहे. त्याचे नाव आहे:
"फ्लॉवर इन चीज सॉस"
साहित्यः
फ्लॉवर १/२ किलो.
चीज.
२ मोठे चमचे मैदा.
१ लहान चमचा मस्टर्ड सॉस.
१ कप दुध.
लाल तिखटं, काळीमीरी पुड.
सजावटीसाठी : काळे ऑलिव्ह मोठे आणि छोटे, गाजराच्या चकत्या, क्रिम चीज.
कृती:
फ्लॉवरचे छोटे (बाईट साइझ) तुकडे करुन घ्यावे.
१/४ कप दुधात पाणी टाकुन त्यात हे तुकडे शिजवुन घ्यावे. नंतर वरुन मीठ भुरभुरुन बाजुला ठेवुन द्या.
चीज सॉस.
पॅनमध्ये २ चमचे ऑलिव्हच्या तेलात मैदा खरपुस परतुन घ्यावा.
आच बंद करुन वरुन थोडं थोडं दुध टाकुन मिश्रण एकजीव करावं. गुठळ्या होउ देउ नयेत.
नंतर त्यात चीज टाकुन परत ढवळावं.
चीज वितळलं की मग त्यात चवी नुसार मीठ, लाल तिखटं, काळीमीरी पुड,मस्टर्ड सॉस टाकुन मंद आचेवर २-३ मीनिटं ढवळावं.
फ्लॉवरचे तुकडे या सॉस मध्ये घोळवुन वरुन थोडं लाल तिखट भुरभुरुन, ओव्हन मध्ये ग्रील मोडवर (फक्त वरुन झळ लागेल असं) ५-१० मीनिटं ठेवा.
या सोबत पिणेकरांची (पुणेकरांची नाही याची नोंद घ्यावी, उगाच पंचाईत व्हायची आणि धाग्याचा खरडफळा व्हायचा) सोय म्हणून माझे या वेळेचे कॉकटेल आहे "वेंग वेंग" (Weng Weng).
साहित्य:
- १/२ औंस स्कॉच व्हिस्की
- १/२ औंस व्होडका
- १/२ औंस ब्रँडी
- १/२ औंस बर्बॉन (Bourbon)
- १/२ औंस टकिला
- २ औंस अननसाचा रस
- २ औंस संत्र्याचा रस
- चमचाभर लिंबाचा रस
- १ चमचा ग्रॅनडाइन
- बर्फ
- सजावटी साठी लिंबाचे काप, चेरी, स्ट्रॉ इ. इ. इ.
कृती:
शेकर मध्ये बर्फाचे खडे घ्या. त्यात अननसाचा आणि संत्र्याचा रस घाला त्यावर सगळी मद्ये ओता आणि चांगले एक मिनीटभर शेक करा. तयार झालेले मिश्रण एका मोठ्या ग्लासमध्ये ओतून घ्या. त्यात ग्रॅनडाइन अलगद सोडा. असा अलगद रस सोडायचा असेल तर एक चमचा घेऊन त्याच्या एका टोकावरून रस ओघळून ग्लासात आतल्या बाजूला अगदी चिकटून सोडा.
आता या कॉकटेलला सजवण्यासाठी लिंबाचा/संत्र्याचा काप ग्लासच्या कडेला अडकवा. त्यावर टूथपिकने चेरी लावा (मी छोटी छत्री वापरली आहे). जर एखाददुसरे फॅन्सी स्ट्रॉ असतील तर त्या ग्लासमध्ये ठेवा.
तर लोकहो लज्जतदार "फ्लॉवर इन चीज सॉस" आणि त्या सोबत "वेंग वेंग" कॉकटेल तयार आहे. हो जाओ शूरू!!!
डिस्क्लेमरः
१. सूरापानासाठी किमान २१ (की १८?) वर्षे वय असणे गरजेचे आहे अथवा हे कायदे प्रत्येक देश/राज्यावर अवलंबून आहेत.
२. अल्कोहोलचे सेवन आपापल्या जबाबदारीवर करावे.
धन्यवाद...
प्रतिक्रिया
9 Apr 2011 - 10:09 am | नंदन
शिवशक्ती-भीमशक्तीचा विजय असो!
9 Apr 2011 - 4:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
विजय असो, विजय असो, विजय असो!
10 Apr 2011 - 10:41 am | ऋषिकेश
त्रिवार विजय असो! :)
17 Apr 2011 - 1:12 am | भवानी तीर्थंकर
हाsssssय, मार डाला!
9 Apr 2011 - 10:11 am | बबलु
जबरा !!!!
तोंपासु.
जियो !!
9 Apr 2011 - 10:31 am | प्रास
सजावटीमध्ये म्हणजे आपलं गार्निशिंग हो, गणपारावांचा हात कुणीच धरू शकत नाही या निर्णयाप्रत वरचे पेंग्विन्स बघून आलेलो आहे. हे फ्लॉवर इन चीज सॉस नक्कीच करून बघण्यासारखं आहे.
नाटक्यारावांचे कॉकटेल दिसायला भारी आहे पण मदिरापान वर्ज्य असल्याने क्षमाप्रार्थी.
थोडक्यात लगे रहो भाईलोक......! :-)
9 Apr 2011 - 11:13 am | शिल्पा ब
मस्त. खुप चीझी असल्याने कदाचीत करणार नाही किंवा केले तर फारसं खाल्लं जाणार नाही.
कॉकटेल करायला सांगते माझ्या नवर्याला. :)
9 Apr 2011 - 11:49 am | दीविरा
दोन्ही प्रकार छान नेहमीप्रमाणे :)
फोटो तर झकास
पेंग्विन्सची पंगत तर वा वा
9 Apr 2011 - 12:22 pm | भडकमकर मास्तर
अहाहा.. मस्त
दोन्ही प्रकार झकास
9 Apr 2011 - 12:37 pm | सहज
शिवशक्ती व भीमशक्ती पॅनेलचा कट्टर समर्थक
बम्बबम भोले!!!!!!
9 Apr 2011 - 12:51 pm | परिकथेतील राजकुमार
मिपाकरांना भिषण परिणामांना सामोरे जायला लावणारी युती ;)
9 Apr 2011 - 4:00 pm | सानिकास्वप्निल
फ्लॉवर इन चीज सॉस नक्कीच करून बघेन आणी पेंग्विन्स सुद्धा:)
वेंग वेंग तर सहीच आहे ...मस्तः)
9 Apr 2011 - 4:49 pm | sneharani
मस्तच! खासकरून ते पेंग्विन...सुंदर दिसतायेत!
9 Apr 2011 - 5:07 pm | रेवती
पेय छान दिसतय आणि गणपाची पाकृ म्हणजे काही बोलायलाच नको.
पाकृच्या सजावटीतील पेंग्वीन्स क्युट आहेत.
9 Apr 2011 - 5:53 pm | ५० फक्त
मास्तर गणपा, माझ्या आग्रहाला लक्षात ठेवुन व्हेज पाक्रु दिल्याबद्दल धन्यवाद, नाट्क्याभाउंचं कॉकटेल पण छान असेल पण दारु पित नाही त्यामुळं मत नोंदवु शकत नाही.
9 Apr 2011 - 6:22 pm | प्राजु
फ्लॉवर जबरा दिसतोय.
करेन लवकरच.
पेयाबद्दल.. नो कॉमेंट्स! सजावट छान आहे दोन्हीची.
9 Apr 2011 - 9:30 pm | शहराजाद
झकास कॉम्बिनेशन. पेय खूप आकर्षक दिसतय. भाजीचे पेंग्विनही मस्त.
असाच काहीसा सॉस माझ्या मुलाला पास्ताबरोबर आवडतो. फक्त त्यात पीठ अगदी चमचाभर आणि बाकी चीज असतं. ह्या पाकृप्रमाणे फ्लॉवरचे बारीक तुकडे चीजसॉसमधे लपवून देऊन बघेन. त्यानिमित्तने भाज्या खाऊ लागला तर गणपाभौ धन्यवाद हो तुम्हाला.
10 Apr 2011 - 12:30 am | चिंतामणी
जबरदस्त डब्बल धमाकान्ये ठार मेलो.
10 Apr 2011 - 3:48 am | सुनील
दिसतेय तर झक्कास!
पण साहित्यात रम नसताना फोटोत बकार्डी दिसतेय ती कशी?
10 Apr 2011 - 6:26 am | मराठे
हायला! डबल धमाका!!! खल्लास
10 Apr 2011 - 7:03 am | विंजिनेर
मस्त. लगे रहो!
10 Apr 2011 - 10:48 am | स्वाती दिनेश
गणपा + नाटक्या यांच्या 'खानपान' युतीच्या 'डबल मजा' ची सुरुवात एकदम झकास...
स्वाती
10 Apr 2011 - 6:36 pm | सखी
सही कॉम्बिनेशन आहे तुमच्या जोडगोळीचे आणि नेटक्या, दिमाखदार पाकृकृतींचे. अजुन येऊ द्यात.
नाटक्या खूप दिवसांनी तुमचीही पाकृ आल्याने छान वाटले. फक्त छान पेये बघुन मी मद्यपान घ्यायला सुरुवात करेन की काय अशी भीती वाटते - हीच भीती एरवी गणपाच्या नॉनव्हेज पाकृ वाचतानाही वाटते.
10 Apr 2011 - 6:56 pm | स्मिता.
फ्लॉवर इन चीज आणि वेंग वेंग दोन्ही पण मस्तच! लगेच करायची इच्छा झालीये.
ऑलिव्हस् चे पेंग्वीन तर फारच गोड दिसतायेत.
मनातः आधीच गणपा त्यात नाटक्याचा प्याला ;)
16 Apr 2011 - 10:13 am | खादाड
करुन पाहिन नक्किच
17 Apr 2011 - 2:01 am | माझीही शॅम्पेन
आज माझ्या नावाला साजेश्या धागयवर येवुन धन्य झालो !!! लगे राहो डबल ढमाका !!!
17 Apr 2011 - 9:38 am | पिंगू
बारच फुटला... :)
- पिंगू