धर्मांतरण

विश्वास कल्याणकर's picture
विश्वास कल्याणकर in जनातलं, मनातलं
6 Apr 2011 - 1:33 pm

भारतातील अज्ञानी लोकांना एकुलत्या एका देवाच्या उपासनेस प्रवृत्त केल्याबद्दल भारत सरकारने फादर जॉन्सन यांचा सत्कार केला होता. भारतात १० वर्षापर्यंत धर्मप्रसाराचे काम केल्यानंतर ते अमेरिकेला परतले. ह्युस्टन येथे फादर जॉन्सनची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनीच व्यक्त केलेली ही मते.: श्री संदीप कुलकर्णी यांनी सांस्कृतिक वार्तापत्राच्या २६ जानेवारी २०११ च्या अंकात केलेला हा मराठी अनुवाद निश्चीतच वाचनिय म्हणुन साभार देत आहे.
फादर जॉन्सन तुम्ही भारतात १० वर्षे होता. भारत तुम्हाला कसा वाटला?

भारत हा भिन्न प्रवृत्तींचा देश आहे. सर्वात मोठी लोकशाहि, उगवती आर्थिक महासत्ता, जगातील दोन क्रमांकाची शास्त्रज्ञांचि भुमी आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी पंधरा टक्के लोकसंख्येची, सध्या अस्तित्वात असलेली एकमेव पुरातन संस्कृती आहे. जेव्हा युरोप अंधकारमय काळात होता आणि अमेरिकेचा शोधही लागलेला नव्हता, तेव्हा भारत हा सर्वात प्रगत आणि आधुनिक राष्ट्र होते. ज्ञान, तत्वज्ञान , विज्ञान, गणित, कला, खगोलशास्त्र या सारख्या विषयात जगाच्या तुलनेत भारताची प्रगती २५ टक्के अधिक झाली होती.

एरीस्टॉटलच्या पुर्वी एक हजार वर्षे पृथ्वी गोल आहे, हा सिध्दांत वैदिक महात्म्यांनी मांडला होता. गुरुत्वाकर्षणाने सर्व ब्र॑म्हांड एकत्र राहिले आहे, हा शोध, पायथागोरसच्या अगोदर दोन हजार वर्षापूर्वी उत्तर भारतातील तर्वज्ञांनी लावला होता. जेव्हा ग्रीक लोक पृथ्वी सपाट आहे असे मानत होते, तेव्हा पृथ्वी वर्तुळाकार असल्याचे संस्कृत ग्रंथात लिहिले होते. पृथ्वीचे आयुष्य ४.३ अब्ज वर्षे असावे असे भारतीय शास्त्रज्ञांनी पाचव्या शतकातच सांगितले होते. असा इतिहास डिक तेरसी या अमेरिकन लेखकाच्या लॉस्ट डिस्कव्हरीज या ग्रंथात लिहिलेला आहे. सर्व तर्‍हेची समृध्दी असूनही भारताने कधीही दुसर्‍या देशावर आक्रमण केले नाही. उलट परकीय आक्रमणकर्त्यांनी भारतावर आक्रमण केले आणी राज्यही केले. प्रथम मुस्लीमांनी आणि नंतर ब्रिटीशांनी सुमारे हजार वर्षे भारतावर राज्य केले. जेव्हा ब्रिटीश भारतात आले तेव्हा भारत एक सर्वात श्रीमंत देश होता. या समृध्दीनेच ब्रिटीशांना आकर्षुन घेतले होते. येथील समृध्दी इथल्या हिंदूनीच निर्माण केली होती.

धर्म म्हणून हिंदुत्वाबद्दल आपले मत काय?

हिंदुत्वाला तत्वज्ञानाचा आणि आध्यात्मिक परंपरेचा दीर्घकाळाचा वारसा लाभला आहे. या परंपरेने पाश्चात्य शास्त्रज्ञ, तत्ववेत्ते यांच्यासह सर्व जगाला भुरळ घातली. हिंदू धर्माचे ९०० दशलक्ष अनुयायी आहेत. देवाची अनेक रुपे असून सर्व हिंदू एकाच चिरंतन परमात्म्याची आराधना करतात. ज्यू, मुस्लीम, किंवा ख्रिश्चनांप्रमाणे एक प्रेषित आणि एक धर्मग्रंथाचा हिंदू धर्माला आधार नाही. हिंदू धर्म सर्वात सहिष्णु आहे. इस्त्रायलच्या निर्मिती पूर्वी फक्त भारतातच ज्यू धर्मीय सुरक्षित होते.

भारत हा देणार्‍यांचा देश आहे. जगातील उच्च धर्मीयांच्या अर्धे जण भारतीय वंशाचे आहेत.

तुमचे त्याबद्दलचे मत काय?

भारताने हिंदू, बौध्द, शीख आणि जैन या धर्मांना जन्म दिला आहे. हिंदूंनी धर्माच्या आधारावर कधीही युध्द केले नाही. सर्व धर्मांना समान न्यायाची वागणूक देणे, हिंदूच्या स्वभावातच आहे.

मग भारतीयांचे धर्मांतर घडविण्याची गरज कां भासते?
आपणा पाश्चात्यांवर जगाला ख्रिश्चन करण्याचे एक दडपण असते. ख्रिस्ताचा संदेश सर्वदूर पोहोचवायची आपल्याला इच्छा असते. ख्रिश्चन धर्म न मानणारे नरकात जाणार असे आपण मानत असतो. जेंव्हा पोप भारतात गेले होते, तेव्हा ते म्हणाले होते, पहिल्या सहस्त्रकात युरोपात ख्रिश्चैनीटी रुजली, दुसर्‍या सहस्त्रकात अमेरिका आणि आफ्रीकेत ख्रिश्चनिटी पसरली. तिसर्‍या सहस्त्रकात उर्वरित जगात आणि भारतात ख्रिश्चनीटी रुजावी अशी आपण प्रार्थना करुयात.

तुम्ही भारतावर लक्ष केंद्रित का करता आहात?
भारतीय हिंदू, हे शांत आणि सहिष्णु प्रवृत्तीचे आहेत. कायदा आणि न्यायाचे पालन ते करतात. या सदगुणांमुळेच हिंदू नागरी संस्कृती अस्तित्वात आहे. असे कोणत्याही मुस्लिम देशाबद्दल किवा कम्युनिस्ट चीनबद्दल म्हटले जाऊ शकत नाही. सर्व धर्म एकसमान आहेत असे हिंदू समजतात, म्हणून भारत धर्मांतरासाठी योग्य देश आहे.

तुमचा निधी कोठून येतो?
अमेरिका, जर्मनी, ब्रिटन इटली आणि नेदरलैंड हे पाच प्रमुख देश धर्मांतराच्या कामासाटी निधी पुरवतात. गेल्या दशकात परदेशी संघटनांना २.५ अब्ज डॉलरपर्यंत निधी मिळाला होता. भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या आकडेवारी वरुनच ही अधिकृत माहिती मिळाली. परदेशातून येणार्‍या देणग्यापैकी ८० टक्के निधी, ख्रिश्चन संघटनांसाठी वापरला जातो समाजसेवेच्या नावाखाली अनेक संस्था, कार्यकर्ते हा निधी मिळवतात कोणाचा संशय येत नाही.

उत्तरार्ध पुढे चालु.(वरिल जाला वर इंग्रजीत संपुर्ण साक्षात्काराचे विवेचन आहे.)

संस्कृतीबातमी

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

6 Apr 2011 - 1:40 pm | यशोधरा

वाचते आहे..

धर्मांतर करणाऱ्याबद्दल लय घाण श्या येतायेत तोंडात, पण आवरतो...
देव त्यांचे भले करो

आत्मशून्य's picture

6 Apr 2011 - 4:32 pm | आत्मशून्य

.

विसुनाना's picture

6 Apr 2011 - 5:57 pm | विसुनाना

एक असत्य असंख्य वेळा बोलले तरी ते सत्य होत नाही.
आंतरजालावर अनेकवेळा उद्धॄत केली गेलेली ही मुलाखत खोटी (काल्पनिक) आहे.
पहिले काही शब्द गाळून - This is a hypothetical interview of Father Johnson’ after his award by the Government of India for his exemplary work in India in enlightening the people in the path of the ONLY God.
कृपया खालील दुव्यावरचा "हायपोथेटिकल इंटरव्ह्यू"" हा उल्लेख पहावा.
http://blogs.ivarta.com/Interview-an-Evangelist-India/blog-31.htm

***
बाकी -
धर्मांतराबाबत म्हणाल तर सुप्रीम कोर्टाचे म्हणणे सर्व भारतीयांना मान्य असण्याजोगे आहे. ते या काल्पनिक मुलाखतीच्या दुसर्‍या भागात दिलेलेच आहे -
“The right to propagate religion does not mean the right to convert… Conversion done under allurement, use of force and fraud in which the poverty or ignorance of the individual is taken advantage of, is not only undemocratic but also unconstitutional…Respect for all religions is the foundation of secularism whereas the seeds of conversion lie in religious intolerance.”.

विश्वास कल्याणकर's picture

7 Apr 2011 - 12:36 pm | विश्वास कल्याणकर

लेख लिहीण्याचा मुख्य मुद्दा हा या विषयावर लक्ष आकर्षीत करणे हा आहे.मी दिलेला दुवा व विसुनानांनी दिलेल्या दुव्यातील मजकुर समान असल्याने व तो वाचकांनि निश्चीत वाचला असल्याने पुढिल मराठी भाषांतर देणे म्हणजे पुनरावृत्ती होईल म्हणुन याचा पुढील देत नाही.

नितिन थत्ते's picture

7 Apr 2011 - 2:34 pm | नितिन थत्ते

>>पुनरावृत्ती होईल म्हणुन याचा पुढील देत नाही.

की पितळ उघडे पडले म्हणून पुढील भाग देत नाही?
(एका नवलकथेची आठवण झाली. तिचाही शेवटचा भाग आलाच नाही.)