पुन्हा काल स्वप्नात आली गझल
खुले पापणी अन् उडाली गझल
कशी कोरडी मी, जरी वाहते
तुझ्या आठवांच्या पखाली गझल?
नसे वेगळे रूप माझे-तिचे,
मला वारशाने मिळाली गझल
"जरा एकटे वाटते, शब्द दे
तुझे सोबतीला" म्हणाली गझल
जुळे प्रेम एका कटाक्षामध्ये,
क्षणार्धात माझीच झाली गझल!
नको या प्रवासात थांबा कुठे,
सवे आज माझ्या निघाली गझल
प्रतिक्रिया
31 Mar 2011 - 4:55 pm | कच्ची कैरी
व्वा मस्तच आहे तुमची गझल म्हणजेच तुम्ही :)
31 Mar 2011 - 4:57 pm | यशोधरा
क्रांती, सुरेख गझल! खूप आवडली.
6 Apr 2011 - 6:25 pm | चित्रा
क्रांतिताई पुन्हा लिहू लागल्या याचा फार आनंद झाला..
31 Mar 2011 - 5:03 pm | गणेशा
छान आहे..
गझल मध्ये प्रत्येक शेराचे एक वेगळे स्वतंत्र अस्तित्व असते .. ते जपले गेल्यास जास्त मज्जा येईल..
- क्षमस्व
31 Mar 2011 - 5:07 pm | यशोधरा
स्वतंत्र अस्तित्व कुठे जपलं गेलेलं नाहीये असं वाटत? समजावून घेण्यासाठी प्रश्न विचारत आहे.
31 Mar 2011 - 5:35 pm | गणेशा
संदेश मध्ये सांगतो, मुळ कवयत्रीला कींवा त्यांच्या कवितेला नावे ठेवणाचा प्रयत्न नव्हता.. आणि त्यांनी तसा बदल करुन अजुन छान गझल द्यावी असा उद्देश होता.
तरीही येथे मत सांगितल्यास ते माझे वयक्तीक मत इतरांना/कवयत्रीला न पटल्यास वाद नको म्हनुन स्वतंत्र बोलतो ..आणि तसे ही तेच बरोबरच आहे असा आग्रह माझा नाही.
सांगतो ..
31 Mar 2011 - 5:46 pm | यशोधरा
हो चालेल, सांगा. मला तरी सर्व शेर स्वतंत्र पाहिले तरी ( द्विपदी म्हणून) वा एकत्रही उत्तम जमलेत असं वाटलं.
तुमचे मतही वाचायला आवडेल.
31 Mar 2011 - 8:56 pm | गणेशा
तुम्ही बरोबर सांगितले .. वाचली पुन्हा
धन्यवाद
31 Mar 2011 - 5:28 pm | मेघवेडा
वा! सुरेख!!
31 Mar 2011 - 5:31 pm | कवितानागेश
खूप आवडली.
31 Mar 2011 - 6:28 pm | मूकवाचक
गझल आवडली.
31 Mar 2011 - 8:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गझल आवडली.
पुन्हा काल स्वप्नात आली गझल
खुले पापणी अन् उडाली गझल
मस्तच.
-दिलीप बिरुटे
31 Mar 2011 - 8:53 pm | अनामिक
व्वा, मस्तं जमली अहे गझल. आवडली.
31 Mar 2011 - 10:24 pm | भवानी तीर्थंकर
गझलच शब्द मागतेय... वा!
31 Mar 2011 - 10:34 pm | प्राजु
अप्रतिम!! प्रत्येक शेर.. एकदम खणखणीत!
नको या प्रवासात थांबा कुठे,
सवे आज माझ्या निघाली गझल
हॅट्स ऑफ!
31 Mar 2011 - 11:37 pm | दीपा माने
क्रांती,
तुमची काव्यरचना/गझल मनाला भिडली. असेच काव्यातून आनंद देत रहा.
1 Apr 2011 - 9:24 am | मदनबाण
जुळे प्रेम एका कटाक्षामध्ये,
क्षणार्धात माझीच झाली गझल!
अप्रतिम... :)
23 Dec 2019 - 7:16 pm | उत्खनक
सु रे ख! कल्पना आणि शब्द सहज येऊन भिडतात.. ती गझल! रचना फार फार आवडली!