साखळीतल्या कुत्र्यावर -
ते खूपच माया करती ;
' माया ' नसल्या नात्यावरती
ते का डाफरती ?
त्यांच्या भ्रष्ट संपत्तीची
उधळण होते सगळीकडे !
माझी नजर मात्र वळते -
माझ्या गळक्या खिशाकडे ?
रस्त्यावरून जाताना ,
एक भिकारी दिसतो ;
उपहासाने माझ्याकडेच
पाहून का हसतो ?
धडपड माझी चालू आहे -
पतंग उडवण्यासाठी !
दोर राहू द्या - रीळहि साधे
नाही , सध्या हाती !
एकेकटा 'मी ' रस्त्यामध्ये
गर्दी करीत असतो !
गर्दीच्या खिजगणतीमध्ये
कुठेच 'मी ' का नसतो ?
प्रतिक्रिया
29 Mar 2011 - 11:07 am | प्रकाश घाटपांडे
From समाज