माझ्या मुलाची एक मैत्रीण आहे खास, एका कामवाल्या बाईची गरिबाघरची पोर आहे ... दोघांचे छान जुळते .
मला नेहमी वाटायचे कि काय बोलत असतील हे एकमेकांशी ? ह्या कविते मधून ते काहीसे मांडायचा प्रयत्न ....
gas वरील मऊ मऊ तूप पोळी भरवते तुला आई ...
माझ्या मात्र नाकातोंडात सतत चुलीचा धुआ
एका मुलाची काय भलतीच मज्जा आहे बुआ ....
झोपतोस तू शांतपणे लाऊन गुड नाईट कि काय
आम्ही मात्र पुरवतो महिनाभर तुकड्या तुकड्याने कछुआ
एका मुलाची काय भलतीच मज्जा आहे बुआ ....
फिरत असते मी एकटीच दिवसभर स्वताशीच खेळत
तुझ्या मागे असतो ताफा आजी आबा मौस्या अन बुआ
एका मुलाची काय भलतीच मज्जा आहे बुआ ....
कित्येकदा असते आजारी अन अनवाणी कोणाला काय त्याचे
सुटाबुटात ठेच लागली तरी जग विचारते तुला क्या हुआ क्या हुआ ?
एका मुलाची काय भलतीच मज्जा आहे बुआ ....
आमच्या कडे कायमच काळोख त्याची कसली रे तुला भीती ?
मला तर त्यात सापडते माझी परी तुला मात्र दिसतो बुवा ...
एका मुलाची काय भलतीच मज्जा आहे बुआ ....
उष्टे, उरले, नासले भर भरून दिलेस मला ...
मी पण गोड मानले अन नेहमीच दिली तुला दुआ
एका मुलाची काय भलतीच मज्जा आहे बुआ ....
मी अशी टाकलेली सोडलेली वार्यावर जगायला ...
तू असा आंजरलेला गोन्जारलेला आपल्यात कसा जुळणार दुवा
एका मुलाची काय भलतीच मज्जा आहे बुआ ....
एका मुलाची काय भलतीच मज्जा आहे बुआ ....
प्रतिक्रिया
29 Mar 2011 - 9:56 am | स्पंदना
छान विश्वेश!!
बराच वेगळा विचार अन वेगळ्या धर्तीची आहे कविता .
काही काही ओळी खुप काही सांगुन गेल्या, जस की>मला तर त्यात सापडते माझी परी तुला मात्र दिसतो बुवा ...> ही एक ओळ.
पु.ले.शु.
29 Mar 2011 - 10:03 am | हरिप्रिया_
मस्त...
29 Mar 2011 - 3:14 pm | गणेशा
छान लिहिले आहे ...