पांढरा किडा

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
22 Mar 2011 - 4:21 pm

पांढरा किडा

तुझी सांग येथे दखल कोण घेतो
कशाला घशाला उगा त्रास देतो

असामान्य विश्लेषकांच्या भितीने
गझल घप्प कपड्यात झाकून नेतो

नवे रोप लावत पुढे चालताना
कुणी सांड मागून तुडवीत येतो

पिके फस्त केली फळे पोखरूनी
कुठूनी किडा पांढरा जन्म घेतो

अभय लाचखोरीत तो शिष्ट प्राणी
कुणाच्याच बापास ना घाबरे तो

. गंगाधर मुटे
..........................................

कवितागझल

प्रतिक्रिया

कविता आणि त्या मागील भावना आवडली

अवांतर :

कुठूनी किडा पांढरा जन्मते तो

या ऐवजी 'जन्म घेतो ' असे योग्य वाटते आहे का ?

नसेल आवडले तर सोडुनी देणे

गंगाधर मुटे's picture

22 Mar 2011 - 7:45 pm | गंगाधर मुटे

बदल केलाय. :)

रेहेमानी किडा ह्यावरही येऊ द्या

- गंगाराम कुटे

कच्ची कैरी's picture

22 Mar 2011 - 4:51 pm | कच्ची कैरी

मस्त्,छान यापेक्षा दुसरे काही सुचत नाहीये ;)

प्राजु's picture

22 Mar 2011 - 9:40 pm | प्राजु

सुरेख!!

मदनबाण's picture

22 Mar 2011 - 9:40 pm | मदनबाण

छान...

आत्मशून्य's picture

23 Mar 2011 - 12:46 am | आत्मशून्य

.

पुष्करिणी's picture

23 Mar 2011 - 2:06 am | पुष्करिणी

आवडली

प्रकाश१११'s picture

23 Mar 2011 - 11:26 am | प्रकाश१११

मुटेजी - फारच मस्त जमलीय

नवे रोप लावत पुढे चालताना
कुणी सांड मागून तुडवीत येतो

पिके फस्त केली फळे पोखरूनी
कुठूनी किडा पांढरा जन्म घेतो

मनापासून शुभेच्छा !!

राघव's picture

23 Mar 2011 - 7:11 pm | राघव

अस्सेच म्हणतो. :)

राघव