टाळती मजला अताशा हाय! माझी माणसे

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
22 Mar 2011 - 8:45 am

टाळती मजला अताशा हाय! माझी माणसे
हासती का पाहुनी मज रोजला हे आरसे??

मैफ़िलीना मी सजवले प्राण माझे ओतुनी
पण तरीही का कुणीही फ़िरकले ना फ़ारसे??

सांगुनी माझी व्यथा मी काय येथे मिळवले?
फ़क्त त्यांनी हुंदक्यांचे माझिया केले हसे

सांज होता दूर जाती सावल्या पायातल्या
टाळण्या मज तेवणारा दीपही का विझतसे??

'भीड आता बाळगावी तू कशाला, वेदने??
मी 'सखी' हे नाव तुजला देत केले बारसे!!

पेटवूनीया चितेला सर्व आता पांगले
सोबतीला राख आणी राहिले बस्स कोळसे!!

एकले आयुष्य गेले, ना कुणी आले कधी
मन रमवण्या शेवटाला, मरण आले छानसे!!
- प्राजु

*काल एक फोन आला.. "प्राजु तू कविता लिहिणे बंद केले आहेस की काय?".. म्हणून मग म्हंटलं मारावीच एक कविता मिपाकरांच्या माथी. :) *

करुणकवितागझल

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

22 Mar 2011 - 9:04 am | प्रीत-मोहर

मस्त ग तै!!!

नगरीनिरंजन's picture

22 Mar 2011 - 9:07 am | नगरीनिरंजन

एकले आयुष्य गेले, ना कुणी आले कधी
मन रमवण्या शेवटाला, मरण आले छानसे!!

छान! 'मरण आले छानसे ' हे खूपच आवडले!

अरुण मनोहर's picture

22 Mar 2011 - 10:00 am | अरुण मनोहर

गजल म्हणून छान आहे,
पण काय हे प्राजु? यह कैसी उदासी?

बाकी,
सांगुनी माझी व्यथा मी काय येथे मिळवले?
फ़क्त त्यांनी हुंदक्यांचे माझिया केले हसे

हे मिपावर फीट्ट आहे!

प्राजु's picture

22 Mar 2011 - 8:16 pm | प्राजु

छे हो!! कसली उदासी आणि काय!! हे असच... ओळ सुचली मग लिहिलं! :)
धन्यवाद.

सुहास..'s picture

22 Mar 2011 - 10:28 am | सुहास..

रचना आवडली !!

हरिप्रिया_'s picture

22 Mar 2011 - 10:36 am | हरिप्रिया_

मस्त कविता प्राजु ताई....

sneharani's picture

22 Mar 2011 - 10:44 am | sneharani

सुंदर रचना! मस्त!!

मनीषा's picture

22 Mar 2011 - 11:18 am | मनीषा

मस्त !!!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

22 Mar 2011 - 12:20 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त! मस्त!! मस्त!!!
खुप आवडली ही गजल. त्यातल्या त्यात:

एकले आयुष्य गेले, ना कुणी आले कधी
मन रमवण्या शेवटाला, मरण आले छानसे!!

हे तर खासच!!

कच्ची कैरी's picture

22 Mar 2011 - 1:06 pm | कच्ची कैरी

मस्त :)
छानसे मरण कसे असते ?

गणपा's picture

22 Mar 2011 - 1:14 pm | गणपा

ऑन डिमांड कविता/गझल वाह !!!
हाडाची कवयत्री आहेस.

सूड's picture

22 Mar 2011 - 1:16 pm | सूड

कविता छानच आहे !!

सांगुनी माझी व्यथा मी काय येथे मिळवले?
फ़क्त त्यांनी हुंदक्यांचे माझिया केले हसे

हे विशेष आवडले.

प्रत्येक शेर आवडला .. एकदम मस्त लिखान

सांज होता, दूर जाती सावल्या पायातल्या
टाळण्या मज, तेवणारा दीपही का विझतसे??

'भीड आता बाळगावी तू कशाला, वेदने??
मी, 'सखी' हे नाव तुजला देत केले बारसे!!

खुप आवडले

चिगो's picture

22 Mar 2011 - 2:38 pm | चिगो

मस्त गझल... व्वाह..

परिकथेतील राजकुमार's picture

22 Mar 2011 - 2:47 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त मस्त मस्त !

इंटरनेटस्नेही's picture

22 Mar 2011 - 5:01 pm | इंटरनेटस्नेही

मस्त कविता ग प्राजुताई! छान छान!

विकास's picture

22 Mar 2011 - 5:04 pm | विकास

मस्तच!

बाकी तुमच्या कविता पण सरळ वाचायच्या का मर्ढेकरांच्या कवितांसारख्या? ;)

प्राजु's picture

22 Mar 2011 - 8:18 pm | प्राजु

अप साईड डाऊन करून वाचा.. म्हणजे शिर्षासनात ! :)

विकास's picture

22 Mar 2011 - 8:19 pm | विकास

अप साईड डाऊन करून वाचा..

धन्यवाद! आता अर्थ लागला! ;)

असुर's picture

22 Mar 2011 - 5:09 pm | असुर

झकास्स!!! मस्तच आहे!!! शेवटी त्या एकटेपणाची राख झाली हे बरे झाले!!

-- असुर

छान आहे गजल.
तुझ्या पुढच्या पुस्तकात ही समाविष्ट करावीस इतकी चांगली झालिये.
पूर्वीचा नवखेपणा आता अजिबात जाणवत नाही.
माझ्या म्हणण्याकडे तू सकारत्मकतेने पाहशील अशी आशा.;)
रागावलीस तर तूला टाळण्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय नाही गो!

प्राजु's picture

22 Mar 2011 - 8:19 pm | प्राजु

कळलं हो बाई!! ;)

विश्वेश's picture

22 Mar 2011 - 6:16 pm | विश्वेश

"भोगले जे दुख्ख" ची आठवण झाली, आपल्या पुढच्या अल्बम मध्ये येऊ द्या काही गझला

मस्त

एकले आयुष्य गेले, ना कुणी आले कधी
मन रमवण्या शेवटाला, मरण आले छानसे!!

जिंदगी तो बेवफा है, एक दिन ठुकराएगी |
मौत मेहेबूबा है, अपने साथ लेकर जाएगी |

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Mar 2011 - 7:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वच शेर एकदम जबरा आहेत.

सांज होता दूर जाती सावल्या पायातल्या
टाळण्या मज तेवणारा दीपही का विझतसे??

अहाहा.

और भी आने दो.

-दिलीप बिरुटे

सुरेख रचना !

सांगुनी माझी व्यथा मी काय येथे मिळवले?
फ़क्त त्यांनी हुंदक्यांचे माझिया केले हसे

सांज होता दूर जाती सावल्या पायातल्या
टाळण्या मज तेवणारा दीपही का विझतसे??

'भीड आता बाळगावी तू कशाला, वेदने??
मी 'सखी' हे नाव तुजला देत केले बारसे!!

धनंजय's picture

22 Mar 2011 - 10:04 pm | धनंजय

याच द्विपदी विशेष आवडल्या

राघव's picture

23 Mar 2011 - 7:14 pm | राघव

असेच म्हणतो. :)

राघव

सुरेख जमली आहे गजल, प्राजू.

सर्व वाचकांचे आणि प्रतिसाद कर्त्यांचे मनापासून आभार. :)

मदनबाण's picture

22 Mar 2011 - 9:38 pm | मदनबाण

ह्म्म... छान. :)

ए जरा B +ve गझल वाचायला मिळेल का ?

मेघवेडा's picture

22 Mar 2011 - 9:41 pm | मेघवेडा

वा! 'मरण आले छानसे' मस्तच!

सुरेख जमली आहे. अजून येऊ दे! :)

क्रान्ति's picture

22 Mar 2011 - 10:26 pm | क्रान्ति

सांगुनी माझी व्यथा मी काय येथे मिळवले?
फ़क्त त्यांनी हुंदक्यांचे माझिया केले हसे

सांज होता दूर जाती सावल्या पायातल्या
टाळण्या मज तेवणारा दीपही का विझतसे??

'भीड आता बाळगावी तू कशाला, वेदने??
मी 'सखी' हे नाव तुजला देत केले बारसे!!

अफाट शेर! गझल आवडली.

५० फक्त's picture

22 Mar 2011 - 11:13 pm | ५० फक्त

गझल आवडली प्राजुताई, जरा 'भोगले जे दुख त्याला ' च्या जवळ जाणारी वाटली.

पुष्करिणी's picture

23 Mar 2011 - 2:01 am | पुष्करिणी

मस्त रचना, आवडली

चित्रा's picture

23 Mar 2011 - 3:20 am | चित्रा

खूप आवडली.

नंदन's picture

23 Mar 2011 - 4:07 am | नंदन

गझल, सार्‍याच द्विपदी आवडल्या. मात्र खालील शेर फार सुरेख -

सांज होता दूर जाती सावल्या पायातल्या
टाळण्या मज तेवणारा दीपही का विझतसे??

पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. :)

पियुशा's picture

23 Mar 2011 - 10:25 am | पियुशा

मस्त ग प्राजु ताइ :)

स्पंदना's picture

23 Mar 2011 - 1:22 pm | स्पंदना

खुपच सुन्दर ओळीका (मला शेर म्हणायला आवडत नाही)

गझल !

पैसा's picture

23 Mar 2011 - 2:14 pm | पैसा

तुला फोन करून लिहायला लावणार्‍यांचे पण आभार.

प्राजु's picture

23 Mar 2011 - 7:27 pm | प्राजु

धन्यवाद. :)