बागेतल्या या फुलांना ही वाटेल हेवा
जेव्हा जेव्हा तु हसते अशी
गालावर माझ्या तु लाल ठसा ओठांचा द्यावा
मनात माझ्या इच्छा अशी
फुलातुन मधमाशीने जसा रस प्यावा
डोळ्यत माझ्या तु बघते अशी
तुझ्या छायेत पाण्याचा पेला थिजुन जावा
जरि असेल दुपारी शशी
जगाचा या सार्या मला विसर पडावा ?!!!!!
जेव्हा येतो मी तुझ्यापाशी
नास्तीकाच्या नवसाला साक्षात देव पावावा
दररोज मला तु भेटते अशी
आत फक्त एकच प्रश्न वाटतो विचारावा
इतकी सुंदर तु दिसते कशी ????
प्रतिक्रिया
22 Mar 2011 - 1:38 am | पिनुपवार
एका मुलीच्या प्रेमात पड्ल्यावर पहिल्या दिवशी मी
ही कविता लिह्ली
22 Mar 2011 - 4:53 pm | परिकथेतील राजकुमार
तीला देताना खाली अशीच सहि करु नका म्हणजे झाले.
22 Mar 2011 - 7:31 am | शिल्पा ब
ती मधमाशी आणि तुम्ही फुल? हे एक वेगळंच काय ते!!
22 Mar 2011 - 9:06 am | अविनाशकुलकर्णी
मधमाशी आणि तुम्ही फुल
बहुतेक घेतलेला चावा व त्याच्या आठवणी त्यांना काव्यात तुन सांगायच्या असतिल..
प्रेमात पड्ल्यावर पहिल्या दिवशीची ताजीताजी कविता आहे..समजुन घ्या..
22 Mar 2011 - 12:26 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
छान प्रयत्न.... लिहित रहा....
22 Mar 2011 - 1:04 pm | कच्ची कैरी
>>नास्तीकाच्या नवसाला साक्षात देव पावावा
दररोज मला तु भेटते अश>>व्वा मस्त लिहिली आहे कविता !
प्रेमात पडल्यानंतर ३६५ व्या दिवशीची कविताही टाका मजा येईल ;)
22 Mar 2011 - 4:36 pm | गणेशा
कविता छान .. लिहित रहा ...
अवांतर : एक प्रेरणा घेवून ३६५ व्या दिवसाचे काव्य लिहतो आहे ..ह्.घ्या.
22 Mar 2011 - 4:40 pm | गणेशा
बागेतल्या फुलांना ही वाटतो हेवा
मजजवळी तू नसतेस जेंव्हा
गालावर माझ्या लाल ठसा बोटांचा
इच्छा तुझ्या पुर्या न होती तेंव्हा
कोमेजलेला देह वाटतो मी असा
डोळ्यातुन शोषली तू स्वप्ने जेंव्हा
भीतीच्या छायेत पेला संपुनी गेला
दुपारीच तारे होते दिसले तेंव्हा
शाकाहारी ताटात मटनाचा तुकडा
महिन्यातुन एकदा स्वयपाक तु करते तेंव्हा
आता मात्र एकही प्रश्न विचारावासा वाटत नाही
तू सर्व प्रश्नांची उगमदाती असतेस जेंव्हा-तेंव्हा
22 Mar 2011 - 5:11 pm | अविनाशकुलकर्णी
गणेश भाऊंना आवरा
23 Mar 2011 - 7:44 am | ५० फक्त
पु-या काय, पेला काय, मटण काय, गणेशा भाउनं अगदि केटरिंगच सुरु केलंय जणु.
''महिन्यातुन एकदा स्वयपाक तु करते तेंव्हा'' - एक शंका ती आयटित आहे काय ?
23 Mar 2011 - 7:54 am | मदनबाण
मस्त... :)