मीपा करांची कविता.....

पियुशा's picture
पियुशा in जनातलं, मनातलं
21 Mar 2011 - 11:16 am

मी पा करांची कविता
कधी आहे मस्ती ,कधी धिंगाणा ,
तर कधी कधी राडा
मीपा सदस्यांचा वाचते हो मी पाढा .............

,धमाल मुलगा ,कमाल मुलगा
काहीपण इचारा लगेच सांगणार उत्तर ,
मीपा चे आहेत हे जुने मास्तर ...........
छोटा डॉन........
कायम बीजी असणारे हे व्यक्ती
कुणावरही करत नाही बोलण्याची सक्ती
ढवळ्या शेजारी बांधला पवळा..
वान नाही पण गुण लागला
गप्प गप्प असलेला छोट डॉन
पर्या सारखा गु लु गु लु बोलायला लागला

जागु ,अमिता ,गणपा ,
मृणाल अन निवेदिता ताई ,
यांना रेसेपी बनविण्याची नेहमीच घाई
यांच्या रेसेपिवर सर्व मीपाकर फिदा
तोंडाला सुटले पाणी बदाबदा
पाहून एकसे एक रेसेपी होतो जीव बावरा
अरे या कंपूला कुणीतरी आवरा ......

खरडी लिहण्याचा (वाचण्याच्या ) शौकीन
मु वे अन मृगी आहे मिपाच्या गोसीप क्वीन ,

" अर्ज किया है
हुवा जब जब मिपा पे राडा -झगडा "
मि पा का वातावरण तब तब बिगडा"
हो गयि भो भो , हो गायी म्याव म्याव"
चल्ते थे जब सब अकड्के -तनके "
तब आयी वहिदा शन्ति दुत बनके "

टार्या आहे मस्त मौला
कित्येकांचा बाजार बसवला, उठवला ...
कधी कधी तो संपादकाला हि नडतो
उमगली चूक कि ,":आय माय स्वारी पण म्हणतो "
याने बांधला आहे मनाशी चंग
टार्या आहे मीपाचा हूड हूड दबंग दबंग दबंग ...

इंट्या बद्दल काय बोलू
वयाने लहान पण विचारांनी महान
प्रि मो नावाची गोवेकरणी
झालीय मीपा ग्यांग ची टीचर
एवढेच म्हणेन
"आंब्याला फुटला मोहोर "

स्पा आहे मीपाचा अनिमेशन गुरु
मोठ्ठा ब्रेक घेऊन पुन्हा झालाय सुरु ..

जे न देखे रवी ते देखे कवी ...
पाषाण भेद , प्रकाश जी, गणेशा
छान छान कविता लिहिण्यासाठी
काय घेता ?हॉर्लीक्स कि बोर्नव्हीटा..

"तुमच आमच सेम चा नवीन भाग टाकला"
हा कोन आहे ओळखला का ओळखला ?
जमवितो खादाडी कट्टा ,ट्रीपचे करितो आयोजन
पुढल्या वेळी एव्हरेस्ट सर करायचं तुमच नाही ना प्रयोजन ?

अवलिया वाटतो शांत, हा गोड गैर समज आहे :)
तो सदा मीपा वर पडीक , डोक्याला आणतो तिडीक
देतो अशी भन्नाट प्रती ."हान्न त्येज्यायला" म्हणायला लावतो
अवलिया आहे छुपा रुस्तुम हे आम्हीसर्व जाणतो

शुची ताई ,प्राजू ताई ,मीतान , अन माउ !
लिहा काहीतरी लवकर ,नका भाव खाऊ

हा आमचा मिसळ पावचा कट्टा
कधी बोलतात गुलुगुल कधी चालते थट्टा,
कधी होतात रुसवे फुगवे
कधी पाणावतात डोळे
कधी हसून हसून होतात लोट पोट
हीच आहे मीपाची सोज्वळ प्रतिमा
नाही कुणाच्या मनात कुणाविषयी खोट

म्हणूनच म्हणेन
" हर कोई पढनेवाला , हर कोई लिखनेवाला "
"मीपा कि पाठ शाला, मस्ती कि पाठ शाला" :)

मौजमजाआस्वाद

प्रतिक्रिया

अरुण मनोहर's picture

21 Mar 2011 - 11:20 am | अरुण मनोहर

चान चान

ब्रिटिश टिंग्या's picture

21 Mar 2011 - 11:22 am | ब्रिटिश टिंग्या

डान्या गु लु गु लु बोलायला लागला हे पाहुन डोळे पाणावले! :)

अरे वा.. पाकृवरून डायरेक्ट कविता?

मस्त जमलीये पण

स्पंदना's picture

21 Mar 2011 - 11:29 am | स्पंदना

ही 'पी.एच.डी ' जरा लवकर झाली नाही?

नाही एव्हढ्या लवकर मिपाच अंतरंग उलगडल म्हणुन हा विचार डोक्यात आला.

बाकि मी माझ निरिक्षण नोंदवल

पर्नल नेने मराठे's picture

21 Mar 2011 - 11:32 am | पर्नल नेने मराठे

इतकी वर्शे झालित मिपावर पण वर्गात काय न कवितेत काय आमची दखल घेतली गेली नाही ह्याचे वैशम्य वाटतेय.
तरी बरे एवढे सुरेख लेख लिहिलेत मी =))
आता नानाबरोबर मी पण निघावे का वैकुन्ठाला ?
पण नको उगाच मिपा माझ्या सार्ख्या लेखिकेला उगाच मुकायचा ;)

पियुशा's picture

21 Mar 2011 - 11:39 am | पियुशा

"अच्रत ,बव्ल्त, म्हनुन करते शुध लेखनाचि गोचि"
" चु चु आहे निवान्त ! सध्या झोपाळ्यावर बिज्जि"

तु आहे मि पा चि लाड़की .
तुला बरे कस विसरेन मि :)

पर्नल नेने मराठे's picture

21 Mar 2011 - 11:47 am | पर्नल नेने मराठे

=)) =)) मस्त्च यार !!!

मृगनयनी's picture

21 Mar 2011 - 11:54 am | मृगनयनी

अच्रत ,बव्ल्त, म्हनुन करते शुध लेखनाचि गोचि"
" चु चु आहे निवान्त ! सध्या झोपाळ्यावर बिज्जि"

=)) =)) =)) =))

चुचुच्या खरदवहीत गेली दीद वर्श पालना हल्तो आहे!! आनि गम्मतं म्हन्जे त्या पाल्न्यामधेये चुचु स्वताच बस्ली आहे! ;) ; ) ;)
______________________

"मिपावरील रासलीलांमध्ये ;) अग्रगण्य असलेल्या आणि कुणाच्यातरी ( ;) )प्रचन्ड लाडक्या अशा ---" - 'परीकथेतील राजकुमार' यान्चा साधा नामोल्लेखही पियुशा... तुझ्या कवितेत नसल्याबद्दल "जाहीर निषेध"!
कृपया चुचुबद्दल जसे लिहिले... तसेच "परा" बद्दल ही "काहीतरी" लिहिण्यास "लाजू" नये!

______________________

कृ. ह. घे.

प्रचेतस's picture

21 Mar 2011 - 12:23 pm | प्रचेतस

आहे की उल्लेख

गप्प गप्प असलेला छोट डॉन
पर्या सारखा गु लु गु लु बोलायला लागला

अनुल्लेखाने नाय मारलं विचार्‍या पर्‍याला.

पियुशा's picture

21 Mar 2011 - 12:24 pm | पियुशा

" परा आहे मि पा चा क्रिशना " :)
"त्याला गोपिकान्चि काय कमि"
आज गेलि एक,उद्या मिळेल दुसरि याचि १०० % हमि .....
"ए केवडा देतेस का लाइन "?
म्हनत पर्याचे दिवस आहेत सध्या सुपर फाइन "
:) ;)

पर्नल नेने मराठे's picture

21 Mar 2011 - 12:26 pm | पर्नल नेने मराठे

"ए केवडा देतेस का लाइन "?

हि लाइन तर टार्याची आहे ना :ओ

मृगनयनी's picture

21 Mar 2011 - 12:59 pm | मृगनयनी

ए केवडा देतेस का लाइन "?

हि लाइन तर टार्याची आहे ना :ओ

=)) =)) काय गं चुचु!!! कित्ती कित्ती बारीक आणि सखोल अभ्यास आहे गं तुझा... सगळ्यान्च्या खरडवह्यांन्चा!! ;) ;)

__________________

पियु... एकदा चेक कर बरं पर्या'च्या लाडक्या गोपिकेची खरडवही.. ;)
पर्‍या म्हणतो... "तूच माझी वन & ओन्ली.... बाकी कुणी नाही!!!" ;) ;)

मुलूखावेगळी's picture

21 Mar 2011 - 12:38 pm | मुलूखावेगळी

म्हनत पर्याचे दिवस आहेत सध्या सुपर फाइन

+१०००
मस्त कविता. कविता पन कराय लागलीस हे प्यार के साइड एफेक्ट्स कि काय ;)
तुम्ही इतका अभ्यास करता हे नव्हते ब्वॉ माहित.
मला गोसिप क्वीन म्हन्तोस हो ग कार्टे
भेट मग सांगते तुला ;)

विजुभाऊ's picture

25 Mar 2011 - 3:03 pm | विजुभाऊ

चुचुच्या खरदवहीत गेली दीद वर्श पालना हल्तो आहे!!
ठ्यॉ......
अग तो पाळणा नाही झोका आहे.

मृगनयनी's picture

25 Mar 2011 - 3:41 pm | मृगनयनी

पन तो झोका खूप्च छोटा आहे!... त्यामुळॅ आमी त्याला "पालना" म्हणले इतकेच्च्च! ;)
आजकल "छोटा" हा शब्द म्हटला... की दोनच गोष्टी डोळ्यासमोर येतात.... चुचु'चा पालना आणि छोता दॉन! ;) ;) ;)

काल - परवा असेच काहीसे वाचनात आले होते ;)

तरी ही म्हणतो छान ;)

छोटा डॉन's picture

21 Mar 2011 - 12:02 pm | छोटा डॉन

मी गुलुगुलु बोलतो ?
कै पण काय, च्यायला कठिणच झाले आहे आजकाल ...

- ( हतबल ) छोटा डॉन

स्पंदना's picture

21 Mar 2011 - 12:16 pm | स्पंदना

बघा!

तुम्ही मी सोडुन सगळ्यांशी ते काय म्हणतात ते 'गु लु गु लु गु लु गु लु गु लु ' बोलता?

मी मात्र साधा अक्षररंग नाही वापरु शकत, ना ही बाकिच्या कोणत्या गोष्टी मला करायला मिळतात.
च! ही आयडी घेउन जीव्च देते आता मी.
एकाच घरात असुन अशी सावत्र वागणुक, किती म्हणुन सहन करायच ते?

(इथे मी ढळाढळा रडतेय अशे स्माय्ली पहा)

वपाडाव's picture

22 Mar 2011 - 12:38 pm | वपाडाव

(इथे मी ढळाढळा रडतेय अशे स्माय्ली पहा)

अपर्णातै... आम्ही तर ब्वॉ आजपर्यंत प्वरीवांना ढसाढसा रडताना पाह्यलंय....
हे काहीतरी नविनच

कृपया कवितेतमध्ये सदस्यनावे बरोबर लिहावीत.

छोटा डॉनचे नाव छोटा डॉन नसुन चोता दोन आहे. सुयोग्य बदल लवकरच कराल अशी आशा. धन्यवाद.

बाकी प्रयत्न चांगला आहे. ;-)

नगरीनिरंजन's picture

21 Mar 2011 - 12:12 pm | नगरीनिरंजन

अले वा! कित्ती कित्ती गोग्गोल कविता! अशंच चान चान लिआयचं बलं का? :-)

- (मिपावर म्हणजे मिपाबद्दल असं समजणार्‍यांना) लिहूश्या.

sneharani's picture

21 Mar 2011 - 12:16 pm | sneharani

छान छान!
:)

इंटरनेटस्नेही's picture

21 Mar 2011 - 12:25 pm | इंटरनेटस्नेही

मस्त मस्त कविता, पियु.. छान छान! हे घे माझ्या वतीने 10 स्टार्स हे तुझ्या कवितेला..

******कवि पियुषा*****

कवि नाय रे ...कवयित्री !!!

स्पा's picture

21 Mar 2011 - 12:31 pm | स्पा

कवि नाय रे ...कवयित्री !!!

:D

इंटरनेटस्नेही's picture

22 Mar 2011 - 12:15 am | इंटरनेटस्नेही

अरे मराठी ग्रामर इज वेरी कन्फ्युजिंग..

प्रकाश१११'s picture

21 Mar 2011 - 12:25 pm | प्रकाश१११

पियुषा - प्रतिक्रियेची गर्दी .मी पण देतोय प्रतिक्रिया. छान नि मस्त लिहिले आहेस .खूप मस्त.
शुभेच्छा.!!

सूड's picture

21 Mar 2011 - 12:29 pm | सूड

काल आलेले लोक मिपाला एवढं जवळून ओळखायला लागले आणि आम्ही पामर ....असो !!
मी ही काय म्हणतात ते 'गु लु गु लु गु लु गु लु गु लु ' बोलायला सुरुवात करावी म्हणतो, अगदीच काही नाही तर अशा कविता, लेख इ.इ. मध्ये तरी आमचं नाव येईल !!

बा द वे कविता बर्‍यापैकी बरीये !!

५० फक्त's picture

21 Mar 2011 - 12:30 pm | ५० फक्त

पियुषा,

आमच्या बोल्ड उल्लेखाबद्दल धन्यवाद, याबद्दल तुला एका ठिकाणि पार्टीचे आमंत्रण --

पण, ब्रेड वडे आणि अंडा करी खायला तुलाच बोलवावं लागेल , कविता लिहिलीस म्हणुन त्यातुन सुट नाही.

असो, कविता लिहिण्यासाठी केलेलं निरिक्षण उत्तम,मीटरात नाही पण कविता छान झाली आहे. आमच्याकडे ईंटर्नल ऑडिटर फटके देतो ना तसं वाटलं. फटके असतात पण कोणाला सिरियसली घेण्याची गरज नसते.

बाकी अशीच एक कविता काही दिवसापुर्वी कोणितरी लिहिली होती त्याचि अंमळ आठवण झाली.

चिंतामणी's picture

22 Mar 2011 - 1:01 am | चिंतामणी

आमच्या बोल्ड उल्लेखाबद्दल धन्यवाद, याबद्दल तुला एका ठिकाणि पार्टीचे आमंत्रण.

ऑ????????

नुसते नाव आले तर 'परा'कोटीचा आनंद झालेला दिसत आहे.

:-O

कच्ची कैरी's picture

21 Mar 2011 - 2:31 pm | कच्ची कैरी

पियुशा तु तर एकदम मल्टी टॅलेंटेड निघालीस हं ! व्वा मस्त आहे कविता !माझा उल्लेख नसला तरी आवडली मला :)

माझा उल्लेख नसला तरी आवडली मला

घ्या.... बै नुस्तं नाव कैरी ठेवलं की तुम्हाला 'फेमस' होण्याचे डोहाळे लागलेत की काय ?

ज्ञानराम's picture

21 Mar 2011 - 2:41 pm | ज्ञानराम

सहीच आहे.......

पियुषा तुझ पण नाव अ‍ॅड कर ना त्यात.

प्रीत-मोहर's picture

21 Mar 2011 - 3:08 pm | प्रीत-मोहर

मस्त ग .....
:)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

21 Mar 2011 - 4:05 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

छान हं छान...

धमाल मुलगा's picture

21 Mar 2011 - 4:14 pm | धमाल मुलगा

भारीच!
मी आणि मिपाचा जूना मास्तर? च्यायला!
कोट टोपी धोतर आणि तांबड्या पुणेरी वहाणा असा वेष आला नजरेसमोर. :D

क्रान्ति's picture

23 Mar 2011 - 11:48 pm | क्रान्ति

मला तर गुपचुप गुपचुपमधला अशोक सराफ आठवला. पुणेरी पगडीवाला प्रा.धोंड. :)

कोट टोपी धोतर आणि तांबड्या पुणेरी वहाणा असा वेष आला नजरेसमोर.

आणि हातात एक बिडी................ अर्रर छडी :D

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Mar 2011 - 6:23 pm | निनाद मुक्काम प...

एकदम राडा रॉक्स कविता आहे .
राडेबाज मुक्काम पोस्ट....

अवांतर
राडा रॉक्स चा अर्थ जाणून घेण्यासाठी ह्याच नावाचा सिनेमा पहा .
पर्यायाने मराठी सिनेमा जगवा .

विनायक बेलापुरे's picture

22 Mar 2011 - 2:04 am | विनायक बेलापुरे

छानच आहे कविता

पण सन्माननीयांच्या प्रतिक्रिया वाचल्यावर काही गुपिते उलगडली तर काही अजूनच गूढ झाली.

वपाडाव's picture

22 Mar 2011 - 12:43 pm | वपाडाव

गोग्गोड कविता अन त्यावर गोग्गोड अशे कमेंट्स....
वा पियुशा...
(गुळावर चिकटणारा 'मक्खी-दबंग फेम')
-हमारे नाम का पत्थर भी पानी मे तैरता है I

वाहीदा's picture

24 Mar 2011 - 12:29 pm | वाहीदा

तु खरंच मुर्तिमंत कवियत्री आहेस
काय उत्सफुर्त कविता करते स बाब्बो !
माझ्यावर दिलेला खरडितील शेर तर अप्रतिम
तुला दंडवत __/\___

पियुशा's picture

28 Mar 2011 - 11:03 am | पियुशा

धन्यु :)