आता आंब्याचा सीज़न सुरु होईल. म्हणुनच हे ख़ास हे आंब्याच गाण आज लिहित आहे. हे मला माझ्या आजीच्या वहीतून मिळाल. आणि वाटल हे तुम्हाला सांगाव.
आंब्याच गाणं..
हापूस आंब्याची लज्जत न्यारी
एकदाच खाल्ला पण किमतीला भारी......१
पायरी आंबा गोडच गोड
खावी त्याची निदान एक तरी फोड......२
नावाने जरी आंबा लंगडा
तरी तब्येतीने आहे चांगलाच तगडा....३
कच्च्या आंब्याचा नखराच भारी
लोणचे त्याचे घरोघरी....४
दशेरी आंब्याला नाही तोड़
रस त्याचा भारीच गोड.......५
बेगमपल्लिने केली सर्वांवर ताण
गरीबाच्या घरी त्याचाच मान.......६
चवीला पाणचट आंबा तोतापुरी
एकदाच खाला अन म्हणाल दहादा सॉरी.........७
वटपौर्णिमेला रायवळ आंब्याचा मान
त्याविना अपुरे सुवासिनिचे वाण......८
संपला आंब्याचा मोसम जरी
नीलम दिसतो घरोघरी......९
आंब्याच्या रसाला पंचपक्वान्नाचा मान
चांदीच्या वाटीत त्याचे स्थान......१०
आंब्याच्या फळाला राजाचा मान
सगळी फळे करती त्यालाच सलाम....११
आंब्याच्या आहेत हजारो जाती
कोकीळ पक्षी त्याचेच गुण गाती ....12
संपले आमचे आंब्याचे गाणे
पण त्याआधी घ्या थंडगार पन्हे..........13
प्रतिक्रिया
16 Mar 2011 - 1:07 pm | नि३
आंब्याच गाणं.. आवडल..
वाट बघतोय आंब्याची आता..:-)
16 Mar 2011 - 1:54 pm | मुलूखावेगळी
कविता मस्त आनि फोटु पण :)
बाकि आम्च्याकडचा नेकनुरचा हूर नावाचा आंबा पण खुप्प भारी असतो. खाउन बघा.
अजुन केशर पन छान. मला तर गावरानच आवडतो पन मिळने दुर्लभ.
बाकि १दा शेपा आंबा खाउनच बघा अतिशय बोरिन्ग असतो न उग्र ;)
16 Mar 2011 - 2:00 pm | टारझन
मला आंबे पिळायला फार आवडत. लहाणपणी जेंव्हा बाबा अंब्यांची पेटी आणत , तेंव्हा मी पटकन आंबे पिळायला घ्यायचो. भले ही आमरसाचा मेणु संध्याकाळी असो . तोतापुरी आंबे हे माझे जुणे प्रेम राहिले आहे.
काही काही अंब्यांचा फक्त वासंच छाण येतो , तर काही काही आंबे फक्त दिसायलाच छाण दिसतात. तर कधी कधी सुरुकुत्या पडलेले आंबे देखील मधुर निघतात.
तेंव्हा " नारळ ,मुलगा आणि आंबा कसा निघेल हे सांगता येत नाही " ही म्हण अल्टर केल्या जावी.
- आंबा पाटील
घड्याळ लावुन आंबे खातो.
16 Mar 2011 - 2:06 pm | मुलूखावेगळी
+१ हे राहिलेच
16 Mar 2011 - 3:24 pm | गणेशा
गाणं आवडल ..
आजीची वही म्हणजे मजाच सापडली असेन तुम्हाला ..
येवुद्या आनखिन ओवी टाईप असले अजुन काही तर द्या .. मस्त वाटेल वाचायला
16 Mar 2011 - 3:37 pm | जागु
अजुन येउद्या आजीच्या कविता.
आंब्याची कविता छानच आहे. मुलांना ऐकवायला छानच आहेत.
16 Mar 2011 - 7:15 pm | चित्रा
आंबे यायला वेळ आहे ना अजून.
पण आजींनी टिपून ठेवलेली (का लिहीलेली?) कविता आवडली.
तोतापुरी आंबा खरे तर छान लागतो. पाणचट नसतो, काप करून सालीसकट खाता येतो.
आमच्या घरी मी आणि वडील सालीसकट आंबे खात असू. लग्न होऊन नवर्याकडे गेले तेव्हा सुरुवातीला मी सवयीने सालीसकट आंबा खाल्लेला पाहून सासरच्या लोकांच्या चेहर्यावर गंमतीशीर भाव दिसले होते. सभ्य असल्याने काही बोलले नाहीत, पण बहुदा काय आचरट आहे, सालही खायची सोडत नाही, म्हणाले असावेत.
17 Mar 2011 - 12:18 am | प्राजु
अरे ते गाणे वाचलेच नाही अजून...
त्या आंब्याच्या चित्रानेच जीव घेतला.. :)
जब्ब्ब्बरदस्त!!!