हिंदू पंचागा प्रमाणे फाल्गुन हा वर्षाचा शेवटचा महिना या महिन्यामधील मुख्य एकच सण शिमगा होय. साधारण पणे फल्गुन शुक्ल पंचमी पासून पौर्णिमेपर्यत हा उत्सव स्थळ कालपरत्वे थोड्या फार फरकाने भारतात सर्वत्र साजरा करण्यात येतो.अशा उत्सवात सामिल होऊन व आपल्या मनावरचा भार हलका करीत व प्रसन्न मनाने आपल्या कर्तव्यकर्मा कडे नव्या उत्साहाने वळूया व हा सण योग्य मर्यादा सांभाळून आनंदाने साजरा करूया.
हिंदू पंचागा प्रमाणे फाल्गुन हा वर्षाचा शेवटचा महिना या महिन्यामधील मुख्य एकच सण शिमगा होय. साधारण पणे फल्गुन शुक्ल पंचमी पासून पौर्णिमेपर्यत हा उत्सव स्थळ कालपरत्वे थोड्या फार फरकाने भारतात सर्वत्र साजरा करण्यात येतो. आपल्याकडे गावांत प्रमुख नाक्यावर होळीची कुंडे तयार करून रोज रात्री पौर्णिमे पर्यत होळी पेटविणयात येते. पौर्णिमेपर्यत होळी पेटविणयात येते. पौर्णमेला मोठी होळी होते व ती मध्ये पुरणपोळीचा वगैरे नैवेद्य अर्पण करण्यात येतो.
उत्तर भारतात फाल्गुन शुक्ल पंचमीपासून अनेक मंडळी लाल व पिवळी वस्त्रे धारण करून गुलाल उधळीत गाणी गात पौर्णिमेपर्यतचे दिवस मोठ्या आनंदाने घालवितात. होलिकादहन विधी मात्र पौर्णिमेस मध्यरात्री करण्याबद्दल सर्वत्र एकवाक्यता आहे. उत्तरे कडील लोक हा उत्सव कृष्णासंबधी आहे असें मानतात. कृष्णाला लहानपणी विषमय दुध पाजून ठार करण्यासाठी आलेल्या व स्वतः कृष्णाकडून शोषण होऊन मारल्या गेलेल्या पूतना मावशीचा हा दहन विधी मानतात.
पुराणांत या संबंधी दुसरीही कथा सांगितली जाते. योगेशवर शंकर आपल्या तपाचरणांत गढून गेले असताना त्यांचे लक्ष पार्वतीकडे वेधावे व त्याच्या मनांत कामविकार निर्माण करावा म्हणून देवांनी कामदेव मदन याची योजना केली होती परंतु आपल्या तपाचरणांत विघ्न निर्माण करणाऱ्या या मदनाला शंकरानी आपला तिसरा डोळा उघडून भस्म करून टाकला, या स्मरणार्थ पौर्णिमेला होळी पेटविली जाते. तिसरा डोळा म्हणजे ज्ञानचक्षू माणसाचा हा ज्ञानचक्षू उघडला की तो विकारवश होत नाही विकारांवर मात करून तो आपले जीवन यशस्वी करतो.
होलीकोत्सव हा वसंतोतेसवाचा आरंभ आहे. आता थंडीचा कडाका कमी झाला हवामान उबदार व सुखकारक सुरू झाले त्या प्रीत्यर्थ आनंद व्यक्त करण्याकरीता
होळीचा कार्यक्रम होतो. गायन वादन नृत्य असा सर्वत्र जल्लोष होतो फळाफुलांनी समृध्दी करणाऱ्या वसंत ऋतुचे हे स्वागत आहे. भविष्य पुराणांत पुढील अर्थाचा श्लोक आहे.
“ हे राजा आज फाल्गुन शुक्ल पौर्णिमा आहे आता थंडीचे दिवस संपले उद्या सकाळी ग्रीष्म सुरु होईल.”
खिश्चन लोकांच्या नाताळात देखील आनंदा प्रीत्यर्थ होळी ( Bon-fire) पेटविण्याची प्रथा आहे. पूर्वी पौर्णिमेनंतर वद्य प्रतिपदेला वसंतोत्सवाचा आरंभ करीत त्यावेळी राजा दरबार भरवी व प्रजाजन त्याच्यावर गुलाल, शेंदूर, चंदन, अबीर वगैरे उधळून राजा विषयी आपले प्रेम व्यक्त करीत हा उत्सव फाल्गुन वद्य पंचमी किंवा रंगपंचमी पर्यत चाले. लोक परस्परांवर गुलाल किंवा रंगीत पाणी फेंकून मोकळेपणाने वागण्याचा आनंद लुटत पुढे अश्या स्वैर वातावरणात अर्वाच्य शब्द किंवा बीभत्स शब्द उच्चारण्याचा अजाण मुलामध्ये अनिष्ठ प्रकार सुरू झाला. सोंगे आणणे, खोडंया काढणे, चोऱ्या करणे, लोकांना निष्कारण सतावणे असे अनिष्ठ प्रकार त्यांत शिरले आहेत. पौढ आणि सुबुध्द लोकांनी मुलांना व अज्ञजनांना योग्य जाणीव करून देऊन व योग्य वळण लावून त्यावर नियंत्रण घालणे जरूरीचे आहे. मनाचे दडपण कमी करून मानसिक ताण सैल करून कोडलेल्या भावनांना थोडाफार वाव देऊन काहीशा खेळीमेळीने व उच्चनीच भाव विसरून परस्परांशी मोकळे पणाने वागण्याचा हा सामाजिक सण आहे. अशा उत्सवात सामिल होऊन व आपल्या मनावरचा भार हलका करीत व प्रसन्न मनाने आपल्या कर्तव्यकर्मा कडे नव्या उत्साहाने वळूया व हा सण योग्य मर्यादा सांभाळून आनंदाने साजरा करूया.
प्रतिक्रिया
15 Mar 2011 - 8:44 pm | शुचि
गेल्या वर्षी या गाण्याबद्दल एक लेखच लिहीला होता. पंडीत छन्नूलाल मिश्रा हे माझे आवडते गायक आहेत. त्यांनी हे होळीचे अनवट गीत फार सुंदर गायले आहे. शंकरांची स्मशानातील भूत-प्रेत-पिशाच्चांबरोबरची होळी असे भयकारी वर्णन या गाण्यात आले आहे. नेहमी आपण कृष्ण आणि राधेचीच होळीची वर्णने ऐकतो. पण शंकराच्या या अद्भुत होळीचे फार मनोहारी वर्णन या गाण्यात आढळते.
माझे होळीचे सर्वात आवडते गाणे!!
15 Mar 2011 - 9:07 pm | नगरीनिरंजन
छान निबंध!
15 Mar 2011 - 11:53 pm | निनाद मुक्काम प...
ह्याचे टंक लेखन पाहून माझे डोळे पांढरे झाले
''इनो हवाय आता मला''
15 Mar 2011 - 10:08 pm | प्राजु
चांगले लिहिले आहे. :)