भुत़काळ वि. भविष्य - १
बरयाचदा आपण विचार करतो कि उद्ययाचा दिवस हा आजपे़क्षा चान्गला असेल, काहितरि नविन घेउन येइल, आज असलेले प्रश्न उद्या पड्णार नाहित किवा सोड्वले जातिल. मग मार्ग मोकळे होतिल, सर्वे सुरळित होइल. असे असते तर हे मग जीवणच काय, पण खरे सान्गु या गोष्टि फक्त ऐकायला किवा बोलायलाच सोप्या आहेत; पण जो आनुभवतो (म्हणजे आपण सर्वेच) त्यालाच काटे टोचतात. तरिहिपण काहि हुषार लोके खुशाल सल्ले (न विचारता/मागता) देत फिरतात. ते खरेच एवढे चिन्तामुक्त अस्तात का ?
जाउद्या तो प्रश्न वेगळा........
आपलेच उदाहरण पहा, शाळेत अस्ताना (कड्क नियम आणि शिस्तिमुळे) अरे यार सम्पुदे एकदाचि हि शाळा मग काय कुणि बोलनारे नाहि आपलाच राज, १२ ला गेल्यावर (बारावि, बारावि) नुस्ताच सर्वाचा गोन्धळ कळ्तच नाहि बारावित कोन मि कि माझ्या घरचि/सोसायटितलि कि बाकिचे उरलेले सर्वे नातेवाइक, कारण कि त्यावरच तुमचे/आमचे...(Engineering, Medical or anythng above that) म्हणजेच "Career" पोट-पाणी अवलम्बलेले. एथे पण सम्पुदे एकदाचि यार हि कटकट, Graduation ला गेल्यावर पाहु....... मग Graduation -(अ/योग्यते नुसार वरिल options मधुन एक किवा आधिच ठरलेले कारण कि फक्त admission तेवढिबाकि असते) ते पण कसे तरि नीघुनच जाते (करणारे करतात अभ्यास)....आणि मग ज्या साठि येवढि खटाटोप केलि ते मह्त्वाचे म्हणजे रोजगार(पोट-पाणी)....
क्रमशः
प्रतिक्रिया
15 Mar 2011 - 7:14 pm | नरेशकुमार
ह्म्म्म
प्रतिक्रिया क्रमश :
15 Mar 2011 - 7:23 pm | विकास
मुक्तक आवडले. :-)
यावरून एक विनोद आठवला: माझ्या एका मित्राने एकदा असेच (गमतीत पण तसे न दाखवता) जाहीर केले की तो हात बघून भविष्य बघायला शिकला म्हणून...त्याबरोबर आमच्या मित्रातीलच एक अपेक्षित उमेदवार लगेच पुढे आला.
ह्या "ज्योतिषी" मित्राने त्याच्या हातावरील प्रत्येक रेषा न्याहाळली आणि म्हणाला, "तुझा सुरवातीचा काळ जरा खडतर आहे... " त्याबरोबर कुतुहलाने त्याने विचारले, "(सुरवातीचा काळ खडतर, तर) मग नंतर काय?" आमचे ज्योतिषी बुवा म्हणाले, "नंतर सवय होईल." :-)
16 Mar 2011 - 11:26 am | अमोल केळकर
हा हा हा
अमोल केळकर
16 Mar 2011 - 1:25 am | नि३
अगदी अगदी ...आमच्या बाबतीत शेम टु शेम केस झाली बर का..
१० वित होतो तेव्हा आमचे तिर्थरुप म्हणायचे..हे महत्वाचे वर्ष आहे ..एकदा का चांगल्या मार्कांनी पास झाला आणी चांगल कॉलेज मिळाल की झाल्..मग बारावीत्..बस हे एकच वर्ष आहे..करीयर घडवणार ..मेक ऑर ब्रेक...
ईंजीनीयरींगला आल्यावर्...बस ईजीनीयरींगची डीग्री चांगल्या परसेंटेज नी मिळाली की मग मल्टी नॅशनल कंपणीत नोकरी..मग काय मोठा पगार नो टेंशन लक्झुरीयस लाईफ्....पण ..पण..
आता कळते मल्टी नॅशनल कंपणीत नोकरी म्हणजे काय आहे ते.... असो..
पण त्यांचेही एका अर्थाने बरोबरच आहे म्हणा...सो ..नो कंम्पलेंट्स..
16 Mar 2011 - 1:54 am | विनायक बेलापुरे
बाप लोक फसवतात ना, गाजर पुढे पुढे धरुन ? :)
त्या गाजराच्या नादात मुळे , भोपळे, आंबे, पपया, सगळे काहि मिळते जाता जाता ...............पण गाजर काही मिळत नाही !
बरोबर ? ;)
16 Mar 2011 - 11:44 am | टारझन
बायक्युरिअस आहात काय ? :)
16 Mar 2011 - 11:50 am | Nile
अग्गागाग्गागागागागागा
ठार मेलो... आयच्या गावात.. अरे टार्या टार्या काय हे.. मारतोस का बे!!
=)) =))
16 Mar 2011 - 12:10 pm | प्यारे१
अरे हे मिपा आहे मुलांनो........मिसळपाव रे!
कस्ले 'कांदा मुळा भाजी अवघी ..... माझी' कर्ता रे?
18 Mar 2011 - 1:31 am | शिल्पा ब
कळले हो!!! तुम्ही १२वीत चांगले मार्क मिळवुन इंजिनीरिंग केलेत अन मल्टी नॅशनल कंपनीत कामाला आहात...अर्थात चांगला पगार, घर, गाडी इ.इ. काही राहिले असेल तर कळवा. ;)
पाणी बाटलीतले पिता कि नळाचे? फर्निचर कोणते वापरता? घरातून काय काय दिसते? आता तुम्हीच सांगताय म्हणुन विचारतेय... हो!!! नाहीतर पुन्हा आदळआपट नको.. ;)