डु-आयडी थेरपी

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
13 Mar 2011 - 1:56 pm

नियतीने कोरले जे असे
चेहऱ्यावरती तसे ते ठसे
नित्य मुखवटे तेच खुपावे
बंध किती हे सहन करावे?

नाव जसे मिळविले कर्माने
निष्कलंक नी अबाध्य जपणे
जपती सगळे प्राणपणाने
झुकतो आत्मा ह्या ताणाने

मुक्त श्वास घेण्या तापातून
उपाय असती फ़ार पुरातन
नाट्य, तमाशा, किंवा लेखन
प्रदान करीती अलगच दर्शन

कोणी जाती हास्यगृहांतरी
टिंगू अथवा लंबू दिसे जरी
हसूनी स्वत:ला खरे पोटभरी
मुखवट्याची बोच नष्ट करी

जाल जादुई बघा उभरले
चेहरा पुस्तक तेथ उमटले
ब्लॉग विविध आयडींने केले
समाज दर्पण जणू उभरले

महाजाल बघ विणले घट्ट
का करिशी स्वत्वाचा हट्ट?
धरी आयडी नाना कळा
घेई श्वास बेबंद मोकळा

संस्थळींचे जादुई दर्पण
तणाव-नाशक मुक्त वर्तन
दिसुही शके ना स्वत: जसे
रूप दर्पणी भिन्न दिसावे

हे ठिकाणकविता

प्रतिक्रिया

निनाव's picture

13 Mar 2011 - 2:04 pm | निनाव

छान आहे.

निवेदिता-ताई's picture

13 Mar 2011 - 5:51 pm | निवेदिता-ताई

मस्त....................खुप आवडले!!!!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Mar 2011 - 5:58 pm | निनाद मुक्काम प...

झकास आणि सकस /सरस

पैसा's picture

13 Mar 2011 - 6:04 pm | पैसा

तुमचे डु. आयडी. किती? ;)

प्रकाश घाटपांडे's picture

13 Mar 2011 - 7:13 pm | प्रकाश घाटपांडे

खर्‍या आयडी बी विविध अंतर्प्रतिमेने वादित्/संवादित असतात
आपलाच वाद आपणाशी

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Mar 2011 - 9:35 pm | बिपिन कार्यकर्ते

+१

प्रीत-मोहर's picture

13 Mar 2011 - 8:13 pm | प्रीत-मोहर

मस्त ......आवडली कविता

टारझन's picture

13 Mar 2011 - 8:19 pm | टारझन

तुमचा दुसरा आयडी नक्की पाषाणभेद किंवा प्रकाश१११ किंवा गंगाधर मुटे आहे .. बरोबर की नाही ? ;)

अरुण मनोहर's picture

13 Mar 2011 - 8:26 pm | अरुण मनोहर

आय एम ऑनर्ड!

अरुण मनोहर's picture

13 Mar 2011 - 8:27 pm | अरुण मनोहर

प्रकाटाआ.

प्राजु's picture

14 Mar 2011 - 2:35 am | प्राजु

वावा!! आवडले. :)

प्रकाश१११'s picture

14 Mar 2011 - 7:48 am | प्रकाश१११

अरुण मनोहर - छान .आवडली कविता
नाव जसे मिळविले कर्माने
निष्कलंक नी अबाध्य जपणे
जपती सगळे प्राणपणाने
झुकतो आत्मा ह्या ताणाने

खूप शुभेच्छा ..!!

नगरीनिरंजन's picture

14 Mar 2011 - 7:59 am | नगरीनिरंजन

छान कविता!
डु-आयडी थेरपी घेऊन बघावी असं वाटतंय.

स्पंदना's picture

14 Mar 2011 - 8:05 am | स्पंदना

अच्छा ! ही पुर्ण कविता आहे तर.

सुन्दरच!!

नरेशकुमार's picture

14 Mar 2011 - 12:06 pm | नरेशकुमार

डु-आयडी मंजे काय ?
डु-आयडी कसा काढतात ?

आपली तर बुवा जेवढे काय आयडी आहेत ति सर्व अस्सल/वरिजनल आहेत.