हत्तीदादा हत्तीदादा -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
12 Mar 2011 - 2:31 pm

हत्तीदादा हत्तीदादा
कसला आहार घेतो रे ?
अगडबंब शरीर बघून
शत्रू गार होतो रे !

ससेभाऊ ससेभाऊ
कुठला साबण वापरतो ?
शुभ्र रेशमी अंगाला
डाग एकही ना पडतो !

अस्वलकाका अस्वलकाका
कोणते तेल लावतो रे
केस नेहमी दाट काळे
गुपित काय सांग बरे ?

हरणा हरणा - थोडं थांब
कसले बूट घालतो सांग ?
उड्या मारत चपळाईने
लांब लांब टाकतो ढांग !

माकड माकड - हूप हूप
कुठली फळे खातो खूप ?
फांदीवरच्या कसरतीने
आम्हाला तू करतो चूप !

सिंहराज सिंहराज -
कोणत्या चघळता गोळ्या ?
त त प प करतो आम्ही
ऐकून तुमच्या डरकाळ्या !

कविताबालगीत

प्रतिक्रिया

निनाव's picture

12 Mar 2011 - 2:44 pm | निनाव

वाह. कित्ती सुंदर. खूपच छान..अगदी गोड लिहिले आहे.

हरणा हरणा - थोडं थांब
कसले बूट घालतो सांग ?
उड्या मारत चपळाईने
लांब लांब टाकतो ढांग !

लहान मुलांसाठी लिहिणे सर्वात कठिण आहे. आणि तुम्ही ते अगदी सहज केले आहे.

- पुलेशु.

निनाव's picture

12 Mar 2011 - 2:44 pm | निनाव

वाह. कित्ती सुंदर. खूपच छान..अगदी गोड लिहिले आहे.

हरणा हरणा - थोडं थांब
कसले बूट घालतो सांग ?
उड्या मारत चपळाईने
लांब लांब टाकतो ढांग !

लहान मुलांसाठी लिहिणे सर्वात कठिण आहे. आणि तुम्ही ते अगदी सहज केले आहे.

- पुलेशु.

डावखुरा's picture

12 Mar 2011 - 8:42 pm | डावखुरा

खुप छान निरागस...

नरेशकुमार's picture

14 Mar 2011 - 9:00 am | नरेशकुमार

आवडले !

विदेश हे आजपासुन बालकवी आहेत मिपा चे ... जियो !!

-(मिपा चे मालकवी) पु. सी. फडके