माझ्या एका ईंग्रजी कवितेचा अनुवाद इथे सादर करीत आहे!
शालु हिरवा पांघरलेला अन निळा तिचा पदर असे
भोर नयन तिचे ते निळेशार पाहुनी अमुचा जीव वसे
महान अशी ती राणी उभी कशी दिमाखात
वंदन करती वाकुनी सारे जोडुनी दोन्ही हात
क्षण ते हर्षाचे टिकले नाही काळ फार
ग्रुहित धरिले आम्ही तिला प्रत्येक वार
शालु भरला चिखलाने पुरता यथासांग
पदर तिचा तो फाडला घडले कसे हे पांग
दयनीय अवस्था ही तिची दुर्लक्षीली आम्ही
कृतुघ्न बाळांना जरी अजुन ती लावी पान्ही
सुर्य आणि चंद्र तिला घेत बाहु पाशात ओढी
"पर्वा नाही तुझी कुणा अन कुणा नाही गोडी"
काय तिने मागितले प्रेम तिचे का खोटे?
अवखळ अल्लड प्रेम अपेक्षिले, घडले काय मोठे?
गवताची कुरणे बनली सुके माळरान आता
"घात केला मोठा त्यांनी" ती म्हणते जाता जाता
आशा अजुनी करते ती त्यांच्या कृतज्ञतेची
वेळ मात्र थांबत नाही, ही घंटा धोक्याची.
प्रतिक्रिया
11 Mar 2011 - 9:32 pm | निनाव
छान आहे. पुलेशु.
14 Mar 2011 - 5:31 pm | विश्वनाथ मेहेंदळे
कवितेचा आशय आवडला.