कोणे एके काळी, मिपावर जेव्हा काहीशे सदस्यच होते, तेव्हा आम्हाला कोणालाही हापिसामधे काहीच काम नसायचं. परा (परिकथेतील राजकुमार) हा आधी नव्हताच आणि आला तेव्हा नवा होता, टिंगीचा टिंग्या झाला असला तरी तेव्हा तो "दुशली ब" मधे नव्हता. आनंदयात्री, धमाल मुलगा, छोटा डॉन, मेघना भुस्कुटे, ब्रिटिश टिंग्या, ऋचा (ही पार गायबच झाली आहे), मी असे आम्ही निरुद्योगी लोकं मिपाच्या खरडफळ्यावर पडीक असायचो. अधूनमधून कोणी मैत्री किडे यायचे, स्त्री आयडींना खरडी टाकायचे आणि त्यावर इनोबा म्हणे, टिंग्या, बिपिन वगैरे लोकं "माझ्याशी पण मैत्री करणार का?" असा 'लष्कर-ए-खरडा'चा हल्ला करायचे. "कुठून या स्त्री आयडींना खरडी टाकल्या", असं त्या किड्यांना होत असेल. तर थोडक्यात काय, त्या काळात मिपा म्हणजे, आई सांगायची त्या जुन्या ठाण्यासारखं होतं, संध्याकाळनंतर घंटाळी मंदिराकडे एकट्याला जायला भीती वाटेल एवढं छोटं. तेव्हा आम्ही खरडफळ्यावर शाळेत असल्यासारखं बोलायचो. म्हणजे मुलींनी मुलांना आणि मुलांनी मुलींना आडनावाने हाक मारायची, "ए भुस्कुटे", "ए मुळे" अशी!
तर मुख्य मुद्दा असा की गेल्या आठ दहा महिन्यात काही महान मिपाकरांना भेटण्याची संधी मिळाली. एकमेकांशी बोलताना, अर्थातच लिखाण वाचून, माणूस कसा असेल याचे अंदाज घेतले होते; प्रत्यक्ष भेटीनंतर ते कितपत योग्य ठरले याचीही मनात उजळणी झाली. यथावकाश चांगली ओळख झाल्यावर एकमेकांबद्दलच्या या मतांची देवाणघेवाणही झाली. माझी स्वतः आणि इतरांबद्दलची मतं इथे देत आहे. तुम्हीही तुमची स्वतः आणि इतरांबद्दलची मतं सांगा. नेहेमीप्रमाणे कोणालाही व्यक्तीगत, टोचेल असं न बोलण्याची खबरदारी घ्यावी ही विनंती.
सुरूवात हुशार विद्यार्थ्यांपासून करावी.
धनंजय - हा वर्गातल्या सर्वात हुशार विद्यार्थ्यांपैकी एक. पण वर्गात पहिला नंबर क्वचितच, नंबर साधारण पहिल्या पाचात येतो, पण पैकीच्या पैकी मार्कांचा अजिबात सोस नाही. वर्गात नेहेमी शेवटच्या बाकड्यावर बसणार, टवाळक्या, भाषणं, वाचन अशा अभ्यासेतर गोष्टींमधे लक्ष. मुळात चौफेर विद्यार्थीच, पण खोड्या काढण्यातही तेवढाच रस. तरीही वर्गातला बराचसा वेळ शेवटच्या बाकावर बसून इतर पुस्तकं वाचणे, काहीतरी प्रयोग करणे ... 'शाळा'तला चित्र्या.
नंदन - हा पण अतिशय हुशार मुलगा. पण हा कायम पहिल्या, अगदीच उशीर झाला तर दुसर्या बाकावर बसणारा. याचा नंबरही पहिल्या पाचातच. वर्गात बसून नेहेमी शिक्षकांकडे लक्ष देणारा, अगदी रटाळ तासांमधेही शिकवण्याकडेच लक्ष देणारा आणि टवाळक्या, उनाडक्या फक्त पी.टीच्याच तासाला. चित्रकलेच्या तासालाही नंदन मराठीचं पुस्तक काढून त्याचं इंग्लिशमधे भाषांतर करायचा प्रयत्न करतो असं धम्या मला सांगत होता.
धम्या - धमाल मुलगा हा प्राणी सतत वेगवेगळ्या गोटांमधून बदली करून घेत असतो. कधी मुलींचा ग्रूप, कधी मुलांचा तर कधी मुला-मुलींचा ग्रूप. सतत बदल्या करायच्या आणि सगळ्यांच्या डब्यातला खाऊ खायचा हाच याचा उद्योग. तास सुरू असताना कुठल्या कोपर्यातून थालिपीठाचा घमघमाट सुटला की धम्या तिथे बसला आहे हे समजावं. अभ्यास वगैरे गोष्टींशी याचं काहीही घेणं देणं नाही. परीक्षा आल्या की वर्गातली सगळी मुलं-मुली मित्रकर्म म्हणून याला नोट्स आणून देतात. त्यातसुद्धा छोटा डॉन, नंदनसारखी वेळच्या वेळी अभ्यास करणारी मुलं परीक्षेच्या आधी धम्याची उजळणी घेऊन देतात, असुर, मेघवेडा याला आपल्या पेप्रातून कॉपी करू देतात आणि धम्या बर्यापैकी मार्कांनी पास होतो.
छोटा डॉन - हा शाळेत नेहेमीच उशीरा येतो. त्यामुळे याची ठरलेली जागा नाही, जागा मिळेल तिथे हा बसतो. खरंतर याला गप्पा मारायची हौस लै दांडगी आहे. पण हा काय बोलतो कुणालाच कळत नाही, त्यामुळे सगळे नुस्ते हो ला हो करतात. खरंतर हा मुलगा तसा स्वभावाने एकदम गरीब आहे, त्यामुळे "शांतपणे बोल रे" असं त्याला सांगायलाही थोडं विचित्र वाटतं. गणित, विज्ञान वगैरे विषयात याला फार अभ्यास न करताही निदान ९९% मिळतात. पण तरीही हा कधी पहिल्या पाचात नसतो. भाषा विषयात मार खातो, पण त्याला काही त्याचं वाटत नाही. स्वभावाने शांत वगैरे असल्यामुळे भाषा शिक्षकांनाही त्याचा राग येत नाही.
मेघवेडा - हा नावाप्रमाणेच थोडा वेडा आहे. साधारणतः मधल्या बाकांवर बसतो. तसा शांत विद्यार्थी आहे, पण मधल्या सुट्टीत हा फार आवाज करतो. आपल्या मोठ्या आवाजात हाकाट्या मारायच्या, कोणालातरी चावी मारून गाणी म्हणवून घ्यायची, कोणाची मारामारी लावून द्यायची आणि नंतर धम्याबरोबर जाऊन ती सोडवायची हा याचा आवडता उद्योग. तासाला कधी लक्ष द्यायचं, कधी कंटाळला तर रेघोट्या मारायच्या, कधी चुपचाप फुली-गोळा खेळायचं हा याचा उद्योग. आणि यात याचा accomplice आहे असुर.
असुर - हा वर्गात किती दिवस असतो असा प्रश्नच पडतो. सतत आजारपण, घरची लग्न कार्य, असल्या काय काय कारणांमुळे हा विद्यार्थी वर्गात कमीच दिसतो. पण हा सुद्धा तसा हुशार विद्यार्थीच आहे. वर्गात असतो तेव्हा मेव्यासोबत हा नेहेमी दिसतो. दिसायला तसा शांत आहे, पण सगळा दंगा करतो. गणेशोत्सव मंडळाचा हा खंदा कार्यकर्ता आहे. विज्ञान आणि गणित हे याचेही आवडते विषय.
मस्त कलन्दर - हिला खरंतर मागच्या बाकड्यांवरच बसायला आवडतं; पण अगदीच बुटुकबैंगण असल्यामुळे हिला सगळे शिक्षक पुढेच बसवतात. अगदीच नाईलाजाने ही मधल्या बाकांवर बसते. एकीकडे चित्र काढायची, शाळेत येताना रस्त्यातून गोळा केलेली फुलं इतरांकडे पाठवायची आणि इतरांना छळायचं हा हिचा प्रमुख उद्योग. वर्गात तास सुरू असताना सतत कमेंट्स करायच्या आणि इतरांचं लक्ष वेधून घ्यायचं यात हिचा हातखंडा आहे. तरीही मॉनिटर होण्याची हिची प्रचंड इच्छा आहे.
परिकथेतील राजकुमार - कुठल्याही बेंचवर बसला तरी पर्याला खिडकीच हवी असते आणि सगळं लक्ष खिडकीबाहेरच. पर्या, धम्या, मेव्या, डॉन्या आणि असुर असा हा एक छोटा ग्रुप आहे. डॉन्या हा त्यांचा अभ्यासातला म्होरक्या आहे, तो या सगळ्यांचा बुडलेला अभ्यास घेतो. पर्याला याच गोष्टीमुळे डॉन्या आवडत नाही, पण पास झाला नाही तर घरून फटके पडतील म्हणून तो डॉन्याला सहन करतो. शिवाय डॉन्या त्याला मुलींशी कसं बोलायचं या विषयात 'मानतो' त्यामुळे या दोघांचं गुरू-शिष्य हे नातं थोडं काँप्लिकेटेड आहे.
निखिल देशपांडे - याला वर्गात कोणीही निखिल किंवा देशपांडे म्हणत नाहीत. एकतर पूर्ण नाव निखिल देशपांडे किंवा निदे. अगदीच थोडी धम्या वगैरे हूड मुलं त्याला निख्या म्हणतात, पण तो अपवादच. याचा ओढा मध्यममार्गाकडेच. शांतपणे मधल्या बाकांवर बसायचं आणि मागच्या मुलांचा दंगा ऐकायचा हा यांचा छंद. शिवाय निदे आकाराने मोठा, उंच वगैरे असल्यामुळे त्याच्यामागे वर्गातली बारकी पण उनाड मुलं बरोब्बर लपतात. त्या पोरांमधे हा एकदम आवडता आहे, पण निदेला त्याचं काही नसतं. मी बरा आणि माझा अभ्यास बरा, यात तो खूष असतो.
मुक्तसुनीत - वर्गातल्या नवीन मुलांना हा मुलगा फार शांत, अभ्यासू वाटतो. अभ्यासात यांचा काही प्रश्न नाहीच, पण ओळख झाल्यानंतर हा मुलगा अजिबात शांत नाही हे समजतं. नेहेमी शेवटून दुसर्या बाकावर बसणार आणि सगळं लक्ष मागच्या बाकावरच्या अदिती, धनंजय आणि राजेश या टवाळांकडे. घरून सायन्सला जाण्याचा आग्रह होतो म्हणून हा विज्ञानाच्या तासाला लक्ष देतो, पण मुळात आवड भाषा विषयांची. ग्रंथालयातली कवितांची पुस्तकं शाळेतल्या मराठीच्या शिक्षकांनी वाचली नसतील पण याने वाचलेली असतात आणि ते सगळं त्याला समजतंही. खेळाच्या तासालाही हा कवितांचा 'आस्वाद' घेत बसतो. घरच्यांच्या धाकामुळे तरी का होईना, हा पण पहिल्या पाचातलाच.
बिपिन कार्यकर्ते - हा वर्गाचा एक मॉनिटर. वर्गात फार दंगा नाही, सगळ्यांशी प्रेमाने बोलतो, वर्गात आलेल्या नवीन मुलांशीही प्रेमाने बोलतो त्यामुळे शिक्षकांनाही हा मुलगा आवडतो. तसा अभ्यासाला फार हुशार नाही, फार वाईटही नाही. सगळ्यांशी संवाद साधता यावा म्हणून हा मधल्या बाकांवर बसतो. मनातून त्याला नंदन, जंतू यांच्यासारखं पहिल्या बाकावरचं 'आदरणीय' विद्यार्थी व्हावं असं वाटतं, पण मुक्तसुनीत, राजेश, धनंजय यांच्यासारखा दंगा करावा असंही त्याला वाटतं. थोडा कन्फ्यूज्ड.
राजेश घासकडवी - धनंजय आणि राजेश एकाच बाकावर बसतात आणि गंमत म्हणून कसल्याही पैजा, शर्यती लावतात; उदा: ठराविक आकाराच्या कागदाला कमीतकमी घड्या घालून बनवलेलं कोणाचं विमान जास्त चांगलं उडेल, असं काहीसं. विज्ञान असो वा भाषा विषय, याला सगळं जमतं. याचाही नंबर पहिल्या पाचात, बहुतेकदा तीनातच. धनंजयचे वर्गात कसले कसले प्रयोग सुरू असतात तेव्हा त्याला त्रास देण्याच्या मिषाने काही ना काही सुचवत रहायचं हा याचा उद्योग; पण धनंजयला यामुळे नवनवीन कल्पना सुचत रहातात आणि मग दोघांच्या वादात इतर बॅक बेंचर्सची मस्त, अभ्यासपूर्ण करमणूक होते.
चिंतातुर जंतू - नुकताच परगावातून या शाळेत आलेला, जाड चष्मा, सतत वाचन, लेखनामुळे किंचित झुकलेले खांदे आणि सतत कसला ना कसला विचार नाहीतर प्रश्न असा एकदम हुशार आणि शिक्षकप्रिय विद्यार्थी. विज्ञान, गणित, भाषा, इतिहास, चित्रकला, सगळ्या विषयात एकदम हुशार. वर्गात सगळ्या तासांना लक्ष देऊनच याचा बर्याचदा पहिला नंबर येतो, पण शारीरिक शिक्षण विषयात कसंबसं पास करावं लागतं. हा वर्गात आपणहून नंदन आणि धनंजय सोडून कोणाशीही बोलत नाही. शाळेत असल्यापासून विविध मासिक, नियतकालिकांमधे याचं लिखाण छापून येत असल्यामुळे इतर सगळ्यांना याच्याशी बोलण्याची इच्छा असते; पण हा वर्गातल्या नंदन आणि धनंजय सोडून फक्त ठराविक मुलांशीच बोलतो; ज्यांच्याशी तो बोलत नाही त्यांना याचं फार वाईट वाटतं.
श्रावण मोडक - एन.सी.सी आणि स्काऊट दोन्ही गोष्टींमधे असणारा वर्गातलाच काय शाळेतला पहिला विद्यार्थी. या सगळ्या समाजसेवेमुळे त्याची वर्गातली उपस्थिती कमी असते. मधल्या बेंचवरचं या विद्यार्थ्याचं अस्तित्त्व दिसत रहातं. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र वगैरे विषयात यांचा अभ्यास दांडगा आहे आणि नागरिकशास्त्राच्या नोट्सतर जंतू, धनंजय यांच्यासारखे हुशार विद्यार्थीही मोडककडून घेतात. वर्गातल्या मुलीच नव्हे तर मुलंसुद्धा याला आडनावानेच हाक मारतात अशी याची ख्याती आहे.
सहज - या विद्यार्थ्याचा बाक ठरलेला नसतो. सहजला प्रत्येकाच्या मनात प्रत्येक क्षणी काय चाललेले आहे याचे विलक्षण कुतूहल असल्यामुळे तो बाका-बाकामधून, टेबलाखालून, फळ्यामागून सरपटत हिंडत असतो. वर्गात लक्ष द्यायचं असेल तरीही,एकदा हजेरी घेऊन झाल्यावर, तो स्वतःचं दप्तर ठेवलेलं असतं त्या बाकाच्या खालीच बसलेला असतो. एकदा एक संपूर्ण परीक्षाही त्याने टेबलाखाली बसून दिली होती असा जंतूने लिहीलेल्या एका निबंधाचा अर्थ आहे असा नंदनचा सिद्धांत आहे.
३_१४ विक्षिप्त अदिती - शाळेच्या वेळेच्या दहा-पंधरा मिनीटं तरी निदान पोहोचायचं म्हणजे मागचं बाकडं निश्चित मिळतं. शिक्षक चांगले असतील तर कोणत्याही विषयाचं वावडं नाही, पण स्वतः काहीही कष्ट घ्यायचे नाहीत. पीटीच्या तासाला आबाधोबी, सायकलवरून पाडापाडी वगैरे खेळ खेळण्यात रस. रटाळ तासांना स्वतः टिवल्या बावल्या करायच्या आणि इतरांनाही त्रास द्यायचा, खोड्या काढायच्या, माकडचाळे करून आजूबाजूच्या लोकांची करमणूक करायची. अगदीच ओरडा बसत असेल तर निखिल देशपांडे, मुक्तसुनीत या मुलांच्या मागच्या बाकड्यावर बसून झोपा काढायच्या. या असल्या उद्योगांमुळे हुशार पण टवाळ मुलांच्या गुडबुकात जाऊन त्यांच्याबरोबर परीक्षेच्या काळात अभ्यास करता येतो आणि बरे मार्क मिळतात.
"वर्गा"तल्या इतर मुलांचं स्वतः आणि इतरांबद्दल काय मत आहे हे वाचायला मला आवडेल. तर मग होऊन जाऊ द्या.
(कालानुक्रमे) श्रेयअव्हेर: जंतू, राजेश, मुक्तसुनीत
प्रतिक्रिया
10 Mar 2011 - 1:24 pm | पर्नल नेने मराठे
अरे ही तर 'अ' वर्गातली हुशार मुले दिसत आहेत.
आम्ही 'ब' वर्गातले आहोत ;)
10 Mar 2011 - 2:20 pm | सहज
बी ग्रेड चुचु?? छे छे
चुचु तर श्रीमंत बापाची, कार मधुन येणारी व अभ्यास सोडून.. लक्ष देणारी, हाँगकाँगहून आणलेले दप्तर, कंपास बॉक्स, वॉटरबॅग वरुन शायनिंग मारणारी, ढ पोरांचा हरकाम्या करायचा क्षीण प्रयत्न करणारी. नंदनकडून न चूकता सगळ्या वह्या आणून कॉप्या मारणारी, अदितीची पक्की दुश्मन पण मकी बरोबर जमवून घेणारी.
(अजगर) सहज
10 Mar 2011 - 3:08 pm | कुंदन
>> ढ पोरांचा हरकाम्या
तुझ्याकडुन जर्नल्स पुर्ण करुन घ्यायची ना रे ? ;-)
10 Mar 2011 - 5:45 pm | विश्वनाथ मेहेंदळे
ओ ताई, सहज विचारतो, तुम्ही बालमोहन वाल्या आहात का ?
11 Mar 2011 - 12:55 am | कुंदन
मला पण वाटलेच होते , बहुधा चुचु बालमोहन मध्ये मराठी ची शिक्षिका असाव्वी म्हणुन. ;-)
11 Mar 2011 - 12:47 am | विनायक बेलापुरे
अ ब क ड , अ आ इ उ असलं काही नसतं हल्ली.....नाहितर मने दुखावतात ...... समानता आलीये .....
परवा एका शाळेत गेलो होतो
७ वी कावेरी, ८ वी आरवली असली तुकड्याना नावे पाहून तृप्त झालो. :)
10 Mar 2011 - 3:08 pm | नरेशकुमार
माझी पाचवि ढ चालू आहे. पहिलि ते चौथि ATKT नेच पुढे आलो.
कुठल्याच विशयाचा वावडं नाय पन कोनताच विशय कळत नाही.
कधिकधि नाहीनाही ते उपद्व्याप करुन मार खाउन खाउन स्वःताचेच तोंड फोडुन घेतो.
10 Mar 2011 - 3:12 pm | मृत्युन्जय
सही जम्या है.
10 Mar 2011 - 3:18 pm | चिंतातुर जंतू
आमच्या मते एकदम फर्स्ट क्लास 'अदितीसाठी एकदा जोरदार टाळ्या' म्हणावं अशी उत्तरपत्रिका परफॉर्मन्स! इतके दिवस केलेल्या अभ्यासाचं खोड्यांचं चीज झालेलं दिसतंय. डिस्टिन्क्शन 'तोडलंस, मित्रा!' सुद्धा सहज मिळालं असतं पण थोडा अभ्यास वांडपणा कमी पडला आहे, एवढंच. हा बहुधा अलीकडच्या प्रगल्भ दूषित संगतीचा दुष्परिणाम असावा. असो. आता आमचे सन्माननीय टवाळ परीक्षक काय म्हणतात ते पाहूया.
- हुशार, प्रगल्भ अच्र्त्/बव्ल्त अशा विविध ओळखींनी भंजाळलेला अनंत काळचा आधुनिकोत्तर विद्यार्थी
10 Mar 2011 - 3:18 pm | गणेशा
छान लिहिले आहे ...
अवांतर :
जरा कोणीतरी "ढ" मुलांबद्दल लिहा की . ही सगळी हुशार झाली.
"ढ" मुले कदाचीत नापास झाली असतील् .. आणि नविन येणार्या मुलांच्या बाकड्यावर बर्याच गोस्टी शेअर करत असतील.. किस्से .. कथा .. आणि जुने जाणत्यांबरोबर अलगद नविन मुलांच्याप्रमाणे अचानक नविन पण भासत असतील ...
10 Mar 2011 - 3:19 pm | गणेशा
प्र.का.टा.आ.
10 Mar 2011 - 4:46 pm | वपाडाव
आमचं अर्ध जीवन तर प्र.का.टा.आ. करण्यात चाल्लंय.
कधी वेळ येणारेय आमच्यासारख्यांवरचे लेख लिहिण्याची देव (आणंद नव्हे) जाणे.
-
दगडावरची रेघ... एक फुक्टं... बासुंदी जीवन
(ह. घ्या.)
10 Mar 2011 - 3:22 pm | निखिल देशपांडे
मिसळपावच्या लोकांवर लेख लिहुन किंवा मिसळपाव संबंधी लेख लिहुन प्रतिसाद मिळवण्याचा मागे तुम्ही लागलात याचे सखेद आश्चर्य वाटले.प्रवासाबद्दल नारायाणगावच्या लिहिणार्या विदुशी आपणच का असे आज विचारावेस वाटते. या एवजी जुन्या अर्धवट कथा पुर्ण केल्या असत्या तर परमानंद झाला असता. आपल्यात असलेली प्रतिभा ही अशी वाया जात असताना बघवत नाही म्हणुन बोलतो. याउपरचा तुमचा जवाब आम्हाला माहित आहे. मौजमजा, विरंगुळा या सदराखाली हे लेखन केलेले आहे याची संपुर्ण पणे माहिती आहेच.
असो!!! आमचा प्रतिसाद आपल्याला बोचला असल्यास क्षमस्व!!!
(मधल्या बाकावरचा) निदे
10 Mar 2011 - 3:49 pm | परिकथेतील राजकुमार
श्री. निदे ह्यांचा वरिल प्रतिसाद वाचुन बिलकुल आश्चर्य वाटले नाही. ते असेच काहीतरी लिहुन इतर धडपडणार्यांचा पाणउतारा करण्यात कायमच स्वारस्य दाखवत आले आहेत.
एकतर स्वतः काही लिहित नाहीत, प्रतिसादांच्या नावानी तर शंखच ! बरं जे प्रतिसाद देतात ते पण असे लेखकाला निरुत्साहीत करणारे असतात. एक बॅचलर रस्सा काय बनवायला शिकले, दिसेल त्याला ज्ञान देत असतात. अर्थात त्यांच्यावर ह्या लेखात कमी माहिती असल्याने व त्यांच्या आधी माझी ओळख करुन दिल्याचा देखील हा राग असु शकेल.
उगाच लंबुळका चेहरा करुन, जडजड आणि अपमान करणारे प्रतिसाद लिहायचे आणि आपण प्रगल्भ असल्याचा आव आणायचा अशी सध्याची फॅशनच आहे. बहुदा त्याच आघाडीवर सध्या निदे असावेत.
असो...
एकाच वर्गात शिकत असल्याने आमचा प्रतिसाद वाचुन ते दुखावणार नाहीत अशी आशा करतो.
(निदे आमचा बाक सोडून आजकाल दूसर्या बाकावर बसतात म्हणुन आम्ही मुद्दाम असा प्रतिसाद दिला आहे असा कोणी गैरसमज करुन घेऊ नये)
10 Mar 2011 - 5:26 pm | निखिल देशपांडे
जाहिररित्या लोकांना "डायरी लिहा" असा सल्ला देणार्या तुमच्या सारख्या सदस्याचा प्रतिसाद वरील वाक्य पाहुन हसु आले..
12 Mar 2011 - 12:55 pm | नन्दादीप
निदे +१.
10 Mar 2011 - 3:35 pm | श्री गावसेना प्रमुख
प्रमुख अन अध्यक्ष यान्ना सोडुन दिल की
आपला विधानसभाध्यक्ष,
10 Mar 2011 - 4:48 pm | गणपा
हुच्चभ्रु लोकांणी हुच्चभ्रु लोकाणसाठी काढलेला हुच्चभ्रु धागा. ;)
प्रगल्भ (दुस्री 'फ') गण्या.
11 Mar 2011 - 11:33 am | बबलु
कंपु लोकांणी कंपुतल्या लोकाणसाठी काढलेला तद्दन फालतु धागा.
10 Mar 2011 - 5:11 pm | रमताराम
कॉंग्रेसमधे अधूनमधून मूळचे नि - म्हणूनच व्याख्येनुसार - 'निष्ठावान' काँग्रेसवाले नि कलमाडींचे समर्थक ते गैरनिष्ठावान - किंवा फिरते राजकारणी - असे दोन गट असतात. कलमाडी गटाने - अर्थात घुसखोरांनी - फार हातपाय पसरायला सुरवात केली की अधूनमधून निष्ठावान गटाचे मेळावे सुरू होतात.
(निष्ठावान गटाने ह. घ्यावे हे. वे. सां. न. ल.)
(घुसखोर) रमताराम
10 Mar 2011 - 5:15 pm | परिकथेतील राजकुमार
अच्छा इतके दिवस मला ररा म्हणजे रमताराम असे वाटायचे, पण दुसरा रा म्हणजे 'राणे' आहे होय ? ;)
10 Mar 2011 - 7:31 pm | रमताराम
पण दुसरा रा म्हणजे 'राणे' आहे होय ?
फार लवकर समजले. पण ते तुमच्या हायकमांडने आम्हाला संपादक करण्याचे वचन काही पाळले नाही बर्का.
(चला आपली सामूहिक धुलाई सुरू होण्याच्या आत हायकमांडची भेट घेतली पाहिजे.)
(फिरता राजकारणी) रमताराम
10 Mar 2011 - 5:26 pm | विकास
मिपाची तुलना काँग्रेसपक्षाशी आणि मिपाकरांची काँग्रेसजनांशी केल्याबद्दल निषेध. लवकरच तुमच्या अनुदिनीवर मोर्चा काढता येईल का यासंदर्भात चर्चा करून (जे काही हाय कमांड म्हणेल त्याप्रमाणे) निर्णय घेण्यात येईल. ;)
10 Mar 2011 - 6:15 pm | छोटा डॉन
विकासरावांशी सहमत आहे.
फक्त ह्यामध्ये 'थत्तेचाचा' ह्यांचेही मत ग्राह्य धरले जावे अशी उपसुचना मांडतो, जे काँग्रेस पक्षाचे जुने निष्ठावंत समर्थक आहेत.
असो.
लेख आवडला.
मात्र ती शाळाही संपली आणि त्याबरोबरचे बालपणही संपले, एकेकाळी दंगा घालायला जी मजा यायची त्याची आजही आठवण होते पण आजकाल दंगा करावासा वाटत नाही, काळ बदलला.
बाकी ह्या सर्व सोबती गड्यात 'डांबिसकाका' हे अजुन एक नाव.
कोणी म्हणतात ते शाळेत शिक्षक होते, कोणी म्हणतात ते शाळेच्या बोर्डावर होते अजुन कोणी म्हणतं की शिक्षणमंडळाचे सदस्य आहेत.
पण आम्हाला तसे वाटले नाय, लहान पोरांच्याबरोबर पोर होऊन ते दंगा घालायचे.
मी, इन्या, आंद्या, धम्या आणि पिडांकाका अशी मस्त गँग होती.
बाकी वर जे आमच्याबाबत लिहले आहे ते ९९.३३% खोटे आहे असे सांगतो.
- ( जुना शाळकरी ) छोटा डॉन
10 Mar 2011 - 7:49 pm | विकास
फक्त ह्यामध्ये 'थत्तेचाचा' ह्यांचेही मत ग्राह्य धरले जावे अशी उपसुचना मांडतो,
१०००००% सहमत. :-)
लेख आवडला....मात्र ती शाळाही संपली आणि त्याबरोबरचे बालपणही संपले ... इन्या, आंद्या, धम्या आणि पिडांकाका अशी मस्त गँग होती.
सहमत!
लेखनात "वेगवेगळी फुले उमलली, रचुनी त्यांचे झेले, एकमेकांवरी उधळले, गेले ! ते दिन गेले " (हे गाणे जरी खूप आवडत असले तरी) असा उदास सूर लावण्या ऐवजी खुसखुशीत आनंदी आठवण असल्याने वाचायला आवडले. एक सुचवावेसे वाटते, माजी विद्यार्थी संघ का काढत नाही? (फक्त वर्गणी गोळा करू नका म्हणजे झाले. ;) ) इथे जसे मेकॅन्झी, आयबीएम वगैरेमधून बाहेर पडणार्यांना त्या त्या कंपन्यांचे अॅलम्स (alumni) म्हणतात, त्यातून त्यांची ओळख समजते... तसेच आपण MiPa Alumni नावाची नवीन वर्गवारी तयार करता येईल! एकदा तसे जालावर स्वतःची ओळख करून दिली की उर्वरीत बोलावे लागणार नाही! :-)
11 Mar 2011 - 1:07 am | पिवळा डांबिस
पैल्यापरथम समद्या हुश्शार प्वॉराप्वॉरींना ह्या अडानी डांबिसाचा दंडवत!!!
:)
बाकी ह्या सर्व सोबती गड्यात 'डांबिसकाका' हे अजुन एक नाव.
कोणी म्हणतात ते शाळेत शिक्षक होते, कोणी म्हणतात ते शाळेच्या बोर्डावर होते अजुन कोणी म्हणतं की शिक्षणमंडळाचे सदस्य आहेत.
आरं इतकंच नाय! कुनीतरी तात्यानला 'ह्ये डांबिस तर मिपावाड्यावरलं भूत हाये' असा व्यनि केला व्हता म्हनं! आता बोल!!
तात्यानं त्याकडे लक्ष दिलं न्हायी ती गोस्ट येगळी!!!
:)
पण आम्हाला तसे वाटले नाय, लहान पोरांच्याबरोबर पोर होऊन ते दंगा घालायचे.
मी, इन्या, आंद्या, धम्या आणि पिडांकाका अशी मस्त गँग होती.
व्हय रं राजा, व्हय!!!
तवां मिपा म्हंजे येक झकास कट्टा व्हता...
आमी आपली शाळा आटपून (किंवा बुडवून) थितं गफ्फा हानायला यायचो.
लई मजा यायची...
पन नंतर मिपाचीच "शाळा" झाली आन आपला हुरूपच ग्येला बगा!!!!!!
आता तसंबी इन्या चित्रं, धम्या पोरं, आनि तुमी संपादकीय नोटिसा काडण्यात मग्न आसतां. मग मी आनि आंद्यातरी घालून घालून किती दंगा घालनार?
;)
आसो!!!
बाकी, परमोद द्येवकाकान्ला आता वारस मिळालेला दिस्तोय!!!!!!!
;)
11 Mar 2011 - 1:50 am | आनंदयात्री
>>इन्या चित्रं, धम्या पोरं, आनि तुमी संपादकीय नोटिसा काडण्यात मग्न आसतां
=)) =)) =))
>>बाकी, परमोद द्येवकाकान्ला आता वारस मिळालेला दिस्तोय!!!!!!!
सात मजली =)) =)) =))
11 Mar 2011 - 9:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
कमाल शब्दात किमान अपमान काय हो पिडांकाका?
11 Mar 2011 - 4:24 pm | धमाल मुलगा
इत्क्या काळानंतर आमचा डांबिसकाका फुल्ल फार्मात ब्याटिंग आलेला पाहून आम्हाला आनंदानं फेफरं यायचं बाकी र्हायलंय. ;)
>>इन्या चित्रं, धम्या पोरं, आनि तुमी संपादकीय नोटिसा काडण्यात मग्न आसतां.
=)) =)) =)) =))
बाऽऽऽऽ भांऽऽ !!! =)) =))
ओ काकानु,
इतकापण नाय हाणायचा राव. आत्तापत्तूर काउंट एकच हाय. :D
>>मग मी आनि आंद्यातरी घालून घालून किती दंगा घालनार?
असं कोन म्हंतो? मायला, आमी हौत हितंच.. तुमीच गायब झाला व्हता. या पुन्ना, परत कट्टा जमवू तिच्यामारी. :)
10 Mar 2011 - 7:39 pm | रमताराम
मिपाची तुलना काँग्रेसपक्षाशी आणि मिपाकरांची काँग्रेसजनांशी केल्याबद्दल निषेध
बरं मग बापट गट नि मठकरी गट किंवा गेला बाजार मुंडे-गडकरी गट म्हणू या, किंवा अजित पवार नि आझम पानसरे गट, तुम्ही म्हणाल तसं.
लवकरच तुमच्या अनुदिनीवर मोर्चा काढता येईल का यासंदर्भात चर्चा करून (जे काही हाय कमांड म्हणेल त्याप्रमाणे) निर्णय घेण्यात येईल.
तुमच्या मोर्चाकडे लक्ष देण्यास तूर्तास सवड नाही. आम्ही सध्या भट्टी लावण्यात... आपलं हे अणुभट्टी लावण्यात बिजी आहोत. तिकडे सगळे मैदान साफ झाले की मग येऊ द्या तुमचा मोर्चा, हायकमांडच्या मध्यस्थीने मांडवली करू, कसं म्हंता?
10 Mar 2011 - 7:48 pm | धमाल मुलगा
किती समाजवादीपणा कराल! ;)
10 Mar 2011 - 7:57 pm | रमताराम
समाजवादीपणा करत नाही कोणी तो अंगात असतोच.
10 Mar 2011 - 8:16 pm | धमाल मुलगा
मग तर शिकवणी लावावी म्हणतो.
काय फी घेणार? :D
10 Mar 2011 - 8:47 pm | रमताराम
आमी आदिच बोल्लो, शिकवून येत न्हाई त्यो. आंगचाच असावा लागतूय. आन् तुमी तर कांग्रेस (एस.) वाल्या गावचे (आता नाव बदललं तरी बी नेता त्योच न्हवं का), आमी काय शिकिवनार तुमास्नी.
10 Mar 2011 - 8:57 pm | विकास
आंगचाच असावा लागतूय. आन् तुमी तर कांग्रेस (एस.) वाल्या गावचे (आता नाव बदललं तरी बी नेता त्योच न्हवं का), आमी काय शिकिवनार तुमास्नी.
खरे आहे! अहो त्यांच्या अंगातच काय, गावात देखील आहे! :-)
असं म्हनतात की जर तुम्हाला बारा गावचं पानी प्यायला जमत नसलं तर फकस्त बारामतीचं प्या... "बारा गावच्या करामती एकाच ठिकाणि शिकायला मिलतात ते बारामती!" ...
10 Mar 2011 - 9:05 pm | रमताराम
"बारा गावच्या करामती एकाच ठिकाणि शिकायला मिलतात ते बारामती!" ...
जबरा. लै भारी व्याख्या आहे.
11 Mar 2011 - 4:36 pm | धमाल मुलगा
जौंद्या!
आमच्यावरच अस्त्र उलटलेलं पाहून आम्ही वर्गाच्या खिडकीतून पळ काढला आहे. :D
10 Mar 2011 - 7:42 pm | रमताराम
दोआप्रकाटाआ
10 Mar 2011 - 6:08 pm | विजुभाऊ
हम्म....
गणपाशी सहमत.
नाना ,पिडांकाका ,रामदास ,प्रभुमास्तर , पुणेरी पेशवे, प्रसन्न केसकर ,मृहनयनी ,टारझन , बाजीरावाची मस्तानी , डोमकावळा ( हा शाळा बदलून गेला बहुतेक) ,राजे ( दंगा केला नसतानाही मास्तरानी दंगा का केला म्हणून छडी मारली याचा राग येवून याने स्वतःचीच एक नवी शाळा काढली),गणपा ,काळेकाका ,स्वाती राजेश , प्राजू ,चुचू ( अक्षर सुंदर पण सूदलेखणात कायम गचकणार, नेहमी दप्तराच्या बंदाचा झोपाळा करायची आणि बंद तोडायची ) या विद्यार्थ्यांबद्दल मॉनीटरबै विसरून गेल्यात.
चालायचं वर्गातल्या हुशार मुलानी हुशार मुलांबद्दल काढलेला हुशार वैचारीक धागा.
: वर्ग विग्रह नाकारणारा विजुभाऊ
अवांतर : मॉनिटरबैनी स्वतःच स्वतःबद्दल लिहिण्याची फ्याशन आणल्याबद्दल अबिननदन.
10 Mar 2011 - 7:38 pm | रेवती
मजेदार लेखन. खरच, पुर्वीचे मिपा सोज्वळ होते.;)
मिपा लहान असताना मी सद्स्य नव्हते. दोन अडीच वर्षापूर्वी सदस्य झाले. तेंव्हाचं मिपाचं रूपडं आठवतय.
अवांतर: सध्या तू कोणत्या देशातून लेखन करतेस?;)
11 Mar 2011 - 9:24 am | सुहास..
पुर्वीचे मिपा सोज्वळ होते. >>
मग नंतर येणार्यांनी ते बिघडवले असे 'आडुन-आडुन' म्हणणार्या रेवतीकाकुचा निषेध ;)
10 Mar 2011 - 7:47 pm | धमाल मुलगा
पुन्हा तो जुना दंगा आठवला. :)
बाकी, त्या डान्याच्या 'आजकाल दंगा करावासा वाटत नाही' वगैरे वाचून एक मित्र अकाली म्हातारा झाला हे पाहून अंमळ दु:ख झाले.
10 Mar 2011 - 9:14 pm | निनाद मुक्काम प...
आम्ही दहावी फ मधील विद्यार्थी
नुकतीच शाळेत खोगीर भरती झाली आहे .
वर्गात मास्तर शिकवतांना भाऊ पाध्यांची कांदबरी वाचणे .
मधल्या सुट्टीत आशु विजू रानडे ह्यांच्या कादंबऱ्या आहेतच आमच्या सोबतीला
.
मागच्या वेळी सहल गेली असतांना गायलेले गाणे आठवले .
आता मात्र आम्ही सारे अभ्यास करणार आहोत .शहाण्या मुलासारखे वागणार आहोत .
कुलकर्णी सर आमचे मार्गदर्शक आहेत .
अतुल नव्हे
अविनाश
10 Mar 2011 - 9:17 pm | मुक्तसुनीत
मधल्या सुट्टीत आशु विजू रानडे ह्यांच्या कादंबऱ्या आहेतच आमच्या सोबतीला
अरेरे. विस्मरण झालेले दिसते. "आशु विजू रानडे" नव्हे हो , "आशु रावजी/दिनू कानडे".
- काकोडकरांबद्द्ल कधीतरी नॉस्टल्जिक होणारा. ;-)
11 Mar 2011 - 4:38 pm | धमाल मुलगा
आता एव्हढ्या कऽडक साहित्यकृती वाचायच्या का लेखकांची नावं पाठ करायची? क्यॅय रॅव मुसु? ;)
-(वर्गात बसून तासाला आशु रावजीचं पुस्तक वाचताना लै वेळा पकडला गेलेला) ध. ;)
13 Mar 2011 - 3:22 pm | निनाद मुक्काम प...
''नावात काय आहे ? असे बर्नाड म्हणूनच गेला आहे .
आपल्या बुआ परदेशात एक आवडते .
लोलिता /लेडी
Chatterley अश्या साहित्यकृतींना एकदा क्लासिक म्हणून मान्यता मिळाली की समाजातील सर्वस्तरीय
घटक ते वाचायला मोकळे
.उगाच कवर घालून पुस्तके वाचणे नको .
13 Mar 2011 - 10:57 pm | निवांत पोपट
'नावात काय आहे ? असे बर्नाड म्हणूनच गेला आहे
अहो हे 'जॉर्ज बर्नाड शॉ' ने म्हटलं आहे का शेक्सपियरने....? पण नकोच,.... तुम्ही परत तेच म्हणाल,
'शॉ' काय किंवा 'शेक्सपियर' काय! नावात काय आहे!
14 Mar 2011 - 12:15 pm | विश्वनाथ मेहेंदळे
ते शेक्सपियर वर सूड उगवताहेत, इतकी सामान्य आणि चुकीची ओळ लिहिल्याबद्दल.
बाकी शेक्सपियरच्या ह्या वाक्याखाली बर्नाड चे नाव असणे याला काव्यगत न्याय म्हणायला हरकत नसावी.
14 Mar 2011 - 7:30 pm | निनाद मुक्काम प...
पण नकोच,.... तुम्ही परत तेच म्हणाल,
'शॉ' काय किंवा 'शेक्सपियर' काय! नावात काय आहे!
माझे विस्कळीत विचार . व त्याचा मतितार्थ कळला . ह्या बद्दल आभारी आहे .
अवांतर .
Lady Chatterley
ही साहित्यकृती पहायची असेन तर सिनेमा पाहू नका .
बी बी सी ने छोट्या पडद्यासाठी मालिका बनवली होती . ''ती पहा'' .तू नळीवर सापडेल .
जोली रिचर्डसन( nip/ tuck फेम ) ने फर्मास अभिनय केला आहे .
10 Mar 2011 - 8:17 pm | आनंदयात्री
कंपुबाजांनी कंपुबाजांसाठी केलेले लेखन !!
:)
मस्त लिहलेस ग दुर्बिटणे. पण ते दिन गेले वैगेरे काही नाही. पुन्हा चालु करु धिंगाणा, ये खवत !
10 Mar 2011 - 8:44 pm | धमाल मुलगा
है शाब्बास!
ह्याला म्हंतात दोस्त. :)
10 Mar 2011 - 9:53 pm | रेवती
अगदी हाच प्रतिसाद देणार होते पण 'राडा' होइल असे वाटल्याने नाही दिला (आत्ता दिला.).;)
10 Mar 2011 - 9:00 pm | नगरीनिरंजन
लेखाच्या शीर्षकातला श्लेष अभिप्रेत आहे काय? असेल तर कशासंदर्भात ते जाणून घेण्यास आनंद वाटेल. बाकी लेखावर प्रतिक्रिया देण्याएवढा आमचा अभ्यास नाही.
10 Mar 2011 - 9:06 pm | मुक्तसुनीत
लिखाण रोचक आहे. थोडा नेपॉटिझम आहे खरा पण माझे नाव सामील केलेले असल्याने मी तसं काय म्हणणार नाही. शेवटच्या बेंचवरची मुले ही खरोखर शेवटच्या बेंचवरची आहेत की त्यांना शेवटच्या बेंचवर आहेत असे सांगून ती कॉमन-जो-अँड-कॉमन-जेन यांचे प्रतिनिधित्व करतात असा आभास आहे ? माहिती नाही.
काही रस्टिकेट झालेली मुले , काही नावडती मुले , काही डबल-ट्रिपल रोल धारण केलेली मुले , काही पळून गेलेली मुले , काही रुसलेली मुले - आणि हो काही नावडते पर्यावेक्षकसुद्धा यात दिसत नाहीत. थोडक्यात इन्कन्व्हिनियंट घटकांना रजा दिलेली दिसते. असे असल्याने हे चित्र काहीसे सलणारे काटे काढून सादर केलेल्या (नि प्रसंगी रंगलेपन आणि पर्फ्युम शिडकावलेल्या) गुलाबासारखे झाले आहे.
असो. सर्व कंपूबाजांनी या माझ्या प्रतिसादाबद्दल ज्या काय चापट्या मला मारायच्या त्या मारून घ्याव्यात. अदिती , तुमचा लेख मला आवडला आहे परंतु जरा कौटुंबिक गप्पा शिवाजीपार्कात माईक हातात घेऊन मारल्यात असे वाटले म्हणून खुसपटे काढली. तरी मला आपल्या कंपूतून रजा देऊ नये ही विनंती.
10 Mar 2011 - 9:26 pm | छोटा डॉन
अहो मुसुशेठ, शाळेचा रिपोर्ट (किंवा निबंधवाचनस्पर्धेतले 'माझी शाळा मला का आवडते' असा निबंध ) पद्धतीप्रमाणेच आहे.
आपण प्रत्येक अहवालाच 'इन जनरल' चांगल्या बाबीच लिहीत असतो. काही चुकार बाबी टाळायच्याच असतात, अहो त्या सगळीकडेच घडत असतात पण म्हणुन त्याला अहवालात मानाचे पान द्यायचे नसते कधी.
१. जेव्हा कांग्रेसचा वार्षिक अहवाल येतो तेव्हा त्यात किती जणांशी पक्ष सोडला, किती जणांना निलंबीत केले, कुठे पक्षाने मार खाल्ला, कुठे पक्षाच्या लोकांनी पैसे खाल्ले, पक्षाच्या सरकारचे घोटाळे अशा बाबींचा उल्लेख नसतोच की. अर्थात हे सगळ्याच पक्षात घडते पण उगाच आमच्या रमतारामकाकांना कांग्रेस आवडते म्हणुन हे नाव.
२. एखाद्या गणेशोत्सव मंडळाचा अहवाल मांडताना त्यात चांगले कार्यक्रमच असतात. वर्गणीवरुन झालेल्या मारामार्या, मंडपाखालचे जुगाराचे हिशेब, मिरवणुकीतल्या हाणामार्या आणि पैसे खाल्ल्याच्या तक्रारी हे सोईस्कर टाळण्याची पद्धत आहे.
तर मुद्दा असा आहे की 'चित्र काहीसे सलणारे काटे काढून सादर केलेल्या (नि प्रसंगी रंगलेपन आणि पर्फ्युम शिडकावलेल्या) गुलाबासारखे झाले आहे' असे नव्हे तर ते चित्र तसेच काढायची पद्धत आहे, असो.
- (सचिव)छोटा डॉन
11 Mar 2011 - 12:18 pm | रमताराम
आमच्या रमतारामकाकांना कांग्रेस आवडते म्हणुन हे नाव.
ओ डान्राव, तुम्ही कांग्रेसचे सचिव असाल/नसाल, आमची बदनामी काय म्हणून. अहो आम्हाला अमूक पक्ष आवडतो असे दिशाभूल करणारे विधान तुम्ही कस्काय करता? अहो आम्ही 'फिरते राजकारणी' हे आधी नमूद केलेच आहे. थोडक्यात 'जिकडे सरशी तिकडे बारशी(!)' असे आहे आमचे. जसं आयुष्य एकसुरी असू नये तसंच राजकारणदेखील. आज युतीची सत्ता असेल तर तिकडे जाऊ, उद्या काँग्रेसची आली तर तिकडे जाऊ.
(रमवर्धन पाटील) रमताराम
11 Mar 2011 - 12:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बाकी सगळं ठीक आहे, पण रमताराम काका तुम्ही स्वतःला रमवर्धन म्हणवणं पटलं नाही.
11 Mar 2011 - 2:46 pm | रमताराम
न पटायला काय झालं? राजकारणात पन्नाशी उलटल्यावरही तरूण तडफदार नेताच म्हटलं जातं. या एकदा आमच्या इंदापुरात.
11 Mar 2011 - 4:20 pm | वपाडाव
आज युतीची सत्ता असेल तर तिकडे जाऊ, उद्या काँग्रेसची आली तर तिकडे जाऊ.
जाउ तिथं खाउ....
10 Mar 2011 - 10:30 pm | सुहास..
आमच्या झो.प. च्या भाषेत बरेच काही लिहिता आल असत ..पण सध्या...
...च्च च्च च्च !! (वाटलेच होते !! )
आमचा हा लास्ट बेंचमार्क !! ;)
10 Mar 2011 - 11:23 pm | सुहास..
प्र टा का
11 Mar 2011 - 12:04 am | धनंजय
(समावेशानंतर समर्थनाशिवाय पर्याय नाही.)
मागच्या बाकावरून सर्व विद्यार्थ्यांवर खडूंचा वगैरे अस्त्राव (अस्त्रवर्षाव) करता येतो.
मधल्या बाकावरचे मध्यममार्गी मागच्यांचे सहन करतात आणि पहिल्या बाकवाल्यांना पिडतात.
समोरच्या बाकावरच्यांना फक्त शिक्षकावरच अस्त्राव करता येतो. आणि पैज घेऊन एकाच दिवशी खडू टाकताना ते पकडलेही जातात.
तस्मात् थोडे लवकर येऊन (किंवा हडेलहप्पी/खुशामत करून) मागचा बाक पटकवावा.
11 Mar 2011 - 2:07 am | भडकमकर मास्तर
धनंजय आणि राजेश एकाच बाकावर बसतात आणि गंमत म्हणून कसल्याही पैजा, शर्यती लावतात; उदा: ठराविक आकाराच्या कागदाला कमीतकमी घड्या घालून बनवलेलं कोणाचं विमान जास्त चांगलं उडेल, असं काहीसं.
:))
हे बेस्ट......मजा आली
11 Mar 2011 - 2:36 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
बाईंनी घेतलेली/भरवलेली शाळा/वर्ग छान!
(शाळकरी)बेसनलाडू
11 Mar 2011 - 7:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जबरा.
-दिलीप बिरुटे
11 Mar 2011 - 5:59 am | अरुण मनोहर
बेंचमार्क हे शिर्षक सगळे सांगून जाते.
विषय संपला.
11 Mar 2011 - 4:15 pm | सहज
सहमत आहे. "शाळा एकच असली तरी माझा वर्ग तो वेगळा' असे काहीसे. वर्गवारीचा निषेध!
कोण्या ठाण्या,मुंबईच्या डफ्फर जनता शाळेमधे माझी वर्णी लावल्या गेल्याने, बहुदा त्या वर्गात मला बसायचे नाही हे स्पष्ट असुनही बळचकर बसवल्या गेले आहे. या असल्या वर्गात तर चुकून कोणी एक्स्चेंज स्टुडंट (मराठी बोंबलले??) म्हणूनही जाणार नाही.
बळचकर लेख!
(तळागाळातला) सहज
11 Mar 2011 - 4:46 pm | धमाल मुलगा
एक काय ते नीट ठरवून घेणे.
डफ्फर जनता शाळा की स्वतः तळागाळातला?
तळागाळातले शरदपवार इंटरन्याशनल स्कूल मध्ये शिकतात असं वाटतंय का?
बरं. ते जाऊ द्या. तुमची शाळा कंची म्हनायची? जि.प.शा.क्र.६९, की (अ)ज्ञानउपप्रबोधनीक्रम? :P (बघा ब्वा! दोन्ही आपशन दिल्यालं हैत. :) )
12 Mar 2011 - 6:08 am | सहज
तळागाळातील लोक रात्रशाळेत जातात किंवा कोण्या शिक्षकाच्या आश्रयाने मार्गदर्शन घेत घेत शिकतात, बहिस्थ विद्यार्थी, पत्राद्वारे शिक्षण ऐकले नाय का?
आणी पुण्यामधे जिसका कोई (स्कूल) नही उसका तो पी. जोग है यारो!
:-)
12 Mar 2011 - 8:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मुंबई-पुण्याच्या बाहेर महाराष्ट्र आहे हे शिका सहजमामा! पंढरपूर, बारामती, तासगाव, औरंगाबाद महाराष्ट्रातच आहेत, त्यांना आपलं म्हणा! ;-)
14 Mar 2011 - 9:46 am | वपाडाव
विदर्भ, खान्देशातील नावे न घेता प्रांतियवाद केल्याबद्दल अदितीबैंचा निषेध.....
(मराठवाडा घेतल्याबद्दल अभिणंदण....)
14 Mar 2011 - 10:33 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आता तुम्हाला कळलंच असेल, ३_१४ विक्षिप्त अदिती ही विद्यार्थिनी भूगोलात कच्ची आहे ते!
मराठवाड्याचं नावही घेतलं नसतं, पण काही संपादकांची अंमळ भीती वाटते. ;-) (भागो, संपादक आया।)
14 Mar 2011 - 9:19 pm | विकास
आता तुम्हाला कळलंच असेल, ३_१४ विक्षिप्त अदिती ही विद्यार्थिनी भूगोलात कच्ची आहे ते!
पण "खगोल" म्हणजे विस्तृत अर्थी आंतराळातील भूगोलच असतो ना? :-)
14 Mar 2011 - 10:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कच्ची आहे म्हणून अजून अभ्यास सुरू आहे ना! ;-)
(पुढचं पाठ मागचं सपाट) अदिती
11 Mar 2011 - 7:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहजला प्रत्येकाच्या मनात प्रत्येक क्षणी काय चाललेले आहे याचे विलक्षण कुतूहल असल्यामुळे तो बाका-बाकामधून, टेबलाखालून, फळ्यामागून सरपटत हिंडत असतो.
हाहाहाहाहा...........................लंबर एक. :)
-दिलीप बिरुटे
11 Mar 2011 - 9:36 am | अभिज्ञ
मस्त.
अभिज्ञ.
11 Mar 2011 - 10:28 am | ब्रिटिश टिंग्या
लेख आवडल्या गेला आहे!
11 Mar 2011 - 10:35 am | विजुभाऊ
अरे विचारायचेच राहीले.
यशोधरा , भडकमकर मास्तर , विजुभाऊ ( हो मी स्वतःच). प्रा डॉ बिरुटे ( हा विद्यार्थी पैल्यापासूनच प्राचार्य असे बिरूद परीधान करतो) , पॅठकर काका ( याच्या डब्यात नेहेमी खाऊ असायचा) ,केशवसुमार काका , चतुरंग या होतकरू विद्यार्थ्यांची दुर्बीटणे बैना विसरण झाली. याचा णीषेद
सौता प्रीन्सीपॉल त्यात्या चीच विसरण झाली.
11 Mar 2011 - 11:41 am | बबलु
कंपु लोकांणी कंपुतल्या लोकाणसाठी काढलेला तद्दन फालतु धागा.
(बाकी... मागे एकदा असाच एका फुर्जींनी कुणीतरी फिक्षिप्तबाई अमेरीकेत प्रथमच जाणार म्हणून काढलेला एक अत्यंत mediocre धागा आठवला).
11 Mar 2011 - 6:40 pm | कवितानागेश
काहीतरी जळल्याचा वास येतोय मध्येच!
- (वर्गभर वास काढत फिरणारी) माउ
12 Mar 2011 - 12:28 pm | बबलु
घ्या.... हे अजून एक. यांचं काहीतरी वेगळंच.
(वास काढणार्यांच्या योग्य ठिकाणी आवाज काढणारा) बबलु
13 Mar 2011 - 12:47 am | कवितानागेश
जो गरजते है वो बरसते नही!
- ( सगळे आवाज चुकवून उंच फळ्याबर बसून रडक्या पोरांना हसणारी) माउ
13 Mar 2011 - 1:48 am | बबलु
फालतु लेखांना गोग्गोड गोग्गोड प्रतिसाद देणार्या लाळघोट्यांच्या डोक्यात आम्ही कधीचीच काठी घातलेय.
असो.
उंच फळ्यावर जाउन बसलात ते बरं केलंत.
(संपादित मजकूर) बबलु
11 Mar 2011 - 3:28 pm | बिपिन कार्यकर्ते
बरं लिहिलंय!
11 Mar 2011 - 4:41 pm | धमाल मुलगा
जरा मोकळेपणानं कौतुक केलं तर बाईंच्या/मास्तरांच्या ब्याडबुकात जातो की काय अशी भिती वाटली की काय रे मॉनिटर? :P
11 Mar 2011 - 4:04 pm | श्रावण मोडक
बरं...!
11 Mar 2011 - 4:11 pm | मस्त कलंदर
दुर्बिटणेबैंनी केलेली मिपाची शाळा आवडली.
सहजकाकांचं वर्णन तर अगदी चपखल केलंय. :-)
बाकी, अस्मादिकांबद्दल बोलायचंच तर, मधल्या नाही गं.. मी पहिलीपासून पहिल्याच बाकावरची विद्यार्थिनी आहे. सगळ्यात पुढे बसून टवाळपणा करणं, खाली पडलेले खडू उचलून बरोब्बर नेम धरून (मास्तरांना नव्हे)मारणं, अगदीच बोर झालं तर झक्कपणे झोपा काढणं, उत्तर येत असेल तरीही मुद्दाम मख्खासारखा चेहरा करणं आणि व्यवस्थित उत्तर देऊन मास्तरांचा चेहरा पाडणं(हे अर्थातच शाळेत मास्तर नाहीतर मी नवीन असेपर्यंतच. नंतर आमचे 'गुण' कळायचेच सगळ्यांना)हा आमच्या हातचा मळ!!!
हे मात्र अगदी बरोब्बर!!!
11 Mar 2011 - 5:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सदर लेख, सदर सभासद शाळेत असताना कसे वागायचे याबद्दल नसून सदर सभासद (मराठीत आयडी) मिपा नामक कट्ट्यावर कसे वागतात याबद्दल आहे. अनेक लोकांनी या लेखाबद्दल मागणीवजा तक्रारही केली की वर्गात खूपच कमी मुलं आहेत, मुली तर दोनच आहेत, अमक्या/कीबद्दल का लिहीलं नाही, इ.
१. सदर लेख थोडाफार कॅरीकेचर प्रकाराने लिहायचा असल्यामुळे वात्रट लोकांबद्दल लिहीणं सोपं होतं.
२. चटकन सुचलं तेवढं लिहीलं, लोकसंख्या, जेंडर इक्वॅलिटी वगैरे सोसापायी पाणी घालायचं नव्हतं.
३. एवढं लिहूनच हात भरून आले त्यामुळे थांबले.
"आपणही इतर मिपासभासदांबद्दल लिहावं", असं माझं आवाहन योग्य जागी मारून वर माझ्याकडे माझीच तक्रार करणार्या मिपा-प्रतिसादकांचा साफ निषेध.
11 Mar 2011 - 9:03 pm | आनंदयात्री
>>"आपणही इतर मिपासभासदांबद्दल लिहावं", असं माझं आवाहन योग्य जागी मारून वर माझ्याकडे माझीच तक्रार करणार्या मिपा-प्रतिसादकांचा साफ निषेध.
आपल्या खिलाडुवृत्तीचा आदर आहे :)
11 Mar 2011 - 9:53 pm | टारझन
लेख वाचल्या गेला नाही , परंतु प्रतिसाद वाचल्या गेले . कुठे झिंम्मा फुगडी , कुठे साबण चोळा चोळी , कुठे नाराजी , कुठे ओशाळलेले चेहरे , कुठे आंबट चेहरे .... तर कुठे बेरजेचे राजकारण :) हॅहॅहॅ
थोडक्यात असे अणुमाण काढल्या गेले आहे :)
अजुन रोचक अशा ग्गोग्गो प्रतिसादांच्या प्रतिक्षेत :)
सहजरावांच्या चेहर्यावरचे एक्स्प्रेशन टिपल्या आले असते तर किती बरं होतं :)
बाकी " नंदु आला .. नंदु आला " हे कपलवाक्य २५ वेळा दिसल्या गेले नाही :) त्यामुळे त्याचे ही एक्स्प्रेशन बघण्यास उस्तुक :)
- (१७ नंबर) टारझन