नमस्कार,
माझ्या कजाग बॉसने आमच्या पिसिवर काहि साईट बंद केल्या आहेत, अश्याने आम्हि काहि डाउनलोड करु शकत नाहि, फेसबुक आमचे बंद झाले आहे तर मिपावर आपल्या पैकि कोन आमचा तारणहार असेल तर त्याने आम्हाला मदत करावी. त्या साईट कश्या पाह्ता येतील याची माहीती द्यावी.
देव आपले भले करो.
प्रतिक्रिया
9 Mar 2011 - 3:22 pm | प्रचेतस
फक्त तुमच्याच पीसीवरील का? म्हणजे काहीतरी विवक्षित कारण असेल.
नेमका हाच आचरटपणा तुम्ही केला असेल.
फेसबुक वापरूच नका. कशाला उगाच आभासी जगात रमत बसायचे.
कुठल्यातरी इंटरनेट सेवादात्याकडे जा. चार पैसे भरून घरी इंटरनेट आणा. मग हव्या तितक्या साईटस मुक्तपणे पहा.
धन्यवाद.
9 Mar 2011 - 3:40 pm | अनुराग
+१
9 Mar 2011 - 3:43 pm | टारझन
बॉस ची हाडं तोडता येतात का पहा. हा उपाय मी एकदा करुन पाहिला होता. अगदी यशस्वी उपाय आहे.
9 Mar 2011 - 3:53 pm | नरेशकुमार
आपन सुद्धा एक दिवस कोनाचे ना कोनाचे बॉस होउ की, मग ?
.
.
.
.
फ्रिंज वापरा, ते ब्लॉक नसते शक्यतो. त्याने काम होईल,
9 Mar 2011 - 3:49 pm | नन्दादीप
atunnel.com ट्राय करा....
तिथे Begin Browsing च्या आधील बॉक्स मधे तुम्हाला हव असलेल url टाका. माझ्याकडे Sites Block नसल्याने चेकवू शकलो नाही..
9 Mar 2011 - 3:52 pm | परिकथेतील राजकुमार
देव करो आणि त्यात मिपाची भर पडो.
9 Mar 2011 - 4:42 pm | वपाडाव
म्हंजे असले काही वाचणे अन त्यावर उत्तर देणे यांची वेळच येउ नये मुळी.
9 Mar 2011 - 5:59 pm | मुलूखावेगळी
देवानी तुमचे आधीच भले केलेय हो.
माझ्या आधीच्या कम्पनीत असता तर मिपावर ही नसते येता आले. बॉस तर जाउ द्या कलिग्ज पण २रा कोन्ता साइटी बघतोय ह्या वर वॉच ठेवत.त्यामुळे तर मला उशिर झाला मिपावर यायला. ;)
9 Mar 2011 - 6:04 pm | अभिजीत वाघ
बेश्ट उपाय म्हणजे कंपनी बदला.
10 Mar 2011 - 9:34 am | श्री गावसेना प्रमुख
कशाला कम्पनी बदला,हार्ड डीस्क बदलुन टाका<
म्हणजे झाल,(नोकरदारान्ना मान्डीवरचा सन्गनक हप्त्यावर मिळतो म्हणे)
10 Mar 2011 - 10:53 am | विनायक बेलापुरे
तुमचा कजाग "बॉस" ......तुमच्या घरातीलच असेल तर ...... देवच तुमचे रक्षण करो .... ;)