तु पावसाच्या सरिसारखी अचानक येतेस...अंगावर कोसळतेस...
कळत नाही काय होतंय ते... मी सुद्धा डोळे बंद करुन अथांग भिजण्याच स्वप्न पाहतो...
भिजतोहि थोडा...
पण अचानक हि सर निघून जाते...
डोळे उघडतो... मी अर्धवट कोरडा...
वाट पाहतो, पुन्हा ती सर येन्याचि...
पण महित असत... ती सर आपल्यासाठी नाही...आणि येणारही नाही
पण कोणास ठाऊक मी असा का वागतो... वाचता आल असत मला अर्धवट भिजन्यापसुन... टाळता आल असत हे
पण माहित असून सुद्धा मी पुन्हा डोळे झाकतो...
सर येण्याची वाट पाहतो, पुन्हा भिजण्यासाठी, अर्धवट का होईना... स्वप्न पाहतो,
माहित असत कि फसवतोय स्वतःला, पण दुर्लक्ष्य करतो ह्या गोष्टीकडे.
प्रतिक्रिया
9 Mar 2011 - 1:08 pm | गणेशा
शब्दांमागची भावना छान मांडली आहे..
पण अचानक हि सर निघून जाते...
डोळे उघडतो... मी अर्धवट कोरडा...
या मध्ये मी अर्धवट भिजलेला हे जास्त समर्पक वाटले असते का ?
9 Mar 2011 - 1:17 pm | टारझन
मला विनय सर आठवले ..
- चक्रशा