पुनश्च हनीमून

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
7 Mar 2011 - 11:46 pm

पुनश्च हनीमून
कथा कादंबरी लेखनाची प्रक्रीया नक्की काय असते याबद्दल बरीच मते आहेत. काहींच्या मते लेखन हे माणसाच्या भूतकाळातील अनुभव आणि भविष्यातील स्वप्ने यांचे बेमालून मिश्रण असते. त्यात वर्तमानदेखील मिसळलेला असतो. लेखक त्याच्या भूतकाळ भवीष्यकाळ आणि वर्तमानकाळापासून वेगळा अलीप्त राहू शकत नाही.
लेखक लिहीताना त्याचे लिखाण जगत असतो.
या लिखाणाच्या प्रवाहाला खीळ बसते ती ;तो त्याच्या लिखाण जगण्यापासून अलीप्त झाल्यावर.
आपण याला रायटर्स ब्लॉक म्हणतो.
रायटर्स ब्लॉक बद्दल यापूर्वी माध्यमातून बरीच चर्चा झालेली आहे. त्याबद्दल जितके कुतूहल असते तितकेच ते एखाद्या
एखाद्या सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी काय लागते. तो केवळ वर्तमानावर जगत नसतो. त्याच्या जगण्याला भूतकाळातील वेदना .आठवणी आणि भविष्याकाळातील स्वप्ने तितकीच आधारभूत असतात जितका की त्याचा वर्तमानकाळ असतो.
पुनश्च हनीमून ही कथा म्हंटले तर आहे सुहास देशपांडे या लेखकाची. आणि त्याच्या पझेसीव्ह बायकोची ; सुकन्या देशपांडेची.
सुहासच्या पूर्वीच्या पुस्तकाला पारीतोषीक मिळालेले आहे . सुहासने त्यानन्तर बराच काळ काहीच लेखन प्रकाशीत केलेले नाही. त्याने त्याचे कोणतेच लेखन पूर्णच केलेले नाहीय्ये. जेंव्हा जेंव्हा त्याच्या कथानकातील पात्रांचा वर्तमानाशी /भूतकाळातील घटनांशी संबन्ध यायला लागतो ; तेंव्हा तेंव्हा सुहास त्या घटनांपासून अलीप्त रहायचा प्रयत्न करतो. यातूनच येतो रायटर्स ब्लॉक.
नवर्‍याने लेखन पूर्ण करावे म्हणुन सुकन्या सुहासला एक उपाय सुचवते; लग्नानंतर माथेरानच्या ज्या हॉटेलात गेलो होतो त्याच हॉटेलात पुनः हनीमुनसाठी जायचे..
नाटक सुरु होते तेच मुळी हे जोडपे माथेरानला रस्ता चुकल्याच्या प्रसंगाने. आपण रस्ता चुकलो आहोत या वाक्यानेच.
त्यानंतर त्या दोघांमधले वर्तमान , त्यांचा भुतकाळ , सुहास /सुकन्या यांच्या लहानपणच्या खेळणे , सुहासचे शाळेतले मित्र ,त्याच्या वडीलांचा अपघाती ( आत्महत्या) मृत्यू . यातच सुकन्या लेखक म्हणून सुहासची टीव्हीचॅनेलवर मुलाखत घेते.
यां सगळ्यांच्या सीमा धुसर होऊ लागतात. सुहास मात्र ज्या ज्या क्षणी त्याच्यातील लेखकाचा वास्तवाशी संबन्ध येतो त्यावेळेस अलीप्त होऊ पहातो.
त्याच्या कथेतील एक पात्र त्याला काही सूचवू पहाते. सुहास त्यापासूनही दूर पळू पहातो.
रायटर्स ब्लॉक सुहासच्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊ पहातो.
सुहासच्या दांपत्यजीवनाला व्यापू लागतो.
एका स्वप्नवत न संपणार्‍या चाकोरीत अडकतो.
शेवटी त्याच्या कथेतील एक पात्रच त्याच्या कडून कथा पूर्ण करवून घेते.
या नाटकात नाटककाराने स्वतःचीच गोष्ट लिहीले आहे.
दिसायला अगदी सोपे भासणारे अतीशय वेगळ्यापातळीवर नेणारे , सायक्लोरामाचा त्रीमीतीत केलेला वापर हे या नेपथ्याचे अत्यंत आगळे वैषीष्ठ्य . प्रकाशयोजनेतील पात्रांच्या डोक्यावरून असलेला लाल रंगाच्या फोकसचा वापर वेगलीच वातावरण
अमृता सुभाषच्या अभिनयाबद्दल काही वेगळे सांगायची गरज नाही. आवाजाच्या छटांचा हुकुमी वापर करून उभी केलेली सुकन्या देशपांडे या पात्राच्या , अल्लड ,समंजस, डॉमेनिटिंग , पझेसिव्ह , कळजी घेणारी पत्नी वगैरे स्वभावछटा फारच स्वाभावीकपणे दाखावल्या आहेत.
लेखक संदेश कुलकर्णी यांनी सादर केलेली लेखक सुहास देशपांडेची भूमीका . संवाद, आवाजातील चढ उतारांचा सहज वापर यातून त्या पात्राचा स्वभाव वागणे सहज व्यक्त केला आहे.
एखाद्या पात्राच्य स्वभावातील कंगोरे आवाजाच्या वापरातून दाखवणारे दोघेही कलाकार ही या नाटकाची ताकद आहे.
नेपथ्य त्यातील सायक्लोरामाच्या वैषीष्ठ्यपूर्ण वापर, प्रकाश योजना हे अप्रमतीमच पण सहायक कलाकाराच्या भूमीकेतील
अमीत फाळके यानी देखील आवाजाच्या वापरामुळे त्या त्या पात्राची स्वभाव वैषीष्ठ्ये दाखवुन दिली आहेत.
............................................................................................................................
महींद्र & महींद्र च्या "मेटा (महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अ‍ॅवार्ड्स )" महिंद्र थिएटर फेस्टिव्हल मध्ये हे नाटक सादर झाले. एक आगळे नाटक पहाण्याचा आनंद मिळाला.
उद्या त्या स्पर्धेचा निकाल आहे. कलाकारांना शुभेच्छा.

नाट्यसमीक्षा

प्रतिक्रिया

नाटकाचा एकुन विषय आणि तुम्ही केलेले परिक्षन आवडले ..

वेदनयन's picture

8 Mar 2011 - 4:08 am | वेदनयन

श्या इजुभाऊ! मला वाटले काहितरी इंटरेश्टिंग असेल.

आता आपली-मराठी वर शोधायला लागेल हे नाटक.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Mar 2011 - 8:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाटकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यु......!

-दिलीप बिरुटे

मला वाटले विजुभाउ एकटेच गेले होते त्याची काय स्टूरी असेल... छ्या ! भ्रमनिरास !!

असो. चांगली ओळख

मस्त.. आणखी प्रयोग होणार आहेत का हो?

नगरीनिरंजन's picture

8 Mar 2011 - 9:45 am | नगरीनिरंजन

छ्या, हे रायटर्स ब्लॉक वगैरे सगळी धंदेवाईक लोकांची थेरं आहेत. भौतिक हेतूने कुंथुन कुंथुन लेखन केल्यास असा बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम येत असावा.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 Mar 2011 - 12:17 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मी तर काही लोकांना रायटर्स ब्लॉक येण्याची वाट बघतो आहे. त्यांना तो यावा आणि दीर्घकाळ टिकावा अशी आशा करतो. (येथे दात काढून हसण्याची स्मायली कल्पावी)

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Mar 2011 - 9:53 am | llपुण्याचे पेशवेll

विजुभाऊंचे परीक्षण आवडले.. कदाचित नाटक आवडेल का नाही हे ठाऊक नाही.

धनंजय's picture

9 Mar 2011 - 1:13 am | धनंजय

असेच म्हणतो.

विजुभाऊंचे परीक्षण आवडले.. कदाचित नाटक आवडेल का नाही हे ठाऊक नाही.

भडकमकर मास्तर's picture

9 Mar 2011 - 12:04 am | भडकमकर मास्तर

उत्तम परीक्षण....
संदेशचे नवीन नाटक पहायचे राहिले आहे..
तुमच्या परीक्षणाने उत्सुकता वाढली आहे...या नाटकाचे फोटो पाहिले होते...

धन्यवाद..

भडकमकर मास्तर's picture

9 Mar 2011 - 12:04 am | भडकमकर मास्तर

उत्तम परीक्षण....
संदेशचे नवीन नाटक पहायचे राहिले आहे..
तुमच्या परीक्षणाने उत्सुकता वाढली आहे...या नाटकाचे फोटो पाहिले होते...

धन्यवाद..

शिल्पा ब's picture

9 Mar 2011 - 12:16 am | शिल्पा ब

परीक्षण छान आहे...मला आधी वाटलं कि विजुभाऊ त्यांच्याच दुसऱ्या (पहिल्याच बायकोबरोबरचा दुसरा) हनिमुनबद्दल सांगताहेत कि काय.. :)

चिंतातुर जंतू's picture

9 Mar 2011 - 11:01 am | चिंतातुर जंतू

परिचयाबद्दल आभार. मी नाटक पाहिले आहे. त्यात 'रायटर्स ब्लॉक'मुळे पुन्हा हनिमूनच्या हॉटेलात जातात असा संदर्भ आठवत नाही. एकेकाळी प्रेमविवाह केलेल्या त्या जोडप्याचे सध्याचे सहजीवन हे काहीसे तणावपूर्ण व गुंतागुंतीचे झालेले आहे. तसेच लेखक आपल्या पूर्वायुष्यापासून काहीसा दूर पळू पाहतो आहे. त्यामुळे त्या सहजीवनाकडे आणि पूर्वायुष्याकडे पुन्हा विश्लेषणात्मक नजरेने पाहण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे 'रायटर्स ब्लॉक' नाही असे नाही, तर तणावपूर्ण सहजीवनातून अधिक प्रगल्भतेकडे प्रवास झाला तर स्वतःच्या पूर्वायुष्याला नीट सामोरं जाता येईल. त्याकडे अधिक वस्तुनिष्ठतेने पाहता येईल आणि त्यातून मग लिखाणाची स्फूर्ती येईल असे थोडे गुंतागुंतीचे तर्कशास्त्र आहे असे वाटले.
अवांतरः नाटकाची मूळ प्रेरणा ही फेदेरिको फेलिनीच्या ८ १/२ या चित्रपटाशी संबंधित असावी असे वाटते. अर्थात, शैली, पात्रं आणि प्रसंग खूप वेगळे आहेत.