मागील एका पोस्टमध्ये अपयश आणि वैफल्याचे योग दाखवणार्या मंगळ-शनी = रवि ही रचना ज्या पत्रिकांमध्ये तयार झाली आहे, त्या पत्रिकांची जंत्री दिली होती. पण यातील सन २०११ मध्ये गोचर (म्हणजे चालू - इंग्लिशमध्ये ट्रान्झीट) ग्रहांमुळे सक्रिय असलेल्या जन्मतारखा कोणत्या हे कळले तर भाकीतात अधिक अचूकता आणता येईल.
आता ही गोष्ट तपासायला ज्योतिषातील एक तत्त्व आपल्याला उपयोगी पडेल. ते असे, मंदगती (म्हणजे गुरु, शनी युरेनस नेपच्य़ून, प्लुटॊ) ग्रहांची भ्रमणे आयुष्यातील मोठी स्थित्यंतरे घडवून आणतात. तूर्त गुरु यातून आपण बाजूला ठेवू कारण तो सहसा "शुभ" मानला गेलेला आहे. गोचर गुरु, पत्रिकेतील रवि, चंद्र, लग्न आणि ख-मध्य यावरुन जात असेल किंवा युती, प्रतियुती अथवा केंद्र योग करत असेल आणि तरीही कुणी अपयश अनुभवत असेल तर रवि, चंद्र, लग्न आणि ख-मध्य यांच्याबरोबर तयार झालेले मध्यबिंदू तपासायलाच हवेत. शिवाय शनी युरेनस नेपच्य़ून, प्लुटॊ यांची भ्रमणे पण तपासायला हवीत. म्हणून तूर्त आपण सन २०११ करता शनी युरेनस नेपच्य़ून, आणि प्लुटॊ यांचाच विचार करणार आहोत.
पुढे वाचण्यासाठी येथे भेट द्या - http://rajeev-upadhye.blogspot.com/
प्रतिक्रिया
7 Mar 2011 - 12:44 pm | आत्मशून्य
समाधानकारक ऊत्तर नाही लीहले. म्हणून प्रश्न पून्हा एथे पहावा http://misalpav.com/node/16917#comment-290912
तोच प्रश्न या लेखाबाबत माझ्या मनात आहे. तसेच या वेळचा लेख तर फारच त्रोटक आहे.
7 Mar 2011 - 12:51 pm | sagarparadkar
आपण टी.व्ही. वरील अचाट दावा करणार्या हेल्थ प्रॉडक्ट्स व परफ्यूम्च्या जाहीरातींना / उत्पादकांना असले प्रश्न करतो का?
मग ह्याच जाहीरातीला आपला आक्षेप का? :)
7 Mar 2011 - 6:03 pm | आत्मशून्य
:) याची मणी बॅक गारंटी/पेनल्टी तरी है काय ? बाकी युयुत्सु सर हे ब्लॉगवर लीहलेले हे " +।- २ दिवस होऊ शकतात" हे मत सूसान मीलर कडून ऊचलले आहे काय ?
7 Mar 2011 - 6:13 pm | युयुत्सु
अरेच्चा तुम्ही सुझन मिलर वाचता तर!
7 Mar 2011 - 9:22 pm | आत्मशून्य
म्हणून तर वीचारले की हे "+।- २ " तीकडून आले का ते. तस अजून माहीती हवी असल्यास या लेखातील http://misalpav.com/node/17008 माझे प्रतीसादही वाचू शकता
7 Mar 2011 - 1:16 pm | अवलिया
वाचलो !!
थांकु युयुत्सु ;)
7 Mar 2011 - 1:49 pm | अमोल केळकर
ख-मध्य म्हणजे काय ?
अमोल
7 Mar 2011 - 3:24 pm | युयुत्सु
खमध्य - मिडहेवन
7 Mar 2011 - 2:18 pm | श्री गावसेना प्रमुख
नवीन ग्रह माला सापड्ली आहे तिचाही विचार करावा
7 Mar 2011 - 6:38 pm | प्रास
हे काही म्हणता काही सुधरले नाही तेव्हा म्हंटले,......
........ पान उलटा, पुढलं काहीतरी वाचू......
;-)
8 Mar 2011 - 5:50 am | चित्रा
आणि लेखातील "अपयशाचे" मध्यबिंदू कळले नाही. शिवाय लोकांना कुंडलीवरून त्यांचे अपयश कशा योगांमुळे आहे इत्यादी भविष्य सांगण्याआधी हा लेख नजरेखालून घालावा.
http://www.misalpav.com/node/17008
तुम्ही शास्त्रीबुवांवरून प्रेरणा कधी घ्याल याची मी वाट पाहत आहे.