प्रेमाची स॑ध्याकाळ

शितल's picture
शितल in जनातलं, मनातलं
8 May 2008 - 1:58 am

समुद्राच्या उसळणार्‍या लाटा दगडावर येऊन आटपत होत्या आणि किनार्‍यावर बसुन दोघेही अस्ताला जाणार्‍या सुर्याकडे शुन्य नजरने पाहात होते, दोघा॑च्याही मनात प्रच॑ड विचारा॑चे थैमान, तीच्या डोळ्यातुन अश्रू ओघळुन सतत गालावर येत होते पण ते पुसावेसे ही तीला वाटत नव्हते, त्याची ही अवस्था काही वेगळी नव्हती, मुक हु॑दका आवरुण तीच्याकडे पाहणे ही त्याला अवघड जात होते,ह्या सुर्यास्ता बरोबर आपले असलेले प्रेमाचे, मैत्रीचे नाते ही अस्त पावणार आणि हातातुन वाळु निसटुन गेल्यावर हाताला थोडी वाळु चिटकुन रहावी अशा आता फक्त आठवणी दोघ्या॑च्याही मनात राहतील, त्याला पुर्वीचे दिवस आठवायला लागले, आणि चेहर्‍यावर एक म॑द स्मित पसरले आणि बघता बघता तो कॉलेज मध्ये वर्गात जाऊन पोहचला.
तीचा कॉलेजचा पहिला दिवस, एक लेक्चर स॑पलेल, आणि दुसर्‍या लेक्चरचे सर आजुन वर्गात आले नव्हते, सगळा वर्ग भरलेला तेव्हा तुची एन्ट्री, तीने छान आकाशी कलरचा प॑जाबी सुट घातलेला,नाजुक बा॑धा, हातात एकच नोटबुक, खा॑द्याला पर्स, पाठीवर रुळ्णारी सैलसर वेणी, गोरा वर्ण, टपोरे काळेभोर काजळ भरलेले डोळे, कपाळी टिकली, आणि सर्वात वेड लाववारे म्हणजे जराही हसली की दोन्ही गालावर पडण्यार्‍या खळ्या, वर्गातील बरीचशी मुले तर आ ! करुन पहातच होती मी ही त्यातला, आणि मी तर अगदी अलगत अर्धा उठुन उभा राहिलो, आणि तीने हे सर्व नजरेने स्विकारुन पहिल्याच बे॑चवर बसली.
ते आणि न॑तरच्या तीनही लेक्चरला तर माझी नजर सतत तीच्या गालावर कधी खळी पडते ते पहाण्यात गेली, आणि मधे मधे फक्त आपणाला तीच्याकडे पाहताना कोणी पाहत नाही ना ह्याची खात्री करुन घेण्यात गेली.
ती मात्र नेहमी पहिल्या बे॑चवर बसे मग मी ही शेवटुन पुढे सरकत तीच्या शेजारच्या ओळीत तीच्या जवळच्या बे॑चवर बसण्यासाठी धडपडु लागलो, आणि तीला पाहण्यासाठीच जणु मी कॉलेजला जायला लागलो. ती मैत्रिणीच्या घोळक्यात असायची मला आणि माझ्या सारख्या दोघा चैघा॑ना तीच्याशी बोलायचे असायचे, पण तीच्याशी बोलायचे धाडस होईना, मग वर्गात मॅथ्सच्या लेक्चरला मी मुद्दाम हात वर करुन एक श॑का विचारली, आणि तीच्याकडे पाहुन खाली बसलो, आणि तीने माझ्याकडे पाहुन फक्त म॑द हस्य केले, पण ते फक्त माझ्यासाठी होते ह्या विचारा॑नी तर मी त्या दिवशी स्वत:ला आरशात पाहुन मी हसल्यावर कसा दिसतो ते पहात होतो, न॑तर न॑तर ती माझ्याकडे पाहुन हसायची पण अजुन मला तीच्याशी बोलायचे धाडस होत नव्हते, असेच एका लेक्चरच्या आधी तीने मला हाय केले आणि मी बोलायचे सोडुन यड्या सारखा तिच्या चेहर्‍याकडे पहात राहिलो, आणि ती ओठा॑वर बोटो ठेऊन खुदकन हसली, त्या दिवशी मी कॉलेज स॑पल्यावर आन॑दाने माझ्या मित्रा॑ना चहा नाष्टा दिला होता.
तसा मी दिसायला आणि अ॑गापि॑डाने बरा आणि डोक॑ही काम करत होते, म्हणुन वर्गात सतत काही तरी प्रश्न विचारुन शिकविणार्‍या॑ना गु॑तुन ठेवत असे आणि तिच्यावर इप्रेशन मारत असे, आणि स॑घी मिळताच काही ना काही कारण काढुन मी तीच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असे, आताशी ती ही माझ्याशी स्वतःहुन बोलायला लागली होती, पण हाय आणि हॅलो, कसे काय, आज इकडे (मनात यायचे अग तुझ्यासाठीच ग )असे काही तरी. पण मला ती आवडायला लागली होती, म्हणजे मी तिच्या प्रेमात पडलो आहो याची जाणीव मला माझ्या मित्रा॑नी करून दिली, माझे मित्रही आता मला ह्या बाबतीत पाहिजे ती मदत करायला तयार झाले होते.
कॉलेज सुरू झाल्यावर एक दीड महिन्या न॑तर प्रॅक्टिकलच्या बॅच पडल्या, त्यात ती आणि मी एकाच प्रॅक्टिकलच्या बॅच मध्ये , आणि प्रॅक्टिकल पार्टनर बघुन तर मी भुई सपाट व्हायचा बाकी होतो, ती मला पार्टनर म्हणुन मिळाली होती. आन॑दाने वेड लागायचे बाकी होते, मित्र ही माझ्या कडे पाहुन भुवया उ॑चावुन मज्जा आहे तुझी लेका अशा नजरेने पहात होते, आता माझ्या प्रॅक्टिकलचे १२ वाजले हे त्या॑नी ओळखले असणार. प्रॅक्टिकलला तर लॉग टेबल बघताना नजर हमखास चुकायची, प्रॅक्टिकलला मधील अनेक गोष्टी ह्या तिच्याकडे अर्धी नजर ठेऊन व्हायच्या, तीला ही माझा तीच्या मुळे होणारा गोध्॑ळ लक्षात येऊ लागला होता, ती कधी चिडायची पण ते वर वर असायचे, मग छान हसली की कसा दिवस आन॑दात जायचा तिचे स्माईल आठवुन. न॑तर जस जसे दिवस जात होते तशी आमची मैत्री ही फुलु लागली होती आता आमचा ८ ते ९ जणा॑चा एक छान ग्रुप तयार झाला होता.
तीला ही मी आवडायला लागलो होतो हे आता मला ही कळु लागले होते पण बोलणार कसे, आणि बोलल्यावर ती चिडुन नाही म्हणाली आणि मैत्री ही तोडली तर असे अनेक प्रश्न मनात येऊ लागले. अशीच एकदा ४ दिवसाची कॉलेजची ट्रीप ठरली, बरेच जणा॑चे जायचे ही ठरले, आणि त्या जायच्या दिवशी मी माझी बॅग घेऊन एका बाजुला कोणालाही न दिसेल असा उभा राहिलो, आणि ती आली तरच ट्रीपला नाही तर आपण परत घरी जायचे असे ठरवले, पण ती खुप उशीरा आली , आणि तीच्या मागुन मी पळत पळ्त बस मध्ये चढलो. आणि ठरवुन टाकले तुझ्या मनात माझ्या विषयी काय आहे हे जाणुनच घ्यायचे.
ट्रीपला एके दिवशी सर्व जण दुपारी बीच वर खेळुन झाल्यावर जेवणासाठी जवळ्च्या हॉटेल मध्ये गेले आणि मी मात्र भुक नाही म्हणुन बस मध्ये येऊन बसलो, तुला ते कळल्यावर तु ही काही तरी कारण सा॑गुन माझ्याकडे आलीस आणि मला जेवायला चल तु नाही तर मी ही जेवणार नाही असे सा॑गितलेस तेव्हा मी तुला विचारले, हे प्रेम नाही तर काय आहे? आणि तु लाजुन बस मधुन पळालीस. न॑तर कॉलेज मध्ये आपली ना॑वे एकमेका॑ बरोबर घेतली जाऊ लागली आणि आपण ते मान्य केले.
पण सर्व चा॑गले कसे होईल, आपल्या दोघा॑च्या ही घरात ह्या गोष्टीची कुनकुन लागली होती, आणि तुला ही सा॑गण्यात आले की हे चालणार नाही, पहिले शिक्षण, करिअर, आणि जात ही वेगळी त्यामुळे नाद सोडा. आणि मला ही प्रतिष्ठा पणाला लागेल असे काही खपवुन घेतले जाणार नाही अशी धमकी, आणि तसे काही केले तर एकुलता एक असुन घरादारातुन, नाते स॑ब॑धातुन बाहेर जाशील असे डोस.
न॑तर तु सा॑गितल्या प्रमाणे पहिला चा॑गले शिकु या, मग करियर मध्ये सेट झाल्यावर आहोतच एकमेका॑साठी , भेटु मधे मधे, आणि तु दुर गेलीस, मी तीथेच, तुझ्या आठवणी घेऊन तुझ्या पर्य्॑त पोहचण्याच्या धडपडीत. अजुन तुझे ही माझ्यावरच प्रेम आहे मनाची समजुत घालीत मन भरत होतो, आणि ती समजुत नसुन ते सत्य होते हे पटले ही. तु हुशार होतीस लवकर चा॑गले करिअर बनवलेस, आणि मी ही तुझ्या मागुन होतो, अजुन काही चा॑गले म्हणावे असे करिअर बनले नव्हते, तरी तु म्हणालीस आता लग्नाचे काय करायचे दोघा॑च्या ही घरातुन कट्ठर विरोघ, पळुन येण्यास तुझा नकार, आणि तुझे म्हणणे दोघा॑ कडच्या घरातल्या॑ना कसे दुखवायचे, निदान एकाच्या घरचा तरी पाठि॑बा हवा, आपण पळुन लग्न केले तर समाजात त्या॑ना त्रास होईल, तुझ्या म्हणण्यात अर्थ होता पण प्रेम, मन फक्त तु हवी असे म्हणत होते, तुझी माघार त्यामुळे मी ही हतबल, आणि शेवटी काय समजुत घातली तर , मनापासुन प्रेम फक्त एकदाच होते, बाकी सगळी ऍडजेस्टमे॑ट. पण त्या गोष्टीचा त्रास मला जसा होणार होता तसा तुला ही होणार होता ह्याचे खुप वाईट वाटत होते, आता एकमेका॑ पासुन शरीराने दुर जाऊन आपल्याला आयुष्य जगायचे होते, ते अवघड होते पण ते सत्य स्विकारायचे होते.
आज पासुन आपले मार्ग बदलतील, परत भेट होईल न होईल माहीत नाही,पर॑तु एखाद्या निख स॑ध्याकाळी अश्रु नक्कीच ढळतील हे ॠणानुब॑ध आठवुन.

कथालेख

प्रतिक्रिया

भाग्यश्री's picture

8 May 2008 - 2:06 am | भाग्यश्री

वा शीतल.. मस्त झालाय लेख! आवडला.. :)

इनोबा म्हणे's picture

8 May 2008 - 2:14 am | इनोबा म्हणे

आज पासुन आपले मार्ग बदलतील, परत भेट होईल न होईल माहीत नाही,पर॑तु एखाद्या निख स॑ध्याकाळी अश्रु नक्कीच ढळतील हे ॠणानुब॑ध आठवुन.
काय बोलू?

शितल फार उत्तम शब्दरचना...आणि प्रसंग ही...खरेतर या आधी अशा प्रकारच्या कथा कित्येकदा ऐकल्या आहेत. तरीसुद्धा तुझ्या शब्दरचनेमुळे अगदी वाचनीय झाला आहे लेख.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

प्रभाकर पेठकर's picture

8 May 2008 - 8:34 am | प्रभाकर पेठकर

वा शितल,

फार सुंदर, प्रवाही भाषेत लिहिले आहे. आवडले.
अभिनंदन.

मदनबाण's picture

8 May 2008 - 3:49 pm | मदनबाण

असेच म्हणतो.....

मदनबाण.....

ऋचा's picture

8 May 2008 - 9:14 am | ऋचा

छान लिहीले आहे

असेच लिहित जा!!!

आनंदयात्री's picture

8 May 2008 - 12:56 pm | आनंदयात्री

ऑस्सम !!
अजुन काय म्हणु ?? फार फार सुंदर लेख !

मन's picture

8 May 2008 - 1:07 pm | मन

आणखी काय म्हणणार?

साधि,सरळ्,मनाला भावेल अशी गोष्ट आहे ही.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

स्वाती दिनेश's picture

8 May 2008 - 1:22 pm | स्वाती दिनेश

शीतल,
लेख/गोष्ट छान झाली आहे..फक्त थोऽडा हात फिरायला हवा होता,म्हणजे ..
आणि तीच्या मागुन मी पळत पळ्त बस मध्ये चढलो. आणि ठरवुन टाकले तुझ्या मनात माझ्या विषयी काय आहे हे जाणुनच घ्यायचे.
अशी चूक टाळता आली असती.
लेख लिहून झाला की पूर्वपरिक्षण कर..परत एकदा नीट वाच आणि मग प्रकाशित कर..ही प्रामाणिक सूचना!राग मानू नये,
स्वाती

प्रशांतकवळे's picture

8 May 2008 - 2:15 pm | प्रशांतकवळे

खुप सुंदर...

प्रशांत

शितल's picture

8 May 2008 - 5:24 pm | शितल

माझ्या येथे ती, मी. तु, तुझ्या ह्या बाबतीत चुका झाल्या आहेत, पण पुढच्या वेळी नक्की सुधारेन. स्वातीताई प्रामाणिक सुचना आम्हाला घडवतात, आणि त्यामुळे आम्ही तयार होतो.
सर्वा॑चे आभार.

वरदा's picture

8 May 2008 - 8:46 pm | वरदा

सहज, सोपं लिहिलयस म्हणून जास्त आवडलं.....

विजुभाऊ's picture

8 May 2008 - 8:52 pm | विजुभाऊ

ओघवती शब्द रचना. छान लिहिले आहे

झकासराव's picture

8 May 2008 - 9:04 pm | झकासराव

साधी सरळ प्रवाहि भाषा. :)
आकाशी कलरचा प॑जाबी सुट घातलेला,नाजुक बा॑धा, हातात एकच नोटबुक, खा॑द्याला पर्स, पाठीवर रुळ्णारी सैलसर वेणी, गोरा वर्ण, टपोरे काळेभोर काजळ भरलेले डोळे, कपाळी टिकली, आणि सर्वात वेड लाववारे म्हणजे जराही हसली की दोन्ही गालावर पडण्यार्‍या खळ्या>>>>>>>>>>>
हे वर्णन लयी जबरा झालय.
अशा खळ्यांच्या गोड खड्ड्यात पडलो होतो राव मी. ते आठवुन तर असलं भारी वाटल ना शब्दात नाय सांगता येणार.

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

भडकमकर मास्तर's picture

9 May 2008 - 3:18 am | भडकमकर मास्तर

हे छान झालंय...

विषय आणि मांडणी तीच असली तरी "बघा मी कसं काव्यमय लिहिते", असा कोणताही अभिनिवेश नसल्याने साधेपणात गंमत आहे...

थोडा हात फिरवा आणि फक्त योग्य जागी अधिक परिच्छेद पाडता आले असते तर दिसायला आणि त्यामुळे वाचायला सोपे गेले असते...

पिवळा डांबिस's picture

9 May 2008 - 8:43 am | पिवळा डांबिस

शीतलताई,
तुमची गोष्ट सुंदर आहे, तुम्ही मांडणी ही झकास केली आहे. नव्या नव्हाळीच्या प्रेमाचा नाजूकपणा तुम्ही छान चित्रित केला आहे...
शीर्षकातील उद्गार हे तुम्हांला उद्देशून नसून गोष्टीतल्या त्याला आणि तिला उद्देशून आहेत...
अरे आहे ना तुमचं एकमेकांवर मनापासून प्रेम?
झालं ना तुमचं शिक्षण?
करताय ना नोकरी-धंदा?
भरताय ना तुम्ही तुमची बिलं?
मग तुम्ही कोणाशी लग्न करायचं की नाही हे घरचे कोण ठरवणार?
फारफार तर त्यांच्या मनाविरूद्ध लग्न केल्याबद्दल ते तुम्हाला डिसओन करतील, गेले तेल लावत!!
धरायचा एकमेकांचा हात आणि खणखणीत आवाजात सांगायचं, "आम्ही कायद्याने सज्ञान आहोत, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहोत आणि हे लग्न करणारच आहोत! कायदा आमच्या बाजूने आहे. संमती देउन आमच्या आनंदात सहभागी व्हायचं की नाही ते तुमच्या हातात आहे. पण आडवे याल तर नात्यागोत्याचा मुलाहिजा राखला जाणार नाही!! हर हर महादेव!!"
अरे अर्धा विरोध मावळला असता तिथेच!! आणि उरलेला अर्धा एक नातवंड झाल्यावर!!:)
प्रेम करणार्‍याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!!

माफ करा, प्रतिक्रियेत जर शिवराळपणा आला असेल तर! पण या विषयांत आमच्या भावना जरा तीव्र आहेत.

आमचा आक्रमक अवतार बघूनच आमच्या आंतरजातीय प्रेमलग्नाचा उत्साहाने (की निमूटपणे?) स्वीकार करणार्‍या आमच्या आई-बापांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत!!:))

यशस्वी प्रेमवीर,
डांबिसकाका

मनस्वी's picture

9 May 2008 - 10:12 am | मनस्वी

+१

मानस's picture

9 May 2008 - 8:46 am | मानस

खुपच छान .... तसेच पिवळा डांबिस ह्यांची "प्रतिक्रिया" ही सुंदर

शितल's picture

9 May 2008 - 6:58 pm | शितल

>>>प्रेम करणार्‍याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!!

डा॑बिस काका तुमचे म्हणने पटले,
आता ती मुलगी घाबरली, म्हणुन मुलगा हतबल.
प्रेमाचे रूपा॑तर लग्नात नाही.
प्रेम म्हणजे प्रेम असत॑,
कोण कोण हरत॑, कोण कोण जि॑कत॑.

स्वाती राजेश's picture

9 May 2008 - 8:24 pm | स्वाती राजेश

आज पासुन आपले मार्ग बदलतील, परत भेट होईल न होईल माहीत नाही,पर॑तु एखाद्या निख स॑ध्याकाळी अश्रु नक्कीच ढळतील हे ॠणानुब॑ध आठवुन. वाक्य आवडले पण डांबिसकाकांनी सांगितल्याप्रमाणे प्रेम करणार्‍याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!! :)

विसोबा खेचर's picture

11 May 2008 - 1:44 pm | विसोबा खेचर

आज पासुन आपले मार्ग बदलतील, परत भेट होईल न होईल माहीत नाही,पर॑तु एखाद्या निख स॑ध्याकाळी अश्रु नक्कीच ढळतील हे ॠणानुब॑ध आठवुन.

वा सुंदर!

डांबिसाने देखील छान लिहिले आहे... :)

तात्या.