तीचे डोळे

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
4 Mar 2011 - 11:57 pm

" रोखूनी मजला पाहू नका डोळे हे जुल्मी गडे कशीदा मी काढु कशी " असे काहीसे गाणे कधीतरी रेडीओवर ऐकले होते.
ते वय गाणी ऐकून मोहरायचे नव्हते. मग कुठल्यातरी वयात तसे डोळे पाहिले किंचीत पिंगट.... पाणीदार... आणि एखाद्या छान चित्राला फ्रेम असावी अन त्या फ्रेममुळे चित्राला आणखीनच शोभा यावी किंवा सुंदर खडा कोंदणामुळे आणखीनच तसे काजळाच्या फ्रेममध्ये दिसणारे ते डोळे मला अचानक काहीतरी वेगळीच जाणीव देवून गेले.
ती पहिली नजर पुन्हा कधी अनुभवता येणे केवळ अशक्यच. ज्याने अनुभवली त्यालाच हे कळाते. देव भेटल्यापेक्षाही त्या क्षणात काहीतरी जादूभरे असते. एखाद्या चेहेर्‍यात नक्की काय जादू असते ते त्या नजरेलाच ठाऊक. टप्पोरे पाणीदार डोळे..काजळाच्या रेखीव फ्रेममधले.... आणि चेहर्‍याला जुल्फांची महीरप..... बोलके डोळे तुमच्या र्‍हदयातील बोल बोलत असतात.
एक नजर हा जादूभरा अनुभव प्रत्येकाने कधीनाकधी अनुभवला असतो. त्यामुळेच की काय प्रेमाची सर्वात जास्त गाणी डोळ्यांवरच लिहीली गेली असावीत .
प्रियकरासाठी प्रेयसीचे डोळे हे एक आटपाट नगर असते. त्यात स्वप्ने नांदतात. त्यात तो असतो ती असते आणि दोघांसाठी एक मोकळे निरभ्र चांदणं भरले आकाश असते. त्यात चांदण्या गाणे म्हणत असतात. चंद्राच्या चंदेरीप्रकाशात न्हाऊन ती परी झालेले असते. तिथे वचने खरी होऊन अवतरतात. स्वप्नभरल्या रस्त्यातून चालताना पायांच्या खाली नोकरी, पगार, स्वयंपाक ,मुले ,नातेवाईक असले खडे खड्डे खाचखळगे येत नाहीत. अगदी हवेतून चालत जाता येते.
भणंगातल्या भणंगाला सुद्धा स्वप्नांची ही श्रीमन्ती त्या नजरेमुळेच मिळते.
आसपासचे सगळे जग जणु आपलीच खबर घेत आहे असे काहीसे भास होतात. किराणा दुकानदार सुद्धा किराणाचे गहू हातात देताना अस्फुट हसतोय असे वाटू लागते.
रस्तातून जाताना कधी त्या डोळ्यांची मालकीण भेटली तर देशाची साम्राज्ञी भेटल्याचा आनन्द होतो. ती साम्राज्ञी दिसताच भरगर्दीचा रस्ता सुद्धा फुलाफुलंची बाग भासू लागतो.
कोण्या शायराने प्रेयसीच्या डोळ्याना सरोवाराची उपमा दिली आहे
पलको पर न रख्खो हमे. आखोंमे उतरने दो
किनारे से गहराई का अंदाजा नही आता.

डोळ्यांची भाषा ही इन्क्रीप्तेड असते. ती ज्याच्या साठी असते त्यालाच कळते. न बोलताही डोळे बरेच काही बोलून जातात.
लटका राग दाखवतात ते डोळेच ,पाहूनही न पाहील्यासारखे करतात ते डोळेच आणि त्याने आपल्याकडे पाहिले आहे का हे चोरून बघणारे असतात ते डोळेच. तीला चोरून पहील्याची चोरी देखील डोळेच पकडतात. आणी चोरी पकडल्यानंतर गालाअगोदर आरक्त होतात ते डोळेच.
तीचे डोळे.. हल्ली मला काही संगत असतात.
न बोलताताच बरेच काही बोलत असतात
भर उन्हातदेखील लिंबोणीची सावली देत असतात
तीचे डोळे ..माझ्या नकळत मला पहात असतात.
मी येणार असे ऐकल्याबरोबर माझ्यासाठी वाटेवर इंद्रधनुष्य बनून रहातात

वावरविचार

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

5 Mar 2011 - 12:09 am | आत्मशून्य

रूपहला बादल........

पिवळा डांबिस's picture

5 Mar 2011 - 12:18 am | पिवळा डांबिस

हिवाळा संपला...
मार्च उजाडला...
विजुभाऊला स्वप्न पडायला सुरवात झाली!!!!
आधी डोळे, नंतर फळे!!
:)

किराणा दुकानदार सुद्धा किराणाचे गहू हातात देताना अस्फुट हसतोय असे वाटू लागते.
ऐसा है क्या तुम्हारा? इस्स्स्स!!!
:)

बाकी तुम्ही टप्पोर्‍या पाणीदार डोळ्यांचं इतकं गुणगान केलंय मग चष्मेवाल्या पोरींनी काय करायच?
-वकील, अ. भा. च(ष्मेवाल्या). पो (रींची). संघटना
:)

आणि ओ विजुभाऊ, सव्यंपाक नव्हे हो, स्वयंपाक!!!:)
मालकांनी स्वसंपादन दिलं म्हणजे ते लगेच वापरलंच पाहिजे काय?:)
-शुद्धलेखन राष्ट्रपती

प्रास's picture

5 Mar 2011 - 9:29 am | प्रास

ही खरी समीक्षा.......

बाकी विजुभाऊंचा लेख खासच!

पैसा's picture

5 Mar 2011 - 9:13 am | पैसा

लेख आवडला. सोबत पिडांची प्रतिक्रियासुद्धा आवडली!

हरिप्रिया_'s picture

5 Mar 2011 - 11:23 am | हरिप्रिया_

+१
लेख आवडला. सोबत पिडांची प्रतिक्रियासुद्धा आवडली!

इंटरनेटस्नेही's picture

5 Mar 2011 - 11:55 am | इंटरनेटस्नेही

बाकी तुम्ही टप्पोर्‍या पाणीदार डोळ्यांचं इतकं गुणगान केलंय मग चष्मेवाल्या पोरींनी काय करायच?
-वकील, अ. भा. च(ष्मेवाल्या). पो (रींची). संघटना

लेख आवडला. पण मला चष्मेवाल्या पोरी जास्त आवडतात हे मी इथे नमुद करु इच्छितो. :)

पिवळा डांबिस's picture

5 Mar 2011 - 12:36 pm | पिवळा डांबिस

पण मला चष्मेवाल्या पोरी जास्त आवडतात हे मी इथे नमुद करु इच्छितो.
नुसतं नमूद करून काय उपयोग?
वर्गणी पाठवून (चार आणे फक्त!!!) आमच्या संघटनेचे सभासद व्हा, तर खरं!!!!
विजुभाऊच्या घरावर मोर्चा काढूयांत!!!!
:)

परिकथेतील राजकुमार's picture

5 Mar 2011 - 12:48 pm | परिकथेतील राजकुमार

अवांतराबद्दल क्षमस्व.

नुसतं नमूद करून काय उपयोग?
वर्गणी पाठवून (चार आणे फक्त!!!) आमच्या संघटनेचे सभासद व्हा, तर खरं!!!!
विजुभाऊच्या घरावर मोर्चा काढूयांत!!!!

मुलींचा मोर्चा येणार म्हणल्यावर सगळ्यांची वर्गणी भरायला तयार होतील स्वतः विजुभौच.

परिकथेतील राजकुमार's picture

5 Mar 2011 - 12:31 pm | परिकथेतील राजकुमार

तेरे मस्त मस्त दो नैन.....

मस्त हो इजुभौ. तुम्ही आता हळुहळु हिरवट व्हायला लागला आहात ;)

sneharani's picture

5 Mar 2011 - 1:16 pm | sneharani

मस्त लिहलत हो विजुभाऊ!
:)

च्यायला आम्हाला वाटलं मागल्यावेळेसारखं कुठल्यातरी पुतळ्याच्या डोळ्यांत इजुभौंना कायतरी दिसलं म्हणुन लेख लिहला की काय.

कच्ची कैरी's picture

5 Mar 2011 - 2:52 pm | कच्ची कैरी

तुमचा लेख वाचुन खालील काही गाणी आठवलीत-
ऑ़खेभी होती है दिल की जुबा बिनबोले कर देती है हालत ये पल् मे बया....
ऑ़खोसे तुने ये क्या केह दिया दिल ये दिवाना धडकने लगा ......
अखियोसे गोली मारे लडकी कमाल ....
जीवनसे भरी तेरी ऑखे मजबूर करे जीने के लिये....
असो .लेख छानच आहे .

लेख आवडला विजुभाउ, तिचे डोळे हे वाचल्याक्षणीच ही गाणि कानात वाजायला लागली.

ते नयन बोलले काहीतरी, मी खुळी हासले खुळ्यापरी

डोळे हे जुल्मी गडे रोखुन मज पाहु नका

डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा मिटताच पापण्या अन का चंद्र ही दिसावा (लाजुन हासणे अन हासुन ते पहाणे)

या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्याभोवती

आणि सगळ्यात भारी म्हणजे || नैन को नैन नाही मिलाओ , देखत सुरत आवत लाज | - ब्लॅक व्हाईट मधलं हे गाणं माझ्या मनात कायमचं कोरलं गेलंय, आत्ता पण टायपायचं सोडुन टेबलावर ताल धरतोय तर हापिसातले सगळॅ पुन्हा झटका आला अशा नजरेनं पाहताहेत माझ्याकडे.

विजुभाऊ's picture

7 Mar 2011 - 10:32 am | विजुभाऊ

डोळ्यांवरून बरीच गाणी आहेत
आखों ही आखों मे इशारा हो गया...बैठेबैठे जीने का सहारा हो गया
हम आपकी आखों मे इस दिलको बसायेंगे
ये आखे देखकर हम सारी दूनीया भूल जाते है
तेरी आखोके सिवा दुनियामे रख्खा क्या है
अखियों के झरोके से मैने देखा जो सोचकर
तेरे नैना तेरे नैना
नैन लड गये रे मनवा मा कसक हुई रे गवा.
नैना बरसे रीम झीम रीमझीम पिया तोरी आवन की आस्....
आख्खां आख्खावीच दिल ले गई चोरनी

वपाडाव's picture

7 Mar 2011 - 2:55 pm | वपाडाव

आफरी आफरी - नुसरत फतेह अलि खान
या गाण्यातील एक कडवं डोळ्यांची महिमा सांगतं.
ते असं-
आँखें देखीं तो मैं देखता रह गया,
जाम दो और दोनों ही दो आतिशा,
आँखें या मैकदे के वोह दो बाब हैं,
आँखें इनको कहूं या कहूं ख्वाब हैं,
आँखें नींची हुईं तो हया बन गईं,
आँखें ऊची हुईं तो दुआ बन गई,
आँखें झुक कर उठी तो क़ज़ा बन गई,
आँखें जिन में क़ैद आसमान ओ ज़मीन,
नरगिसी नरगिसी, सुरमई सुरमई,
नरगिसी नरगिसी, सुरमई सुरमई,
आफ़रीन-आफ़रीन...

बाकी लेख उत्तमच.