'' मरावे परी लग्न नाही करावे ''

विवेकवि's picture
विवेकवि in जे न देखे रवी...
7 May 2008 - 11:00 am

आज माझ्या वाढदिवसा निमित्त हे एक नविन विड॑बन

मना सज्जना केर वारे करावे
पहाटे भल्या रोज पाणी भरावे
धुवावी अशी घास घासुन लादी
पसारा नको आवरा निट गादी

मना सज्जना तोच चंडी उठावी
तिची त्या क्षणी जिभ वेगे सुटावी
चहा पाजुनि थंड डोके करावे
पति चांगला ऎसे नांव मिळावे

त्वरेने पुन्हा भात पोळी करावी
विळी घेउनी योग्य भाजी चिरावी
डबा रोजचा एक जैसा नसावा
शिरा न्याहरीला जरुर असावा

प्रभाते मनी बायकोला भजावे
तरी स्वल्प पैसेच खर्चा मिळावे
पगारास हाती तिच्या सोपवावे
कमावुन जास्ती तिला तोषवावे

तिचें पाय रात्री जरासी चुरावें
मका तेल ते चोळुनि जें मुरावे
निजायास गादी उशी शाल द्यावी
अशी चाकरी नित्य संपन्न व्हावी

नकोरे मना बोल ते बायकोचें
असे की जणु बाण छातीत टोचें
सख्या सांगतो निट ध्यानि धरावें
मरावे परी लग्न नाही करावे

मरावे परी लग्न नाही करावे.

तात्या॑ साठी
न आवडल्यास याला बाहेरील रस्ता दाखवावा

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

7 May 2008 - 11:06 am | केशवसुमार

विवेकशेठ,
वाढदिवसाच्या शुभेच्छा..मग आज श्रमपरिहार कुठे?
(शुभेच्छुक)केशवसुमार
अवांतरः हे विडंबन 'मिल्या' (मिलिंद छत्रे )यांचे आहे..कृपया तशी नोंद करावी ही विनंती..
(सावध)केशवसुमार

विवेकवि's picture

7 May 2008 - 11:13 am | विवेकवि

कुठे हि चालेल .

आपण म्हणाल तेथे..

आपलाच..

विवेक वि.

मनस्वी's picture

7 May 2008 - 12:08 pm | मनस्वी

मला आवडले.

मना सज्जना केर वारे करावे
पहाटे भल्या रोज पाणी भरावे
धुवावी अशी घास घासुन लादी
पसारा नको आवरा निट गादी

त्वरेने पुन्हा भात पोळी करावी
विळी घेउनी योग्य भाजी चिरावी
डबा रोजचा एक जैसा नसावा
शिरा न्याहरीला जरुर असावा

ऋचा's picture

7 May 2008 - 11:16 am | ऋचा

मना सज्जना केर वारे करावे
पहाटे भल्या रोज पाणी भरावे
धुवावी अशी घास घासुन लादी
पसारा नको आवरा निट गादी

8}

संदीप चित्रे's picture

7 May 2008 - 7:33 pm | संदीप चित्रे

विवेकवि:
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
ह्या विडंबनाचा मूळ कवी मिलिंद छत्रे आहे.
कृपया तसे लिहावे.

तात्यासाठी:
अशा लेखनासाठी (जिथे मूळ कवी / लेखक नमूद केलेले नाही) कृपया योग्य ती तजवीज करावी !!!

चतुरंग's picture

7 May 2008 - 8:21 pm | चतुरंग

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

(अवांतर - 'तिकडून' इकडे माल आयात करण्याचा प्रयत्न चांगला आहे पण 'पावती' सहित नसलेला माल कस्ट्म्स मधे पकडला जातो हे इथून पुढे ध्यानात असू द्यावे! आपले नाव सार्थ करावे!! ;))

चतुरंग

मिल्या's picture

9 May 2008 - 11:36 am | मिल्या

विवेक वाढदिवसा दिवशी स्वतःलाच अशी भेट देण्याचा प्रकार आवडला :)

हे चौर्यकर्म तुमचे आहे कींवा तुम्हाला कुणी fwd केले आहे हे माहित नाही

पण इतक्या जणांनी इथे लिहिले आहे की हे विडंबन 'माझे' आहे तरी तुम्ही त्यावर काहीच बोलत नाही आहात तेव्हा तुमच्या हेतू बाबत नक्कीच शंका येते...

बाकी ज्याने कोणी चोरी केली त्याने अगदी जाणिवपूर्वक केली हे नक्की कारण फार हुशारीने
'मिल्या' सांगतो लग्न नाही करावे मध्ये
मिल्या काढून सख्या घुसडले आहे..

ह्या गोश्टीचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.. :(

मिपा चे नेमस्तक/प्रशासक ह्याची दखल घेतील काय?

केशव, संदिप आणि चतुरंग तुमचे खूप आभार.. तुमच्या सारखे वाचक्/लेखक आहेत म्हणून चोर्या उघडकीस तरी येत आहेत...

विसोबा खेचर's picture

9 May 2008 - 3:36 pm | विसोबा खेचर

गेले दोन दिवस कामाच्या व्यापात ऑनलाईन येता आले नाही, त्यामुळे हा चोरीचा मामला मला माहीत नव्हता!

झाल्या प्रकाराबद्दल मी मिसळपाव डॉट कॉम तर्फे मिलिंद छत्रे यांची जाहीर क्षमा मागतो. ही साहित्यचोरी करणारे विवेकवि हे मिसळपावचे सभासद आहेत याची आज मिसळपावला शरम वाटते!

विवेकवि यांचा आयडी ब्लॉक करण्यात येत आहे...

तात्या॑ साठी
न आवडल्यास याला बाहेरील रस्ता दाखवावा

विवेकवि हे एकतर दुसर्‍याचे काव्य चोरून, तसा उल्लेख न करता मिपावर टाकतात वर शिवाय 'न आवडल्यास याला बाहेरील रस्ता दाखवावा' असंही सुचवतात या मानभावीपणाला काय म्हणावे?

असो, झाल्या प्रकाराबद्दल मी मिलिंद छत्रे यांची पुन्हा एकदा जाहीर क्षमा मागतो..

आपला,
(शरमिंदा) तात्या.

संदीप चित्रे's picture

10 May 2008 - 10:16 am | संदीप चित्रे

तात्या ..
मूळ कविता माझी नाही पण 'मिल्या'च्या कवितेला तुझ्या कारवाईने योग्य तो न्याय मिळाला असं वाटतंय.
मनापासून धन्स मित्रा !!
- संदीप

मिल्या's picture

10 May 2008 - 5:34 pm | मिल्या

तात्या,
तातडीने दखल घेउन कारवाई केल्याबद्दल आभार...
पण तुम्ही माफी मागून मला लाजवता आहात..

ह्यात तुमची काही चूक आहे असे मला वाटत नाही..

इथे कोण कुठुन येते आणि काय लिहिते हे प्रत्येक पोस्ट बाबत तपासणे आणि ह्यावर प्रशासक ह्या नात्याने नियंत्रण ठेवणे केवळ अशक्य आहे तेव्हा तुम्ही कृपया शरमिंदे होउ नका...

परत एकदा आभार...

मिल्या