काही खावेसे वाटते पण खाणार नाही

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
7 May 2008 - 4:53 am

काही खा|वेसे वाटते पण खाणार नाही
पण खाणार नाही
गरगरीत पोटाचा ढेर वाढू देणार नाही
काही खा|वेसे वाटते पण खाणार नाही
पण खाणार नाही |धृ|

बासुंदी श्रीखंडपुरी आमरस रत्नांगीरी
पुरणपोळी तुपे माखली चाखती घरोघरी
चिकनकरी मटनमच्छी चोपती काहीबाही
शेवटी आइसक्रीमात रसगुल्ले घालुन खाई

सारे खा|वेसे वाटते पण खाणार नाही
पण खाणार नाही |१|

केक थोरला गोडसा आहे समोर ठेवला
चॉकलेट लोण्याची छान नक्शी काढला
आत भरले असती अक्रोडाचे तुकडे काही
त्याकडे मी आससुनी पुन्हा एकदा हो पाही

सारे खा|वेसे वाटते पण खाणार नाही
पण खाणार नाही |२|

माझ्या ताटात वाढला बेचव भाजीपाला
हातसडीचा तांदूळ डाळीच्या जळी भिजला
खिरीत साखर नाही पोळी एकलीच राही
कारल्याच्या भाजीने हो अंगाची कडू लाही

काही खा|वेसे वाटेना मुळी खाणार नाही
मुळी खाणार नाही |३|

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

7 May 2008 - 7:53 am | विजुभाऊ

काही लिहायचे आहे पण लिहिणार नाही.
=)) आवडले

पक्या's picture

7 May 2008 - 7:56 am | पक्या

कविता ठीक आहे. पण एक समजले नाही--
चान्गले चवदार जेवण ही खाणार नाही....साधे ही आवडत नाही.
मग खाणार तरी काय?
-- (खाण्यावर मनापासून प्रेम करणारा) पक्या

अरुण मनोहर's picture

7 May 2008 - 8:17 am | अरुण मनोहर

खाणार कसे? डॉक्टरने मना केले आहे. फक्त उकडलेला भाजीपाला वगैरे सोडून......

ठीक आहे, तुमची इच्छा!!
पण उपाशी मेलांत तर मिपाकरांना मात्र दोष लावू नका हो!!:))
ह.घ्या.

ऋचा's picture

7 May 2008 - 9:48 am | ऋचा

मी मिपा वर नविन आहे..

मला ह्.घ्या. इ. शब्दांचे अर्थ कळू शकतील का?

धमाल मुलगा's picture

7 May 2008 - 10:29 am | धमाल मुलगा

ह.घ्या.= हलकेच घ्या = take it lightly....सो शिंपल :)

विसोबा खेचर's picture

7 May 2008 - 10:32 am | विसोबा खेचर

वा मनोहरशेठ, मस्त कविता..! :)

माझ्या ताटात वाढला बेचव भाजीपाला
हातसडीचा तांदूळ डाळीच्या जळी भिजला
खिरीत साखर नाही पोळी एकलीच राही
कारल्याच्या भाजीने हो अंगाची कडू लाही

हे वाचून तुझं आहे तुजपाशी नाटकातल्या हातसडीचे तांदूळ आणि गाईच्या तुपाचा आग्रह धरणार्‍या आचार्यांची आठवण झाली! :)

औरभी लिख्खो भिडू... :)

आपला,
तात्याभैय्या देवासकर,
देवासकरांची कोठी, इंदौर.

धमाल मुलगा's picture

7 May 2008 - 10:33 am | धमाल मुलगा

:)
अरुणराव, कविता वाचायला मजा आली :)

पण हे.. हे... असं जगायचं म्हणजे किती अवघड आहे हो....

च्यामारी त्या डॉक्टर्‍याच्या, एव्हढी बंधनं घालायची?

माझ्या ताटात वाढला बेचव भाजीपाला
हातसडीचा तांदूळ डाळीच्या जळी भिजला
खिरीत साखर नाही पोळी एकलीच राही
कारल्याच्या भाजीने हो अंगाची कडू लाही

अरेरेरेरेरेरेरेरे..........
कधी डॉक्टरचा आणि घरच्यांचा डोळा चुकवून या माझ्याकडे...मस्त बेत करु काहीतरी...जी भर के खाओ...तबियत एकदम खुश करुन टाकू आपण तुमची :)

अरुण मनोहर's picture

7 May 2008 - 1:31 pm | अरुण मनोहर

आमंत्रणासाठी धन्यवाद. पण जास्त खाणे नको. आधीच तो बुश आपल्या सगळ्यांचे खाणे काढतो आहे. आपण खाऊ आणि पचणार नाही त्याला.

धमाल मुलगा's picture

7 May 2008 - 1:37 pm | धमाल मुलगा

:))
हे लय भारी!

आपण खाऊ आणि पचणार नाही त्याला.

मग तर मस्त तर्रीदार मसालेदार काहीतरी करु...लागुदेत साल्याला ढंढाळ्या !!!

कुंदन's picture

7 May 2008 - 1:41 pm | कुंदन

ओसामा त्याची काळजी घ्यायला समर्थ आहे ......

मदनबाण's picture

7 May 2008 - 10:38 am | मदनबाण

शेवटी आइसक्रीमात रसगुल्ले घालुन खाई
हे करुन पाहुया म्हणतो !!!!! :)
बाकी बरच काही बोलायचं आहे पण नंतर बोलु..... :D

(खादाड)
मदनबाण.....

अन्जलि's picture

7 May 2008 - 1:46 pm | अन्जलि

बुशचि कल्जि कशला कर्तय? तो त्यचे कय ते ब्घुन घेइल. तुम्हि खा मस्त त्यचे कय ते ओसमा करेल

जरा नीट टंका की..डोळ्याना किती त्रास होतो वाचताना.

भडकमकर साहेब : तुमचे टंक लेखनाचेदेखील काही वर्ग आहेत का हो?

ह. घ्या.

धमाल मुलगा's picture

7 May 2008 - 3:49 pm | धमाल मुलगा

=))

शेठ, जोरात आहे गाडी :)

मास्तर, आता तुमचे कल्लास लैच हीट्ट झालेत बघा....
काय शाखा बिखा काढायच्या का? सांगा, आपण करु ऍरेन्जमेन्ट :))

चतुरंग's picture

7 May 2008 - 8:47 pm | चतुरंग

तुम्चि त्न्क्लेखनाचि गदब्द किति दिवस चलु रह्नन्र अजुन?
बोब्दे बोल फर दिवस चन्ग्ले नाहि वातत ना म्हनुन म्हनले! ;))

चतुरंग

गणपा's picture

7 May 2008 - 11:38 pm | गणपा

तुम्चि त्न्क्लेखनाचि गदब्द किति दिवस चलु रह्नन्र अजुन?
बोब्दे बोल फर दिवस चन्ग्ले नाहि वातत ना म्हनुन म्हनले!
=)) =))
काय रे रंगा, ढवळ्या शेजारी पवळ्या वाटत............ ;)
-- @) गणपा

विसोबा खेचर's picture

8 May 2008 - 7:38 am | विसोबा खेचर

बोब्दे बोल फर दिवस चन्ग्ले नाहि वातत ना म्हनुन म्हनले!

सह्ही र रंगा! तू सुद्धा अंमळ वेडझवाच दिसतोस! :))

तात्या.

पिवळा डांबिस's picture

8 May 2008 - 8:11 am | पिवळा डांबिस

तात्या, मला तर तो कंप्लीट तुमच्या-आमच्यासारखाच वाटतो!!
तो कबूल करत नाही, पण....
कदाचित त्याची बायकोही मिपा वाचत असावी!:))
घाबरतंय, तिच्यायला!!!:))

खुल्ल्ला,
पिडा.

विसोबा खेचर's picture

8 May 2008 - 8:59 am | विसोबा खेचर

रंगा लेकाचा बायकोला घाबरतो... :))

चतुरंग's picture

8 May 2008 - 9:15 pm | चतुरंग

अनुष्कावहिनी पोष्टकार्डावर डकवायला आणि चित्रात पहायला ठीक आहेत; एकदा का सौ.तात्या झाल्या ना म्हणजे त्यांचे वेगवेगेळ्या 'राग-रागिण्यां'मधले 'सूर-ताल' सांभाळता सांभाळता तुमचे एकदम "ता थै तत थै" होऊन जाईल समजलात काय? म्हणे रंगा बायकोला घाबरतो. (स्वगत - इतकं खरं खरं बोलतात का चारचौघात! )(पिडा काकाना विचारा हवं तर! :B )

चतुरंग

चतुरंग's picture

8 May 2008 - 9:09 pm | चतुरंग

तुमच्या आमच्या सारखा म्हणजे काय हो? :W
आणि कबूल काय करायचंय? /:)
खुल्लमखुल्ला बोला ना. घाबरलात का? <):)

(अवांतर - दोन दोन 'चतुरंग' दिसले की बायको वाचत असेल? #o अरेच्या हे लक्षातच आलं नव्हतं, बरं झालं सांगितलंत! ~X(
स्वगत - आता तिला सांगितलच पाहिजे पिडां नी ओळखलं म्हणून )

चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 May 2008 - 9:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्चि त्न्क्लेखनाचि गदब्द किति दिवस चलु रह्नन्र अजुन?
बोब्दे बोल फर दिवस चन्ग्ले नाहि वातत ना म्हनुन म्हनले!

ह. ह. पु. वा. !!! :))

पक्या's picture

7 May 2008 - 2:27 pm | पक्या

अहो अंजली मॅडम,
जरा नीट टंका की..डोळ्याना किती त्रास होतो वाचताना.
आयला आम्ही इथे नवीन असूनही टंकताना एवढी मेहनत घेतोय.टंकलेखन साहाय्य आपल्यासाठीच आहे. उगाच ते नाही दिलेलं.

--पक्या

गणपा's picture

7 May 2008 - 2:49 pm | गणपा

जरा नीट टंका की..डोळ्याना किती त्रास होतो वाचताना.
:))
हे बाकी खर हा अंजली तै.

गणपा's picture

7 May 2008 - 3:06 pm | गणपा

मनोहरपंत,
मस्त.
काही खा|वेसे वाटते पण खाणार नाही
पण खाणार नाही
गरगरीत पोटाचा ढेर वाढू देणार नाही

सद्ध्या आमचा धेर भलताच वाढीस लागला है . बटाट्याच्या चाळीतल्या पंतांसारखे वजन धटवायचे बरेच उपाय केले. (त्याचा शेवट काही पंतांपेक्षा वेगळा झाला नाही)
(ढेरपोट्या) गणपा

प्रभाकर पेठकर's picture

8 May 2008 - 9:23 pm | प्रभाकर पेठकर

सद्ध्या आमचा धेर भलताच वाढीस लागला है

वेळीच आवरा. घेर ३८"पेक्षा जास्त वाढला तर मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकार अशा गंभीर आजारांना लाल गालिचा पसरून आमंत्रण दिले जाते.
मी खड्यात पडलो आहे म्हणून सांगतोय 'इथे खड्डा आहे, त्यात पडू नका'.

अरुण मनोहर's picture

9 May 2008 - 6:48 pm | अरुण मनोहर

रस्त्यांमधल्या खड्ड्यां विषयी ऐकून होतो. पण हे भलतेच! येवढ्या मोठ्या घेराचेपण खड्डे असतात का?

प्रभाकर पेठकर's picture

9 May 2008 - 8:50 pm | प्रभाकर पेठकर

खड्डा तुमच्या आमच्या 'घेरा' पेक्षा कितीतरीपट मोठ्ठा असतो. त्यातून बाहेर पडणे कठीण होते. व्याधींमुळे डॉक्टरचे खर्च, जमल्यास हॉस्पिटलचा खर्च, तुम्हाला स्वत:ला शारीरिक त्रास, तुमच्या जवळच्या नातेवाईकांना मानसिक त्रास, पाळता न येण्या सारखी पथ्यपाणी, आवडीचे पदार्थ जन्मभरासाठी सोडण्याची शिक्षा..... वाढवावा तेवढा खड्डा मोठ्ठा होत जातो. सल्ला पटला नसेल तर अनुभव घ्या.

चतुरंग's picture

9 May 2008 - 9:09 pm | चतुरंग

'जास्त खायचे असेल तर कमी खा' हा आरोग्याचा मूलमंत्र आहे! :)

चतुरंग