मत

कालिन्दी's picture
कालिन्दी in जनातलं, मनातलं
7 May 2008 - 1:14 am

नमस्कार मन्ड्ळी,
मी इथे नविन आहे. मराठीत लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.
मी या पूर्वीही मीपा वाचत होते. पण सद्स्य नव्हते.
मीपा छान आहे. त्यात वाद्च नाही. पण एक गोष्ट वाचताना लक्ष्क्षात आली कि इथे नवीन पेकी कोणी प्रतिक्रिया टाकली की जुने लोक ती सरळ उडवून लावतात किन्वा सरळ ignore करतात . आणी जुन्याना मात्र support kartat.
त्यामुळे इथे लिखाण करु नये अशी भिती वाटत रहाते.

धोरणविचार

प्रतिक्रिया

मन's picture

7 May 2008 - 2:27 am | मन

असं आपल्याला का वटतं ते उदाहरणादाखल सांगु शकाल काय?
मीही इथे अगदिच नवीन अहे.
येउन जेमतेम १ आठवडाही झाला नसेल.

जरा इथे पहा:-http://www.misalpav.com/node/1620
हे आर्टिकल मी इथे आल्या आल्य एक्-दोन दिवसातच टाकलं होतं.
आणि भर भरुन प्रतिसाद मिळाला.लेखाखाली प्रतिसाद तर आलेच, पण खरड वहीत ही कौतुक झालं,
काही जणांनी दोन्-चार सुचवण्या केल्या.व्य नि..(निरोप) सुद्धा आले.
काहिंनी (प्रेमाने आणि हक्काने)टपल्याही मारल्या.
(सकारात्मक टीकाही मिळाली,ज्यामुळे पुढील लिखाणाच्या चुका टाळता येतील.)

पण सांगायचं हेच की,दखल घेतली गेली.

तुम्ही म्हणताय इग्नोर होतं म्हणुन.
मी आत्ता तुमची वाटचाल पाहिली,तुम्ही अजुन काहीही लिहिलेलं नाही.(हा वाद काढायचं सोडुन.)
द्या बरं एखादं उदाहरण.

अहो, फार फार दिलदार आणि भन्नाट माणसं आहेत ही.
जरा लिहुन पहा,नुसता प्रयत्न तरी करा.इथल्या पाठिंब्यावरुन तुम्हाला इतका हुरुप येइल,
की नकळत प्रतिभा खुलेल्,मराठी वापराविशी वाटेल्,नवे विचार्-कल्पना सुचतील.

हे मी अगदिच नवखा असलो तरी सांगतोय.
किंबहुना अगदिच नवखा आहे म्हणुनच सांगतोय;स्वानुभवावरुन.

मी जी वरती लिंक दिलेली आहे, तीच कथा मी इतर तथाकथित सु-प्रतिष्ठित संकेत स्थळावर टाकली तर
प्रतिसाद किती? केवळ ३-४? त्यातही १ शुद्धलेखनाचे डोस पाजणारा.
दुसर्‍या ठिकाणी तर माझे लेखन पार उडवुनच दिले,कारण काय्,तर त्याने कुठल्याही माहितीची देवाण -घेवाण होत नाही.

आता या स्थितीत मला सांगा,आहे असं कुठ्लं स्थळ जे :-
१.तुम्हाला पुर्व परवानगीशिवाय लिखाण प्रसिद्ध करु देतं.
२.शुद्ध लेखनाचे डोस पाजुन डोकं भणाणुन सोडत नाही.
३.तुमच्या लेखनाच्या अस्तित्वाला मर्यादा घालत नाही.
तुम्ही ललित लिखाण लिहु शक्ता,चार्चा ही करु शकता.
४.आणि इतकं करुन, ज्यानि आजच पहिला लेखन केलयं पहिल्यांदा त्याला पहिल्याच दिवशी आपल्यात सामावुन घेतं?

थोडक्यात सांगायचं तर, मनातील निराधार भिती काढा.
लिहा इथे जे तुमचं काही लिखाण असेल तर.
नसेल तरीही हरकत नाही,खुशाल इतरांचे वाचु शकतो आपण.
तेही नाही तर मन मोकळ्या गप्पा तरी नक्किच मारता येतात.
नाही का?

आपलाच (उत्तराच्या प्रति़क्षेत असलेला),
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

गणपा's picture

7 May 2008 - 2:00 am | गणपा

सर्व प्रथम मिपा वर आपल स्वागत.
मिपा एकदम जिंदादिल स्थळ आहे. मीही सभासद होण्यापुर्वचो इथे पाहुणा म्हणुनच वावरायचो.
इथे चांगल्याला चांगल म्हणणार आणि नाठाळाला हाणणार. कंपुबाजी अजुन तरी पाहाण्यात आली नाही.

बाकी मनोबाने वर सांगितकच आहे.
-गणपा.

चतुरंग's picture

7 May 2008 - 2:15 am | चतुरंग

पण एक गोष्ट वाचताना लक्ष्क्षात आली कि इथे नवीन पेकी कोणी प्रतिक्रिया टाकली की जुने लोक ती सरळ उडवून लावतात किन्वा सरळ ignore करतात . आणी जुन्याना मात्र support kartat.

हे तुमचं वाक्यच सांगतंय की तुम्ही अजून इथे पुरेशा वावरला नाही आहात.
कारण संपादकांशिवाय इथे कोणालाही ("जुने लोकसुध्दा") काहीही उडवायचा हक्क नाही. व्यक्तिगत टीका, अपशब्दांचा वापर, शेरेबाजी, लेखन चौर्य असले प्रकार घडले तर मात्र तंबी देऊन नंतर संपादकांकडून लेखन उडवले जाऊ शकते. पण तसे घडणार नाही ह्याची जबाबदारी लेखकाचीच नाही का?
सांगायचा मुद्दा हा की निवांत या, सभ्यतेचे आपण नेहेमी पाळतो ते सर्व नियम पाळा, मि.पा. वर ताव मारा, प्रतिक्रिया द्या, लेखन करा, प्रतिक्रिया आजमावा. इथे सर्व आपलेच आहेत. स्वागत!

चतुरंग

मन's picture

7 May 2008 - 2:25 am | मन

तुमची ही चर्चा सुद्धा(जी सरळ सरळ इथल्या नेहमिचे सभासद आणि खुद्द संचालक ह्यांच्यावर आरोप करते.)
ही इतका वेळ शाबुत आहे, ते काय इथे संपादक मनमानी कारभार करतात म्हणुन?
की सगळ्यांच्या खुले पणाची ही साक्ष आहे?
तुम्हीच ठरवा बुवा.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

कालिन्दी's picture

7 May 2008 - 4:19 am | कालिन्दी

-- कारण संपादकांशिवाय इथे कोणालाही ("जुने लोकसुध्दा") काहीही उडवायचा हक्क नाही.

अहो मी उडवणे म्हणजे delete करणे असे म्हणत नाहीये. टर उडवणे , मत हाणून पाडणे या अर्थी उडवून लावणे असे म्हट्ले होते. असो.
मन ने छान सान्गितले. त्यामुळे भिती जाऊन हुरूप आला आहे. धन्यवाद त्या बद्दल.

स्वागता बद्दल सर्वान्चे मनःपूर्वक आभार.
माझ्या मताबद्दल कोणी गैरसमज करून घेतला नसावा अशी आशा करते. मनात जे होते ते लिहीले. नसतेच लिहीले तर ही अढी व गैरसमज दूर झाला नसता.

एक प्रश्नः शब्दान्वर अनुस्वार कसा द्यायचा ?
'टंकलेखन साहाय्य' मधे बघितले पण तिथे समजले नाही.

मन's picture

7 May 2008 - 4:27 am | मन

समजा तुम्हाला टाइप करायचा आहे शब्द "मंद" तर टाइप करा

(स्मॉल्-कॅपिटल जशे दिले आहेत तशेच ठेवा,)
maMd

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

मन's picture

7 May 2008 - 4:28 am | मन

शिफ्ट + एम वापरा अनुस्वारासाठी.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

विसोबा खेचर's picture

7 May 2008 - 8:34 am | विसोबा खेचर

त्यामुळे इथे लिखाण करु नये अशी भिती वाटत रहाते.

मग नका करू इथे लिखाण! शिंपल...! :)

इथे तुम्हाला लेखन करायलाच हवे अशी सक्ति कुणीही केलेली नाही. तुमच्यावाचून मिपाचं आणि मिपावाचून तुमचं काही एक अडणार नाही.

जी मंडळी इथे लेखन करतात ती मिपावरच्या प्रेमापोटी लेखन करतात, मिपावरच्या आपुलकीपोटी लेखन करतात असा माझा विश्वास आहे. आणि मिपाबद्दल ज्यांना प्रेम आणि विश्वास आहे ती मंडळी इथे लेखन करतच राहतील अशीही माझी खात्री आहे आणि मिपा त्यांचं सदैव ऋणीच राहील!

परंतु ज्या मंडळींच्या मनात मिपाबद्दल काही शंकाकुशंका आहेत, भिती आहे त्यांनी इथे लेखन न केलेलेच बरे! :)

आपला,
(मिपाकर) तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

7 May 2008 - 8:50 am | प्रभाकर पेठकर

पण एक गोष्ट वाचताना लक्ष्क्षात आली कि इथे नवीन पेकी कोणी प्रतिक्रिया टाकली की जुने लोक ती सरळ उडवून लावतात किन्वा सरळ ignore करतात . आणी जुन्याना मात्र support kartat.
त्यामुळे इथे लिखाण करु नये अशी भिती वाटत रहाते.

असं आपल्याला का वटतं ते उदाहरणादाखल सांगु शकाल काय?

आपण श्री. मन ह्यांच्या वरील प्रश्नाकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष केले आहे.
'पण वाचताना एक गोष्ट लक्षात आली' म्हणताना ती गोष्ट कुठल्या लिखाणांवरून, प्रतिसादावरून लक्षात आली हे तुम्ही सांगायला हवे.
मिपावर लेखन स्वातंत्र्य जरूर आहे. पण पुराव्या शिवाय आरोप करणे म्हणजे संपादकांचा आणि सर्व सन्माननीय सदस्यांचा अपमान करणे होते.
एकतर आपले आरोप सप्रमाण सादर करा किंवा पदार्पणातच मिपाकारांचा अपमान केल्या बद्दल (आरोप मागे घेऊन) सर्वांची माफी मागा.

कालिन्दी's picture

7 May 2008 - 8:53 am | कालिन्दी

--मग नका करू इथे लिखाण! शिंपल...!

तात्यान्चे हे विचार म्हणजे पूर्णपणे निरूत्साही बनवणारे आहेत...यायच तर या नाहीतर जा.
ईथे वरील सर्वान्चे विचार सकारान्मक आहेत. तुमचा attitude मात्र फारच निगेटिव्ह आहे.

-- कालिन्दी

पिवळा डांबिस's picture

7 May 2008 - 9:32 am | पिवळा डांबिस

मला एक सांगा!
तुमच्याच म्हणण्यानुसार तुम्ही मिपाच्या नवीन सदस्य आहांत, होय की नाही?
"वाटचाल" मध्ये आम्हांला तरी तुमचे स्वतःचे साहित्य अजून काही आढळले नाही, त्यावरून अजून तरी मिपावर तुम्ही स्वतःचे असे (कदाचित प्रतिक्रिया सोडून) काही लिखाण केलेले दिसत नाही, होय की नाही?
असं जर आहे तर तुम्हाला मिपाच्या इतर नव्या/जुन्या सभासदांच्या प्रतिक्रियांविषयी उठाठेव करायची गरज काय? आणि तुम्ही ती केल्यावर इतर सभासदांनी "वा! किती सुंदर लिहिते आहे ही कालिन्दी!" असं म्हणावं अशी तुमची अपेक्षा आहे काय?

तुम्ही म्हणता की कोणा एकाची प्रतिक्रिया तुम्हाला सकारात्मक वा उत्तेजनात्मक आली नाही. पण तुम्हांला उत्तेजन/उत्साह देणे हाच मिपा चा मूळ संकल्प आहे असे तुम्हांला का वाटते? तुम्ही लिहिलेलं लिखाण जर चांगलं असेल तर मिपाचे सभासद ते जरूर उचलून धरतात. आणि जर ते भिकार असेल तर तुम्ही नवीन सभासद आहांत की जुने याचा विचार न करता मिपाकर ते जमिनीवर आदळतात असा माझा अनुभव आहे.

तेंव्हा प्रथम तुम्ही इथे लिहा, तुमची योग्यता तुमच्या लिखाणाने सिद्ध करा ,आणि मग इतरांच्या प्रतिक्रियांवर कॉमेण्टस करा...

तुम्हांस सुयश चिंतू इच्छिणारा,
पिवळा डांबिस

मदनबाण's picture

7 May 2008 - 10:25 am | मदनबाण

मराठीत लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.
उत्तम,,,हे सर्वात महत्वाचे आहे !!!!!

नवीन पेकी कोणी प्रतिक्रिया टाकली की जुने लोक ती सरळ उडवून लावतात किन्वा सरळ ignore करतात . आणी जुन्याना मात्र support kartat.
हे मात्र मला अजिबात पटलेल नाही.....
त्यामुळे इथे लिखाण करु नये अशी भिती वाटत रहाते.
ही तुमची भिती १००% निराधार आहे असे मला वाटते.....
कालिन्दी आपण लिहुन तर पहा......ज्या काही योग्य प्रतिक्रीया ध्यायच्यात त्या मिपाच्या मायबाप वाचक वर्गाकडुन तुम्हाला मिळतीलच.....
लिखाण करण्याआधीच प्रतिक्रिया निगेटिव्ह असेल हे विचार आधी डोक्यातुन काढुन टाका !!!!!
सांगायचा मुद्दा हा की निवांत या, सभ्यतेचे आपण नेहेमी पाळतो ते सर्व नियम पाळा, मि.पा. वर ताव मारा, प्रतिक्रिया द्या, लेखन करा, प्रतिक्रिया आजमावा. इथे सर्व आपलेच आहेत. स्वागत!
चतुरंगराव जे सांगत आहेत ते अगदी योग्य आहे.....

(अवांतर :-- नवीन सदस्य आहांत, होय की नाही?तुम्ही स्वतःचे असे (कदाचित प्रतिक्रिया सोडून) काही लिखाण केलेले दिसत नाही, होय की नाही?>> हे काय डांबिस काका हा आर.ठाकरे प्रभाव की काय? :D )

(मिपा प्रेमी)
मदनबाण.....

विसोबा खेचर's picture

7 May 2008 - 10:17 am | विसोबा खेचर

यायच तर या नाहीतर जा.

मग आता दुसरं काय म्हणणार? तुम्हीच सांगा बरं!

ईथे वरील सर्वान्चे विचार सकारान्मक आहेत. तुमचा attitude मात्र फारच निगेटिव्ह आहे.

चला! तात्याला नांवं ठेवणार्‍यांच्यात अजून एक भर पडली! लगे रहो.. :)

बाय द वे, तुमच्या एक लक्षात येतंय का? की इथे आल्या आल्या या तुमच्या पहिल्याच लेखनाला किती प्रतिसाद पडले ते! सबब, कि इथे नवीन पेकी कोणी प्रतिक्रिया टाकली की जुने लोक ती सरळ उडवून लावतात किन्वा सरळ ignore करतात हे तुमचे म्हणणे निराधार आहे असे म्हणावे लागेल. मल नाही वाटत की पहिलंच लेखन असून इथे तुम्हाला कुणी इग्नोर वगैरे केलं आहे!

करेक्ट? :)

तेव्हा आता मिपाला अधिक नावं न ठेवता इथे रहायचं तर मुकाट्याने रहा, लिहायचं तर लिहा, (मिपाकर काय तो बरावाईट प्रतिसाद देतीलंच!) नायतर जायचं तर जा! पण मेंबरशिप घेऊन अवघे १० तास देखील झालेले नसताना कुणाचा attitude सकारात्मक आहे आणि कुणाचा नकारात्मक आहे, अशी विचारलं नसताना फुक्कटची जजमेन्ट नका पास करू. तुम्हाला इथे जज म्हणून कुणीही नेमलेलं नाहीये!

आपला,
(हलकट, नालायक, नादान आणि नकारात्मक!) तात्या. :)

भडकमकर मास्तर's picture

7 May 2008 - 8:54 am | भडकमकर मास्तर

नवीन पेकी कोणी प्रतिक्रिया टाकली की जुने लोक ती सरळ उडवून लावतात किन्वा सरळ ignore करतात . आणी जुन्याना मात्र support kartat.

तुम्हीही काही काळानं जुन्या सदस्य व्हालच की मग इतरांनी केलेला सपोर्ट तुम्हाला योग्य आणि लायक वाटायला लागेल....बाकी काही नाही...

यशोधरा's picture

7 May 2008 - 9:51 am | यशोधरा

कालिंदी, मला वाटत, तुमचा काही तरी गैरसमज आहे नक्की. इथे आवडलेल्या लिखाणाला जरुर दाद मिळते. मी स्वतः ३-४ दिवसांपूर्वीच इथे सदस्यत्व घेतले अन एक लेखही लगेच प्रकाशित केला. त्याला पहिल्या काही मिनिटांत दाद आल्याचे पाहून मात्र आनंदाने उडायची वेळ आली होती!! :)

तेह्वा, प्लीज मनातले गैरसमज काढून टाका अन वावरा इथे. शुभेच्छा!! :)

रामदास's picture

7 May 2008 - 10:33 am | रामदास

आपल्याला पूर्वग्रहाची बाधा झालेली दिसते आहे.
मी सदस्य होण्यापूर्वि तीन महिने या ठिकाणी वावरत होतो.
एवढा सुंदर जीवंत (लाइव) ओपन फोरम मी पाहीला नाही.
इथे आखाडा पण आहे .पण कुस्तीची सक्ती नाही.
सुंदर किचन आहे पण रांधण्याची सक्ती नाही.
सुरेख बाल्कनी आहे पण क्राय रुम नाही.
सशक्त लिखाणाला प्रतिसाद भरभरून मिळतो.
क्षीण लिखाणाकडे कुणी पहाणार पण नाही.
मला पहा .फुल वाहा.असं कधीच पाहिलं नाही.
थोडक्यात काय तर ,कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो.(आहेतच)
स्वागत आहे.