अंधाराच्या निसरड्या कातळावरून निसटून
अवकाशाच्या खोल दरीत असहाय कोसळताना
निर्वाणीची मदत मागणारे त्याचे दोन हात
तुला दिसले नसणारच…
त्याच काळ्या कभिन्न पोकळीत होरपळत
अदृश्य झालेल्या त्याचं पुढे काय झालं असेल
ही काळजी अस्फुटशी सुद्धा तुला शिवली नसेल
याचीही खात्री आहेच
पाहिलं मी तुला त्या रात्री
स्वप्नांची झापड ओढलेल्या अनिमिष नेत्रांनी
निखळणा-या ता-याकडे
स्वतःसाठी अजून एक मागण मागताना
प्रतिक्रिया
26 Feb 2011 - 1:04 pm | गवि
क्या बात .. क्या बात्..क्या बात..
मिपावर मनापासून हार्दिक स्वागत.
अत्यंत उत्कृष्ट रचनांची मेजवानी मिपाकरांसाठी चालून आलेली आहे.
सोनल, तुझ्या ब्लॉगचा फॅन आहेच. इथे पाहून आणखीनच आनंद झाला.
26 Feb 2011 - 1:32 pm | निनाव
सुंदरच लिहिले आहे. अभिनन्दन.
27 Feb 2011 - 7:51 am | नगरीनिरंजन
वा! मस्त!
"स्वप्नांची झापडं ओढलेले अनिमिष नेत्र" !! आवडलं फार!
27 Feb 2011 - 6:02 am | चित्रा
मिपावर स्वागत.
मुक्तक आवडले.
27 Feb 2011 - 7:37 am | शुचि
मस्तच!!!
31 Mar 2011 - 3:30 am | धनंजय
वेगळीच कल्पना.
कोंबडीचा जीव जातो, आणि खाणारा म्हणतो वातड.
31 Mar 2011 - 10:16 am | ज्ञानराम
अप्रतिम........
18 Feb 2013 - 5:53 pm | शुचि
ही सुंदर कविता वर आणते आहे.
18 Feb 2013 - 8:13 pm | वेल्लाभट
एक्सलंट ! अप्रतिम काव्य ! वाह!
18 Feb 2013 - 9:31 pm | क्रान्ति
विलक्षण!