यशाच्या वाटेकडे
डोळे लावुन बसू नकोस
आजच्या कुवतीचा
अभिमानी होऊ नकोस.
स्वप्रतापे स्वबळे तू
अवघेचि जिंकुन घे
जिंकण्यासाठी जिंकण्याची
अभिलाषाही जिंकुन घे.
प्रकांड हो प्रबुद्ध हो
चंड हो प्रचंड हो
प्रकर्षाने प्रारब्धावर
तुच तू प्रसन्न हो.
प्रकाशाचा पुंज हो
तेजाची मुर्त हो
भोवतीच्या तमसावर
ज्योतिर्मयी शर हो.
स्वतंत्र हो समृद्ध हो
समर्थ हो सनाथ हो
अंगीकृत कार्याला
सर्वस्वी समर्पित हो.
(सदासर्वदा) तो मी नव्हेच
प्रतिक्रिया
5 May 2008 - 6:41 pm | कुंदन
सुंदर कविता .....
5 May 2008 - 7:15 pm | सरपंच
वर दोन शब्द टंकतांना आलेली अडचण दूर करण्या आलेली आहे. कृ हा शब्द टंकण्यासाठी kRu असे लिहावे. या बद्दल आणि अश्या कुठल्याही शब्दाबद्दल येथे माहिती मिळेल.
5 May 2008 - 7:17 pm | शितल
स्फुर्तीदायक काव्य मनाला भावले.
5 May 2008 - 7:44 pm | चेतन
मस्त लिहलयसं
(समर्पित ) चेतन
7 May 2008 - 12:12 pm | काळा_पहाड
आपणा सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद.
सरपंच कृपया नोंद घ्यावी :
मी गेले दोन तीन दिवस रोज सायंकाळी ७, ८, ९,१० व ११ वाजता मिपवर हजर व्हायचा प्रयत्न केला. मात्र ह्जर सभासदांत माझे नाव कित्येकदा एकावेळी दोनदा दिसत असुनही माझे खाते मात्र मी उघडू शकलो नाही व त्यामुळे प्रतिक्रिया नोंदविणे अथवा नवे लेखनही करू शकलो नाही. कृपया मदत व मार्गदर्शन करावे ही विनंती.
तो मी नव्हेच
13 May 2008 - 10:45 am | विसोबा खेचर
जिंकण्यासाठी जिंकण्याची
अभिलाषाही जिंकुन घे.
प्रकाशाचा पुंज हो
तेजाची मुर्त हो
भोवतीच्या तमसावर
ज्योतिर्मयी शर हो.
जबरदस्त कविता! कुसुमाग्रजांची आठवण झाली!
काळ्या पहाडा, फार सुरेख लिहितोस तू! अजूनही असेच उत्तमोत्तम लेख्न यावे...
तात्या.
13 May 2008 - 4:06 pm | चतुरंग
असेच सुरेख लिखाण अजून येऊदेत.
चतुरंग
13 May 2008 - 6:47 pm | प्राजु
आलेली मरगळ झटकन निघून जाऊन अंगी स्फुरण चढावे अशी कविता...
अभिनंदन..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/