<परततीचाच प्रवास>

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
17 Feb 2011 - 12:13 pm

प्रवास छान व्हावा
छान असते स्वप्न
फर्स्ट क्लास चा पास असतो
[सेकन्ड चे तिकीत काढण्यापेक्षा तो परवडतो ]
मस्त पट्टे ओढलेला डबा
वाट पहात मी प्लॅटफॉर्म वर उभा
मनात दाटून येत असतो विरक्तीचा उमाळा

रात्री छान झोप घेतलेली असते
मनात कामाची जाग
दिसत असतात ट्रॅकवर छत्र्यांचे ताटवे
ट्रॅकच्या सोबत भिम्तीवरच्या झैराती
बंगाली बाबा
नौकरी पावो मस्त
महिने मे दस हजार कमाओ
दोसती करो फिरंगनसे
पेट गैस और सैक्स की दवाए
इंद्री का छोटापन ... वगैरे वगैरे
त्या महानगरातले जगणे
किडामुंगी होऊन ...!!

कोठ्ल्याशा ठेसनात भजनकरी येतात घेऊन भजनाचा भोंगा
नि गळत असते रोजच भक्तीची पाईपलाईन
एखाद येतो टाळ्या वाजवत
त्याच्या चेहऱ्यावरची पावडर
आणि काजळ डोळ्यातून ओघळत असतो
खांद्याला माझ्या हात लावून टाळी वाजवतो
मी ओशालतो शहारतो. पाहुन न पाहिल्यासारखे करतो
नाईलाज म्हणून दोन रुपयाची चिल्लर त्याच्या हातावर टिकवतो
तो भसाड्या आवाजात काहितरी आशिर्वाद देतो
समोरच्या बाकड्यावर बसलेल्याच्या डोळ्यात
सकाळी सकाळी " असल्या येडच्यापामुळेच ह्याना उत्तेजन मिळते असे भाव ...!!
*******

मग असाच दुपारी अचानक गेलो
तोच डबा तसेच वातावरण
ट्रॅक वरच्या छत्र्यांची ओळ दुपारीसुद्धा
नाल्याची बौम्ड्री मानून खेळणारी अर्ध उघडी मुले
झोपड्यांचे अस्ताव्यस्त तुकडे
त्याच झैराती
रिक्षावाले कुठे गायब होते कोण कुणास ठाऊक .?
कबूल करतो त्याला पन्नास रुपयाची नोट
जानेका नै म्हणत तो माझ्याकडे दुर्लक्ष्य करतो
पण देणारा मी होतो तरीसुद्धा
माझा परतीचा प्रवास
संपून गेला होता ...!!

मी थकलेला..!
ए सी हापिसात बसून सुद्धा घामाने भिजलेला ...!!
मरगळलेला...!!!
हरवलेला मीच नि मी असा
मी न शोधता सकाळच्या झैराती समोर येतात सारख्या
सकाळी खांद्याला हात लावून पैसे मागणारा तो
ऐटीत सिगारेट ओढताना ताना मला समोर दिसतो
मी पुन्हा ओशाळवाणा होतो.
टांगून लोकलच्या दांडीला
वटवाघळासारखा
मी तसाच लोंबत आठवणींना ...!!
उद्या परत तीचाच प्रवास करायचा
हे सत्य उशाशी घेवून घरी परततो

( माझी प्रेरणा http://misalpav.com/node/16808 )

करुणसंस्कृती

प्रतिक्रिया

स्वैर परी's picture

17 Feb 2011 - 12:47 pm | स्वैर परी

भले भले इथे हरवुन नी थकुन गेलेत! पैशाच्या मागे धावता धावता स्वपण हरवुन बसलेत!
लोकलच्या वार्या नित्यनेमाच्या झाल्यात! आणि गळणारा घाम टिपणारे रुमाल आता ओले चिम्ब झालेत!

ड्ब्याच्या टोकाशी एका पायावर उभं राहून लटकत केलेले असंख्य क्षण झर्रकन डोळ्यांसमोरून गेले!

कुंदन's picture

17 Feb 2011 - 11:57 pm | कुंदन

व्वा इजु भौ !!!
जियो....

प्रकाश१११'s picture

18 Feb 2011 - 4:40 pm | प्रकाश१११

विजुभाऊ -छान लिहिलेत

कोठ्ल्याशा ठेसनात भजनकरी येतात घेऊन भजनाचा भोंगा
नि गळत असते रोजच भक्तीची पाईपलाईन
एखाद येतो टाळ्या वाजवत
त्याच्या चेहऱ्यावरची पावडर
आवडले .मनापासून !!