शिरढोणचा ढाण्या वाघ

अवलिया's picture
अवलिया in जनातलं, मनातलं
17 Feb 2011 - 8:38 am

ब्रिटिशांविरुद्ध ज्या अनेक कर्तबगार स्त्रीपुरुषांनी रान पेटवले, प्रसंगी स्वतःच्या प्राणांची आहुती देण्यास मागेपुढे पाहिले नाही अशा अनेक नरवीरांपैकी एक अग्रणी नाव म्हणजे आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके.

वासुदेव बळवंत फडक्यांचे कार्य माहित नाही असा सच्चा देशभक्त विरळाच होय !

आज १७ फेब्रुवारी. वासुदेव बळवंत फडक्यांची पुण्यतिथी !

एका महान क्रांतीकारकाला भावपुर्ण आदरांजली !!

अधिक माहिती इथे वाचता येईल - http://www.saamana.com/2011/February/13/Link/Utsav7.htm

निवेदन - आपणांस वासुदेव बळवंत फडक्यांबद्दल काही ऐतिहासिक माहिती द्यायची असल्यास या धाग्यावर द्यावी, त्यांच्या कार्याचे एकविसाव्या शतकातील नजरेने मुल्यमापन करायचे असल्यास वेगळा धागा चालू करावा. धन्यवाद.

इतिहासप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

सुहास..'s picture

17 Feb 2011 - 9:15 am | सुहास..

एका महान क्रांतीकारकाला भावपुर्ण आदरांजली !! >>

अगदी असेच म्हणतो ..

सुत्रधार's picture

17 Feb 2011 - 9:21 am | सुत्रधार

असेच म्हणतो

नितिन थत्ते's picture

17 Feb 2011 - 9:47 am | नितिन थत्ते

एका महान क्रांतीकारकाला भावपुर्ण आदरांजली !!

झपाटून जाऊन क्लेशांची जराही पर्वा न करता जगात संचार करुन देशासाठी झगडलेल्या थोरांमधे सर्वात थरारक आणि खडतर लढा फडके यांचा होता.सलाम.

sneharani's picture

17 Feb 2011 - 9:58 am | sneharani

एका महान क्रांतीकारकाला भावपुर्ण आदरांजली !!

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Feb 2011 - 9:58 am | llपुण्याचे पेशवेll

धन्यवाद नान्या. वासुदेव बळवंत फडके यांनी त्यावेळेला अक्कलकोटस्वामी, गोंदवलेकर महाराज अशा अनेक संतांच्या भेटी घेतल्या होत्या असे वाचल्याचे आठवते. वासुदेव बळवंत फडके थोर दत्तभक्तही होते.
अशा परमभक्त, परमप्रतापी देशभक्ताचे कायम ऋणी राहू.

प्रीत-मोहर's picture

17 Feb 2011 - 10:02 am | प्रीत-मोहर

असेच म्हणते!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Feb 2011 - 10:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

एका महान क्रांतीकारकाला आदरांजली!!

त्यांच्या कार्याचे एकविसाव्या शतकातील नजरेने मुल्यमापन करायचे असल्यास वेगळा धागा चालू करावा.

करियर, नोकरी, प्रमोशन, पैशांची चिंता करत तब्येत, व्यक्तीगत आणि कौटुंबिक आयुष्य, या सगळ्यांची हेळसांड करणारे ऐटीतले कामगार पाहिले की मला बर्‍याचदा वासुदेव बळवंत फडक्यांची आठवण येते.

प्रचेतस's picture

17 Feb 2011 - 10:37 am | प्रचेतस

नतमस्तक.

त्या आद्यक्रांतीवीराला आमचा ही मुजरा.

हिंदुस्थानच्या या सुपुत्राला विनम्र अभिवादन.!

एका महान क्रांतीकारकाला भावपुर्ण आदरांजली !!

लढा देत असताना...... सासवडच्या अलीकडे, मल्हारगडावर वासुदेवांनी बरेच दिवस वास्तव्य केल्याचे ऐकिल आहे.......

एका आद्य क्रांतीवीराला मानाचा मुजरा..

- पिंगू

कच्ची कैरी's picture

17 Feb 2011 - 10:53 pm | कच्ची कैरी

आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद !
वसुदेव बलवंत फडके यांना मानाचा मुजरा

एका आद्य क्रांतीवीराला मानाचा मुजरा..

पैसा's picture

19 Feb 2011 - 10:28 am | पैसा

तुम्ही अशा थोर लोकांची आठवण करून देताय त्याबद्दल. जरी क्रमशः लिहिलं नसलं तरी ही लेखमालिका अशीच चालू राहू दे!

अप्पा जोगळेकर's picture

19 Feb 2011 - 11:52 am | अप्पा जोगळेकर

भावपूर्ण आदरांजली. या निमित्ताने त्यांची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Feb 2011 - 11:54 am | बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद!

इन्द्र्राज पवार's picture

19 Feb 2011 - 12:34 pm | इन्द्र्राज पवार

ब्रिटिश राजसत्तेविरूध्द "रान पेटविले" ही संज्ञा खर्‍या अर्थाने ज्यानी केली ते आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. इथे धाग्यावर उल्लेखिलेला 'सामना' तील लेख वाचला. फक्त एक छोटेसे कुतूहल आहे : एडन येथे त्यांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख आहे, याचाच अर्थ त्यांच्या देहावर अंत्यसंस्कारही तिथेच झाले असणार. पण त्याचे अवशेष त्या काळातील त्यांच्या नातेवाईकांनी वा सहकार्‍यांनी इकडे आणण्याचे काही प्रयत्न केले होते का? असो...सहज एक अधिकची माहिती या दृष्टिकोणातून पृच्छा.

१९८४ मध्ये 'भारतीय क्रांतिवीर' या मालेत भारतीय पोस्ट खात्याने 'वासुदेव बळवंत फडके' यांचे तिकिट प्रकाशित केले होते...ते या निमित्ताने [विकीवरून साभार] इथे देत आहे (फर्स्ट डे कव्हरसहीत) :

Photobucket

शिरढोणच्या वाघास नम्र अभिवादन...!

इन्द्रा