ही प्रेरणा.
पारावरचं आत्मचरित्र
वाचताना टोचलेले खडे
काही उगाच गमजा मारताना टाकलेले
तर काही असेच
निष्कारण अजाणतेपणी सुटलेले
चुकार फ्रेंड्स मधूनच
लाईक करत हवेत चढवत
आणि
चेहेर्याची पुस्तकं टाकताना,
लिहीताना वेळेचे भान नसे
चुचकारताना डबके झालेल्या,
जाहीर लिहीताना
हवेत मारलेल्या उड्या अन्
अंगावर उडवलेला
चिखल भिंतभर पसरवत बसे.
आता काम साधल्यावर
दारं बंद करून घेताना
उगाचच जीव कसानुसा होतो
काहीतरी टोचतं
आणि
अडगळीत पडल्याचा भास
जाता जात नाही.
माझ्यासकट सर्व attention hogs ना समर्पित.
प्रतिक्रिया
15 Feb 2011 - 10:27 pm | प्राजु
हाहाहाहा!!!
अडगळ आवडली दुर्बिटणे बाई. :)
15 Feb 2011 - 10:37 pm | श्रावण मोडक
पारावरची आत्मचरित्रं,
चेहऱ्याची पुस्तकं...
भिंतभर पसरलेला चिखल...
अडगळीत पडल्याचा भास...
एकूण आधुनिकोत्तर कविता!
अभिजात, प्रगल्भ वगैरे. ;)
16 Feb 2011 - 7:38 am | सुहास..
खरच, काय दिवस आलेत.
15 Feb 2011 - 10:38 pm | पैसा
फेसबुकवर ये ग जरा! अणखी कुठे खडे मारायला मिळतात बघूया. 'अडगळ' 'लाइक'ली, हे वेगळं सांगायला नकोच!
17 Feb 2011 - 10:10 am | प्रीत-मोहर
आवल्ड ग !!!
15 Feb 2011 - 10:52 pm | बेसनलाडू
आत्मचरित्र आवडले.
(चरित्रकार)बेसनलाडू
15 Feb 2011 - 10:54 pm | क्लिंटन
चुकून शीर्षक "परावरचं आत्मचरित्र" वाचलं :)
17 Feb 2011 - 10:22 am | चिंतामणी
Sane here.
15 Feb 2011 - 11:31 pm | संजय अभ्यंकर
अदिति असे लिहू शकेल यावर विश्वास बसत नाही.
( ह.घे.)
15 Feb 2011 - 11:32 pm | गणपा
बरेच दिवसानी बोर्डाचा रस्ता दिसला एकदाचा.
अ रे रे... नानाचं अजुन एक सावज निसटलं ;)
आवांतरः परावरचं पारावरचं आत्मचरित्र आवडले :)
15 Feb 2011 - 11:33 pm | गणपा
बरेच दिवसानी बोर्डाचा रस्ता दिसला एकदाचा.
अ रे रे... नानाचं अजुन एक सावज निसटलं ;)
आवांतरः परावरचं पारावरचं आत्मचरित्र आवडले :)
16 Feb 2011 - 12:00 am | राजेश घासकडवी
विडंबन छान झालंय. अगदी समृद्ध अडगळ आहे. चेहरेपुस्तकाच्या भिंतींवर रेखीव निष्काळजीपणे पसरवलेला चिखल. अतिभौतिकीय असंबद्धता व अतितर्ककठोर भौतिकवादाचं मिश्रण म्हणजे अगदी टकीलात योग्य प्रमाणात ट्रिपलसेकचं मिश्रण व्हावं तसं झालंय. यमकहीन मुक्तछंदात भावनाविरहतेचा बर्फ घालून घुसळल्यावर तयार होते ती पारावरचं आत्मचरित्र नामक मार्गारिटा.
16 Feb 2011 - 1:36 am | नंदन
सहमत आहे. अ-पार आणि बिलो-पार ह्या दोन पातळ्यांच्या मध्ये कुठेतरी अडकून पडलेल्या बहुसंख्यांची घालमेल अचूक टिपणारी मार्गारिटा...हे आपलं मुक्तछंद. ते वाचून कुठलाही मुंजा पारावर* राहील असे वाटत नाही.
(*- श्लेष अभिप्रेत)
16 Feb 2011 - 10:58 am | विजुभाऊ
शब्दांना निरर्थकतेच्या माळेत गुंफवून सार्थकतेचे तारे दिवसा दाखवण्यात दुर्बिटणे बैंचा हातखन्डा आहे.
वरील कबंध ( या शब्दाला एक ठराविक अर्थ आहे. मुद्दामच हा शब्द वापरीत आहे) हा त्यापैकीच एक
16 Feb 2011 - 12:15 am | शुचि
हाहा!!! मस्त ग आदिती. कविता वाचून बालपणात गेल्यासारखं वाटलं. शेवटचं कडवं खलास!.... एकदम कारूण्याची किनार असलेलं आहे.
16 Feb 2011 - 12:21 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> एकदम कारूण्याची किनार असलेलं आहे. <<
हे पण सगळं अटेंशन सीकिंग गं, आपण जास्त लक्ष नाही द्यायचं! ;-)
16 Feb 2011 - 8:14 am | अवलिया
साधु ! साधु !!
16 Feb 2011 - 10:16 am | मनीषा
लक्ष * वेधी कविता ...
* इथे 'लक्ष' चा कुठलाही अर्थ चालेल.
16 Feb 2011 - 11:49 am | रमताराम
लिखाणावरून अदितीबैंनी शरदिनीकाकूंचा गंडा बांधल्याचे (किंवा स्त्रियांच्या बाबतीत जी काय प्रोसिजर असेल ती, बहुधा खडीसाखर तोंडी घालत असावेत... आता तरी गोड बोला असे अध्याहृत असावे का?) दिसते आहे. अर्थात तालीम अजून चालू असल्याने पुरेशी असंबद्धता दिसत नाही. काही वाक्यांचा अर्थ लागतोय अजून. ग्रेसच्या काही कविता त्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट कराव्यात असे शरदिनीकाकूंना सुचवतो आहे.
16 Feb 2011 - 12:40 pm | श्रावण मोडक
ररा, लय भारी. शरदिनी दुर्बिटणेला शिकवतीये असे चित्र उभे ठाकले आणि ड्वाले पाणावलेच... ;)
16 Feb 2011 - 12:48 pm | स्वाती दिनेश
ररा, लय भारी. शरदिनी दुर्बिटणेला शिकवतीये असे चित्र उभे ठाकले आणि ड्वाले पाणावलेच...
हेच लिहायला आले होते..:)
अदिती, मस्तच !
स्वाती
16 Feb 2011 - 12:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ही प्रशंसा समजायची का नाही?
पण असा प्रश्न पडला म्हणजे कवितेतल्या संवेदना आधुनिकोत्तर असाव्यात!
16 Feb 2011 - 1:20 pm | स्वाती दिनेश
ह्म्म.. तुला प्रश्न पडला ? शरदिनीबैंसारखी गुरु तुला कवितेबद्दल मार्गदर्शन करते आहे याहून अजून भाग्य ते काय?
स्वाती
16 Feb 2011 - 1:34 pm | रमताराम
ही प्रशंसा समजायची का नाही?
(अरे वा, असे संभ्रम निर्माण करणं जमायला लागलं की आम्हाला. ) कुसुमाग्रजांना एकदा विचारलं होतं की देव आहे की नाही. त्यावर ते म्हणाले होते 'ज्याला देवाची गरज आहे त्याच्यासाठी तो आहे, ज्याला गरज नाही त्याच्यासाठी तो नाही. :D
16 Feb 2011 - 1:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
:-)
मस्त आहे हे वाक्य! पण कळतात हो असली बोलणी!! ;-)
स्वातीताई: आपण भेटूच या ...
एकूण ल.वे.चे प्र.* यशस्वी ठरत आहेत तर ...!
* लक्ष वेधण्याचे प्रयोग.
16 Feb 2011 - 5:27 pm | असुर
:-)
--असुर