विहीर - माझ्या मनातील... (भाग दोन - शेवट्चा)

झंम्प्या's picture
झंम्प्या in जनातलं, मनातलं
14 Feb 2011 - 9:51 am

----क्रमश....

मी हळूच पारावरून उठलो आणि खोल विहिरीत पाहू लागलो. त्यात असंख्य पिंपळाची पाण, घाण होती, कुठे हळूच काहीतरी हलत होत, आणि बारीकश्या लाटा उसळत होत्या, बऱ्याच पाननिवल्या इकडून तिकड भटकत होत्या, कोळ्यांची खूप जाळी, सगळीकडे पसरली होती, हे सगळ पाहत असताना, एक विचित्र भावना माझा थरकाप उडून गेली, कोणास ठाऊक का पण मला वाटत होत की त्या काळ्या पाण्यातून दोन डोळे माझ्याकडे रोखुण पाहतायत,

----क्रमश....

झटशीर मी मागे हटलो, अंगावर शहारा आला, डोक्याला मुंग्या आल्या, तसाच मागे सरून पुन्हा पारावर येऊन बसलो, थोडा शांत झालो. बुन्द्याला हळूच पाठ टेकवावी म्हणून बुड खर्डतच मागे सरलो, छान गार वारा सुटला होता, अंधार पडायला सुरवात झलेली, पण कालवंडल नवत, हळू हळू ग्लानी यायला लागली, अंग पार शीनल होत, पाय अक्षरश ठणकत होते. बसल्या बसल्या हळूच डोळा लागला, थोडा वेळ जातो न जातो, तोच कोणीतरी कानात फुंकर मारलीय अस वाटल, म्हणून दच्कुनच उठलो, पाहतो तर काय शेजारी सुमी उभी, छान गोड हसतेय, ती म्हणाली,
“अरे विश्वास कधी रे आलास, आणि इथे कसा येऊन बसलायस,”
मी काही न बोलता फक्त हसलो आणि तिच्याकडे पाहू लागलो. अजूनही ती तशीच छान बारीक अंगकाठीची, गोऱ्या कांतीची, सरळ नाकाची, मोत्यासार्क्या एका रेषेत असणाऱ्या दातांच प्रदर्शन करत हसणारी, नेहमीसारखी काठपदराची हिरवी साडी घालून तिचा पदर अगदी, साडी पायाच्या नडग्या दिसेतोवर वर घेऊन कमरेजवळ खोसलेली, नेहमीसारखी एकच वेनि घालून ती पुढच्या बाजूने खांद्यावर सोडलेली, बारीक चणीची सुमी, ह्या सुमिला जन्मजात सौंदर्य मिळालेल, तिची आई तिच्या जन्मानंतर काही दिवसांनीच वारलेली, म्हणून हिला पांढर्या पायाची म्हणूनच घरच्यांनी कायम हिणवल, पुढ सावत्र आई आली, तिने हिचा खूप छळ केला. हि आमच्या नाथामाच्या भावाची नात, नाथामाचा हिला खूप लळा, म्हणून कायम ती नाथामाच्या जवळच राहिली, म्हणून तिची आणि माझी खूप गट्टी सुद्धा जमली.

तिच्याकडे पाहताना मी तिच्या डोळ्याकडे पहिल, तिचे ते थंड डोळे, अगदी तळमनाला भेदून गेले, माझी सर्व गात्र शिथिल पडली, अंगातून अवसानच गेल, पण त्या वेळी खूप शांत आणि थंड वाटत होत, पाण्यात भिजल्यावर जस कापडाचा वजन वाढत तस शरीराला जाणवत होता, कोणास ठाऊक अशी विचित्र, भीतीदायक परिस्थिती का होत होती, पण त्याच वेळी, मला ती अनाहूतपणे स्वतःबरोबर खेचून नेत होती, एका अनामिक विश्वात.

सुमी पुन्हा एकदा गालातल्या गालात हसली, आणि म्हणाली, “वेडू असा काय पाहतोयस, मला कधी पहिल नाही का ह्या अगोदर,”
“वेडू”... कितीतरी दिवसांनी, वर्षांनी हा शब्द ऐकला मी तिच्या तोंडून, ती मला प्रेमाने वेडू म्हणायची. आमच सगळ बालपण एकत्र गेल, गावात मला असा जीवाभावाचा जवळचा मित्र कोणीच नवता, शालेतून आल्यावर मी आणि सुमी दोघच ह्या बागेत खेळत असू, बागडत असू. हळू हळू आम्ही मोठे होत गेलो आणि ह्या मैत्रीच रुपांतर कधी मनाच्या जवलीक्तेत झाला कळलच, नाही,

सुमी शेजारी येऊन बसली, “अरे बोल ना काहीतरी, का नुसताच असा बघत बसणार आहेस” पुन्हा एकदा ती नजर काळीज चिरून गेली, माझ्या तोंडून शब्दच फुटत नवता, अवघडल्यासार्ख झाल म्हणून काहीतरी बोलायचा म्हणून बोललो,
”काय बोलाव तेच कळत नाहीये”,
ती पुन्हा थोडीशी हसली, थोडा वेळ अशाच शांततेत गेला. मला अजूनही कळत नवत काय होतय ते, पूर्ण अंग गार पडत चालेल,
ती एका एकी बोलली, “मनु तुझ्या मांडीवर डोकं ठेऊ?”
मला काहीच सुचेना, “मनू.......” एकांताच्या क्षणी, ती मला ह्या नावाने हाक मारायची, मी सुद्धा तिला ह्याच नावाने हाक मारायचो,

मी माझे पाय गोळा करून मांडी घातली, त्यावर तिने आपले डोके ठेवेल, गुढगे पोटाजवळ घेऊन हात माझ्या गुढग्याना लाऊन तिने डोळे झाकले, अजूनही मला समजत नवता आज सुमी अशी का वागतेय, आणि आचार्य म्हणजे मी सुद्धा तिला नकार देऊ शकत नवतो, मंदिराच्या गाभार्यात घन्तानादानंतर जो ध्वनीचा नाद मागे राहतो, तो फक्त कानात ऐकू येत नसतो, तो धीरगम्बीर आवाज अगदी, आत्म्यापर्यंत जाऊन पोहोचतो, तसच तिच्या नजरेने आज मला शांत केलेल, जाणवत होत, की थंड पडतंय शरीर पण माझा माझ्यावरच ताबा नवता.

हळुवार माझे हात तिच्या केसांवरून फिरू लागले. सुरवातीपासूनच तिचे केस खूप मुलायम आणि दाट, मोहक होते, ह्या केसात मी देव्चाफ्याच फूल माळायचो, तेव्हा त्या चाफ्याच्या सुगंधा एवढीच सुमी मोहक, वाटायची, ती जवळ असताना कधीच वासनेचा मनाला स्पर्शही जाणवला नाही, पण शरीर पुलकित करून टाकण्याची किमया तिच्यात होती.

मला मांडीवर ओलावा जानू लागला, मी पुढे झुकून पहिल तर सुमिच्या डोळ्यातून पाणी टपकत होत,

“सुमे, रडतेस का ग वेडाबाई” काय झाल बाला”

“उन्हू”...

“अग काय झाल सांगशील का नाही ? मग उगाच का रडशील तू ?” शालन मावशी काय बोलल्या काय?” शालन मावशी म्हणजे सुमिची सावत्र आई...

पुन्हा तेच उत्तर.... “उन्हू” आणि तिने पाय आणखी जवळ घेतले, आता हाताची गुढग्यावर असणारी पकड घट्ट झाल्याच जाणवल, मी तिला तशीच फिरून तिचा चेहरा माझ्या चेहऱ्याकडे वळवला, “काय झाल मन?”

सरकण तिच्या डोळ्यातून पाण्याचा ओघळ खाली पडला, “तू मला सोडून का रे गेला विसू? का ?” हे बोलताना तिची तीच थंड नजर माझ्या काळजावर ओरखडे ओढत गेली,

“सुमे तुला माहीत का नाही ग, मी का गेलो, तुझ्या अन्नाला आपल हे नातं मान्य नवत, त्याला आमच्यासारख्या “भिकारड्याच्या” घरी पोर द्यायची नवती, तुला माहीत आहे न की किती वाद झालेला ह्या वरून, भाऊवर तुझा आण्णा कुहाड घेऊन धावलेला,” तिथच सगळ संपल होता न ग ?” त्या नंतर तुझ लग्न झा....”
सनकण डोक्यात वीज चमकावी तशी कळ गेली, मी तिला उठून बसवत म्हणालो, “सुमे, तुझ तर लग्न झालं ना?” मी ऐकल होत की कोणी खूप पैसेवाला नवरा मिळालाय तुला”... पाय पोटाजवळ घेऊन दोन्ही हात त्याभोवती गुंधाळून मी तोंड फिरवत जरा गुस्श्यानेच बोललो,... सुमी काहीच बोलली नाही, तिने ह्या वेळी मान खाली घातलेली होती, न राहून मी पुन्हा विचारल, काय झाल सुमे, आणि अचानक मला तिच्या मानेवरचा तो काळां चट्टा दिसला, मी केस मागे घेऊन पाहिल तर तो भाजल्याचा वन होता, सुमीची नजर अजून खालीच होती, डोळ्यातून आसव अजून तपकतच होती,

“काय झाल सुमे बोलशील की नाही?”

“तू गेल्यावर सगळच बदलल आईने तिच्या भावकीतला एक पैशेवला माझ्यासाठी पाहून ठेवला, त्याची अगोदरची बायको वारली म्हणून त्याच दुसर लग्न माझ्याशी लावल, त्या साठी त्यांन पैसे दिले आईला, आण्णा दारूच्या नशेत असायचा कायम, शेवटी त्याच्या दावणीला चार पैशांच्या मोबदल्यात बांधल मला, खूप हाल केले रे विसू त्या लोक्कांनी माझे” अस म्हणून तिने दोनही हात माझ्या गळ्याभोवती गुंढाळून छातीवर डोकं ठेऊन ती रडू लागली”

मला थोड अवघडल्यासारख झाल, कोणी पहाताय का म्हणून इकडे तिकडे पहिल, आमच्या दोघांशिवाय कोणीच नव्हत, हळुवारपने तिच्या पाठीवर हात फिर्वावासा वाटला, मी फिरवला, थोड्या वेळाने तिला थोडा बाजूला करून ओंझलीत तिचा चेहर पकडून, तिच्याकडे पाहू लागलो, पुन्हा एकदा ती थंड करून जाणारी नजर दिसली, काळजावर ओरखडे ओढणारी,... मी थोडा गांगरलो,

“विसू, खूप छळ केला त्यांनी माझा, गुरा ढोरागात मारायचे रे मला, मी एकदा घर सोडून पळून आले तर आइने मला घरातून बाहेर काढाल, म्हंटली कुठ दुसरीकड जाऊन तोंड काळ कर पण इथ नको येउस,”
हळूच ती मांडीवर डोकं ठेऊन गुढगे पोटाजवळ घेऊन झोपली,
“नाथामानी त्या लोकांची समजूत काढून माझी पाठवण केली, पण पुन्हा तोच छळ सुरु झाला, खूप असह्य झाल्यावर मी आता कायमची निघून आले, पुन्हा कधी न जाण्यासाठी”,

थोडावेळ दोघेही शांत झालो, कोणास ठाऊक कोठून बळ आल अंगी, आणि तिला म्हणालो, “चल येतेस माझ्याबरोबर, सोड हे सगळ, कर माझ्याशी लग्न, सुखाने संसार करू, सुरवातीला माझ्ह्याकड काहीच नवत, हिम्मत होत नवती तुला घेऊन जायची, माझेच खायचे वांधे होते, तर तुला कुठे नेल असत, पण आता... आता नाही परत ती चूक करणार, चल माझ्याबरोबर जी काही अर्धी भाकर मिळेल ती दोघजन मिळून खाऊ, मजूर अद्यावर आता चांगला जम बसलाय माझा, सुरवातीला खूप कष्ट घेतले, आता ठेकेदाराचा विशवासाचा माणूस झालोय, भाड्याने खोली सुद्धा घेलीय, आजी तू आणि मी मिळून राहू, होईल ते जाईल, चाल..” तिचा हात घट्ट पकडला,

ती हळुवार हसली, आणि चेहऱ्यावरून हात फिरवत नजरेत नजर घालून पाहू लागली, आता ह्या वेळी तिच्या नजरेत खूप समाधान दिसत होता, चेहरा सुद्धा फुलला होता,
ती फक्त एवढच म्हणाली “खरच ?”.. मी “हो तर” म्हणालो,

ती एकाएकी उठली माझा हात धरून म्हणाली “चल तुला काही तरी दाखवायचं”, आम्ही दोघे थोड चालत जाऊन एका आंब्याच्या झाडाखाली थांब्लो, तिथे तिने मला एक जागा दाखून, म्हनाली, “खोद इथ, उकर माती,” मी प्रश्नार्थक तिच्याकडे पाहू लागलो, ती पुन्हा तेच म्हनाली, “खोद ना”, मी हाताने माती उकरायला लागलो, अर्धा हात खोदल्यावर मला एक डब्बा लागला, मी तिच्याकडे पाहून विचारल “हे काय सुमे”
“उघडून बघ”
मी तो खोलला, त्यात काही दागिने होते, मी थोडा दाच्कुनच बोललो, “हे काय सुमे, हे कोणाचे आहेत,?”

सुमी माझ्या हाताभोवती हात गुंफून खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली, “माझ्या आईचे हे दागिने आहेत, नाथामामाकडे आईने देऊन ठेवले होते, म्हणाली होती की पोरीच्या लग्नात द्या तिला”, नाथामामानी, माझ्या लग्नाच्या अगोदर काही दिवस मला हे दिलेले”, तुझ्या नावाने घालायचे होते ते दागिने, पण ते शक्य नवत, म्हणून तुझ्या दारी, इथे आणून परुले ते,”

मी त्या डब्याकडे पाहत होतो, त्यात चार पाटल्या, दोन जोडवी, आणि एक मंगळसूत्र होत,
“आईन हे सगळ माझ्यासाठी करून ठेवलेल, आण्णा पिण्यापायी हे सुद्धा विकायला निघालेला, त्या वेळी आईने ते डब्ब्यात लपून नाथामामाकड ठेवल होत”...

थोडा वेळ दोघाही शांत झालो,

ती हलकेच म्हणाली, “विसू, ए विसू घालशील ते मंगळसूत्र माझ्या गळ्यात?”

मी हलकेच हसून ते हातात घेतल आणि तिच्या गल्याभोवती धरून म्हंटल “घालू का आत्ता ?”
त्या वेळी तीचा चेहरा खूप उजळून निघाला, अगदी जन्माच सार्थक झाल्यागत, मी डब्बा खाली ठेऊन ते तिच्या गळ्यात घातल”... त्या वेळी तिचे डोळे पुन्हा एकदा चमकले,

ते आता थंड नवते, हे ओळखीचे डोळे वाटत होते, कुठेतरी पाहिल्यासारखे, क्षणात काही कळण्याच्या अगोदर, डोक्यात कळ आली आणि डोळयापुढे गड्द्द अंधार झाला, जेव्हा जाग आली तेव्हा मी दुकान खोलीत होतो, वरती, लाईटचा बल्ब जळत होता, खोली पिवळ्या प्रकाशाने भरून गेलेली,

“विसू... ए विसू...” अशी नाथामाचा आवाज येत होता,

पूर्ण अंग जड झालेल, दरदरून घाम फुटलेला, पायाला मुंग्या आलेल्या, दातखिळी बसल्यासारख तोंड घट्ट मिटलेल, डोकं खूप दुखत होत, मी थोडा सावद झालो,

“विसू... ए विसू... काय झाला बाला, मघाशी धारा काढून मी आलो तर मागच्या दाराला तू हिरी पशी खाली पडलेला दिसला, अर्धा तास झाला तुला न सूद न काय, काय कराव काळाना बघ, झाल तरी काय ? ”

मी इकडे तिकडे पाहून बोललो, “सुमी कुठाय ?”

“सुमी???”

“हो सुमी... आत्तातर इथे होती,”

नाथमा, थोडा बिचकूनच बोलला,
“आर येडा का खुळां तू, ती कशी येयील हित?”

“आता तर माझ्याशी ती गप्पा मारत होती, कशी येयील काय कशी येयील”

“आंर बाळां ती कशी येयील, तिला मरून त आता ४ महिन होतील की,” टचकन त्याच्या डोळ्यात पाणी आल,
“त्या हैवानांनी तिचा लय छळ केला, नरक यातना भोगत होती र माझी पोर, सोसण्याच्या पलिकड गेल तवा जीव दिला तीन, हितच, ह्या मागच्या हिरीत,”...

संकन अंगावरून काटा उभा राहिला, हातापायाला मुंग्या आल्या, भीतीने अंग थरथरु लागल, घाम फुटू लागला,

आत्ता जाणवल, विहिरीत सुरवातीला दिसणारे ते दोन डोळे.... ते दोन डोळे... सुमिचे होते...”

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

अरुण मनोहर's picture

14 Feb 2011 - 9:59 am | अरुण मनोहर

पहिल्या भागासारखेच वर्णन ह्या भागात चांगले जमले आहे.
शेवट अनपेक्षीत नव्हता, त्यामुळे शेवटी खूप उंची गाठली नाही.
नियमित लिहीत रहा. खूप शुभेच्छा.

पैसा's picture

14 Feb 2011 - 7:53 pm | पैसा

दोन्ही भागात वातावरण निर्मिती छान झालीय. थोडं शुद्धलेखनकडे लक्ष दिलंत तर वाचताना अडखळायला होणार नाही. पण तुम्ही नक्कीच चांगलं लिहू शकता! खूप शुभेच्छा!

घाशीराम कोतवाल १.२'s picture

16 Feb 2011 - 10:39 am | घाशीराम कोतवाल १.२

झकास आवडली कथा !!!

झंम्प्या's picture

16 Feb 2011 - 12:59 pm | झंम्प्या

आपल्या शुभेछांबद्द्ल मनपुर्वक धन्यवाद...