मी अधित.....
ओळखलत का?
सहा वर्षापुर्वी शाळेत तुमची भेट झाली होती.
'वंडर बॉय' चे बक्षिस तुमच्या हस्ते मिळाले होते.
आज मी इंजिनियरिंग च्या शेवटच्या वर्षाला आहे.
दोन वर्षापासुन मी एमबीए ची तयारी करतोय.
अहमदाबाद मधे अॅडमिशन नक्की मिळेल.
तुमचे ते 'कंपार्ट्मेंट' चे वाक्य आजही आठवते.
मुख्याध्यपकांनी नंबर दिला.
तुमचा एक सल्ला हवा आहे.
दोन वर्ष नोकरी करावी का सरळ एमबी ए ला अॅडमिशन घ्यावी.
वर्क एक्सपिरियन्स चा फायदा नक्कीच आहे.
पण...
आई बाबा दोघेही नोकरी म्हणताहेत.
ग्रॅज्युएशन पर्यंत सर्व काही दिले, आता स्वःत चे स्वतः बघ असे म्हणताहेत.
एमबीए ला लागणारे पैसे मी देणार नाही असे बाबा म्हणताहेत.
दहावीत पोस्ट ग्रॅड. शिवाय नोकरी करायची नाही असे दोघेही म्हणत होते.
तस दहावी पर्यंत सगळ सुरळित होत.
दहावी च्या सुट्टीत एका लग्नाला गेलो होतो.
तिथे बाबांच्या मित्राची गाठ पडली.
त्यांची लाइफ स्टाइल बघुन बाबांमधे आमुलाग्र बदल झाला.
कुठे तरी स्वतः ला कमी समजायला लागले.
मग काय?
शेअर मार्केट मधील डेली ट्रेडींग च्या मागे लागले.
त्यात आई पण थोडीशी वाहवली.
घरी आल्यावर बाबांशी मस्त गप्पा व्हायच्या.
आता चॅनेल चे स्टॉक स्पेक्युलेटर्स दोस्त झाले.
हात पाय धुउन शुभं करोती म्हटल्याशिवाय आई जेवण देत नसे.
अचानक जेवणामधे हँबरगर कधी आले ते कळलेच नाही.
मंदी मधे होत्याचे नव्हते झाले.
आईला नोकरी करणे भाग पडले.
जरा सावरतो न सावरतो तो पर्यंत परत एकदा मोठा फटका बसला.
घर विकायची पाळी आली.
बाबांना दारु चे व्यसन लागले.
घरात भांडणे होउ लागली.
एकदा रात्री आई पोटाशी घेउन ढसाढसा रडली.
थोड्या दिवसांनी लक्षात आले, बाबांनी आईला 'पणाला' लावले होते.
मला समजत होते पण मी न समजल्यासारखा राहत होतो.
आईला बर वाटायला.
आता आई पण संपुर्ण निर्विकार झालेली आहे.
तुझे तु बघ म्हणते.
मी जर नोकरी ला लागलो तर अजुनही हे संभाळुन घेइन असे कधी कधी वाटते.
किंवा त्यांना त्याच्या नशिबावर सोडुन मी माझे करियर करायला बाहेर पडावे असे पण वाटते.
काय करु सांगा?
क्लास ला हवेत असे म्हणुन मी बाबाकडुन घेतलेले पैसे मी योग्य प्रकाराने इन्वेस्ट केले. आज माझ्याकडे स्वतःचे ३ लाख रुपये आहेत.
तशी मला आर्थिक आधाराची गरज नाही.
पण मी बाहेर पडलो तर आमचे घर संपुर्ण उध्वस्त होइल.
काय करु?
दोघाचे परस्पर संबध टोकाला गेले आहेत.
एका घरात राहुन वेगवेगळे.
ऑन द वे ऑफ सेल्फ डिस्ट्रक्शन, अगदी सर्वार्थाने.
कळतय ना मी काय म्हणतोय ते?
सांगा काय करु.
मुलाचे कर्तव्य की भविष्य?
काय करु?
-----------------------------------------------------------------------------------------
"Make Two compartments. In one compartment 'what your parents have done for you'. In second what your parents are not able to do for whataever reason. Second compartment will be always heavy"
प्रतिक्रिया
11 Feb 2011 - 4:05 pm | टारझन
मास्तर चा एखादा लेख उडाला / मास्तर वर टिका झाली की .. मास्तर हमखास असा लेख टाकतात असा पुर्वाणुभव आहे.
त्यामुळे मास्तर मधे चांगलं पुणरागमण करण्याची ताकद दिसते.
बाकी ह्याहुन भयंकर परिस्थितीत लोक जगतात .. :) यशस्वी ही होतात :)
11 Feb 2011 - 4:20 pm | अवलिया
सहमत.
11 Feb 2011 - 6:46 pm | मनराव
>>>मास्तर वर टिका झाली की .. मास्तर हमखास असा लेख टाकतात असा पुर्वाणुभव आहे<<<<
खालच्या सगळ्या प्रतिक्रिया वाचल्यावर वरिल टारूचं वाक्याप्रमाणे पुन्हा एखादा ले़ख येण्याची दाट शक्यता आहे............
11 Feb 2011 - 4:16 pm | विनायक प्रभू
ती काय असते बॉ?
लेख उडाल्याचे स्मरत नाही.
11 Feb 2011 - 4:24 pm | चिरोटा
पहिल्या वाचनातच कळले आहे असे वाटतय.
हे कोडे सोडवायचे आहे की नुसते वाचायचे आहे? अहमदाबादची फी वर्षाला १० लाख आहे असे वाचले होते. जॉब जर चांगला(म्हणजे ए.सी + कमी काम) मिळाला तर एम्.बी.ए. नंतर करता येईल.
11 Feb 2011 - 5:18 pm | सविता
बळेच वाटतंय....
रुममेट चे पत्र झाले की हे पण पत्र!!!
आणि त्यापेक्षा पण
तस दहावी पर्यंत सगळ सुरळित होत.
दहावी च्या सुट्टीत एका लग्नाला गेलो होतो.
तिथे बाबांच्या मित्राची गाठ पडली.
त्यांची लाइफ स्टाइल बघुन बाबांमधे आमुलाग्र बदल झाला.
कुठे तरी स्वतः ला कमी समजायला लागले.
मग काय?
शेअर मार्केट मधील डेली ट्रेडींग च्या मागे लागले.
त्यात आई पण थोडीशी वाहवली.
घरी आल्यावर बाबांशी मस्त गप्पा व्हायच्या.
आता चॅनेल चे स्टॉक स्पेक्युलेटर्स दोस्त झाले.
हात पाय धुउन शुभं करोती म्हटल्याशिवाय आई जेवण देत नसे.
अचानक जेवणामधे हँबरगर कधी आले ते कळलेच नाही.
हे जरा अतिरंजित वाटतंय आणि त्यामुळे एकुणच किव वगैरे न वाटता..खोटरडा मुलगा वाटतोय!
11 Feb 2011 - 5:24 pm | स्पा
हे जरा अतिरंजित वाटतंय आणि त्यामुळे एकुणच किव वगैरे न वाटता..खोटरडा मुलगा वाटतोय!
11 Feb 2011 - 5:31 pm | गोगोल
>> थोड्या दिवसांनी लक्षात आले, बाबांनी आईला 'पणाला' लावले होते.
मास्तरांनी नेहमीप्रमाणे सेक्शुअल इन्निएन्डो द्यायचा प्रयत्न केला .. पण 'क' च्या सासु सुनांच्या मालिकेप्रमाणे तीच ती ष्टोरी रिपिट झाली कि बोर होते. त्यात आणि एकदम डायरेक्ट्च .. नेहमीप्रमाणे क्रिप्टिक नाही. त्यामुळे आपला फोर्टे सोड्ला.
मास्तर आज काल दिवटे मामांची चलती हाये.
11 Feb 2011 - 5:39 pm | ५० फक्त
+१ टु सविता, जरा अतिरंजित होतंय सगळं, अगदी मल्लिकानं डान्स शो ची जज व्हावं एवढं.
"एकदा रात्री आई पोटाशी घेउन ढसाढसा रडली.
थोड्या दिवसांनी लक्षात आले, बाबांनी आईला 'पणाला' लावले होते.
मला समजत होते पण मी न समजल्यासारखा राहत होतो.
आईला बर वाटायला.
आता आई पण संपुर्ण निर्विकार झालेली आहे." हे तर उगीच अलका कुबलला समोर ठेवुन लिहिल्यासारखं वाटतंय. दहावि म्हणजे १६-१७ वर्षाचा पोरगा आपल्या जन्मदात्या आई बरोबर, जिनं त्याला शुभंकरोती चे संस्कार दिले आहेत असं वागणं, फक्त दारु ढोसुन किंवा बुधवार पेठेत राहात असेल् तरच करु शकतो.
11 Feb 2011 - 7:23 pm | रेवती
मला तरी अतिरंजित वाटले नाही बुवा!
11 Feb 2011 - 10:09 pm | वेताळ
मला तरी हे अतिरंजित किंवा काल्पनिक वाटले नाही.आजकाल जमाना बदलला आहे . एकादा सुंदर बायको असणारा दोस्त जर पैशातुन कमी पडला तर त्याला पैसे पुरवुन त्याच्या बायकोवर हक्क सांगणारे महाभाग सगळी कडे बघायला मिळतात.वर घडणारी कथा अगदी शेजारच्या घरातील वाटते.
11 Feb 2011 - 9:31 pm | स्वाती२
आईवडिलांचे नावापुरते उरलेले लग्न टिकवणे हे मुलाचे कर्तव्य कसे? या मुलाने आपल्या आईवडिलांना समउपदेशकाकडे न्यावे. मात्र आपल्या आयुष्याचे पुढे काय करायचे हे शेवटी आई वडिलांना ठरवू द्यावे. उद्या नोकरीसाठी दुसर्या गावी जावे लागले तर हा मुलगा घर सोडायचे नाही म्हणून नोकरी सोडणार आहे का? तसेही हे 'घर' तुटलेले आहेच. अशा तुटक्या घरात तो स्वतःचे पुढले आयुष्य कसे काढणार आहे. आई वडिलांना आर्थीक मदतीची गरज असेल तर नोकरी शोधावी नसल्यास स्वतःच्या हिमतीवर पुढे शिकावे. पण आईवडिलांचे लग्न टिकवण्यासाठी म्हणून उगाच भलत्या तडजोडी करु नयेत.