स्वप्न बघायला हरकत काय ..!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
10 Feb 2011 - 7:10 am

प्रेम ..!!.
प्रेम अगदी मस्त असते
प्रेमाचे एक गाणे असते
बाईकवर बसले
की ते छान फुलून येते
कळीचे फुल होते
सुरवटाचे फुलपाखरू होते
प्रेम अगदी मस्त असते
कसे होते ..?
कधी होते ...?
ते कळते कोठे ..?
हे सगळे नकळत होते
म्हणून ते प्रेम असते

शांत रस्ता
छान ढग
आता प्रवास छान होईल
छान हवा गाणे गाईल
गळ्यात असतात
लडिवाळ हात
गालावर रेंगाळतात
अलगद श्वास ....!!
हे खूप छान असते
हे खूप छान वाटते

मस्त मस्त हवा
नि हवे तेवढे सुख
मन तृप्त.... !
अतृप्त ........!!
हवी हवी हावरट हाव
रोमारोमात पसरत जाय
रक्तामध्ये झिंगत जाय
लंपट लोचट
जिभल्या चाटीत
कुठतरी हरवून जाय
प्रेमामध्ये असेच असते
असेच होते ....!!
..

प्रेम जमले की ,
छान वाटते
आभाळाचे
गाणे होते
त्याच्या मुठीत चांदण्या असतात
उधळल्याकी
फुले होतात

अरे एकच सांगायचेच विसरून गेलो
रस्त्याचे पण एक गाणे असते
पाखरांचे संगीत असते
आभाळाचा निळा रंग
पाण्यामध्ये सांडत असतो
बाईकवर असले की सगळे
असेच असते
बघा...
तुमचे पण तेच होईल
आभाळाचे गाणे होईल ......!!

शृंगारकविता

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

10 Feb 2011 - 10:20 am | नरेशकुमार

व्वा, एकदम मस्त. निसर्गाच्या जवळ गेल्यावानी वाटले.

कविता एकदम झकास

प्रेम जमले की ,
छान वाटते
आभाळाचे
गाणे होते
त्याच्या मुठीत चांदण्या असतात
उधळल्याकी
फुले होतात

एकदम सहि

मदनबाण's picture

11 Feb 2011 - 7:20 am | मदनबाण

बाईकवर असले की सगळे
असेच असते

१००% सहमत... ;)
छान कविता... :)

स्पंदना's picture

11 Feb 2011 - 10:02 am | स्पंदना

सो?

बाईक नसणार्‍यांचे काय होते?

(त्याच्या बाईक वर मनसोक्त उंडरलेली)
अपर्णा

पियुशा's picture

14 Feb 2011 - 11:13 am | पियुशा

प्रेम कविता
खुप आवडतात आम्हाला;)

अविनाशकुलकर्णी's picture

14 Feb 2011 - 11:46 am | अविनाशकुलकर्णी

मस्त....तरुणाई आवतरली