(एका 'बैलाचे' मनोगत (गजल))

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
3 May 2008 - 1:53 am

आमची प्रेरणा अजब यांचे 'एका फुलाचे मनोगत (गजल)'

कधी तरी मी 'फुगलो' होतो, अता जरी मी 'सुकलो' आहे
कधी तरी 'दरवळलो' होतो, अता जरी 'मावळलो' आहे...

गुरगुरणारा 'वारा सरला' तेव्हा माझी कळीच खुलली
हावरून मी खातच सुटलो; सुस्तच आता पडलो आहे...

मला न होते काही वावडे, 'बर्गर' 'पिझ्झा' चाले सगळे
'कोक' पिताना लोक म्हणाले, जिथेतिथे मी सुजलो आहे...

अंग बदलले, पोटच सुटले, 'शेप'हीन मी आता उरलो
विशाल माझा देह पसरुनी मंचकावरी पडलो आहे...

उसंत आली माझ्या नशिबी तीही केवळ काहि क्षणांची
शीतकपाटी 'केक' आठवुन त्यातच मी तरि रमलो आहे!...

चतुरंग

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

3 May 2008 - 1:59 am | इनोबा म्हणे

शिर्षक वाचून कायतरी येगळंच वाटलं ह्वतं..... एका बैलाचे 'मनोगत' :))

मला न होते काही वावडे, 'बर्गर' 'पिझ्झा' चाले सगळे
'कोक' पिताना लोक म्हणाले, जिथेतिथे मी सुजलो आहे...

अंग बदलले, पोटच सुटले, 'शेप'हीन मी आता उरलो
विशाल माझा देह पसरुनी मंचकावरी पडलो आहे...
या ओळी आवडल्या...

(सुकलेला)-इनोबा
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

प्राजु's picture

4 May 2008 - 11:39 am | प्राजु

मला न होते काही वावडे, 'बर्गर' 'पिझ्झा' चाले सगळे
'कोक' पिताना लोक म्हणाले, जिथेतिथे मी सुजलो आहे...

हे एकदम मस्त...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

3 May 2008 - 2:09 am | विसोबा खेचर

अंग बदलले, पोटच सुटले, 'शेप'हीन मी आता उरलो
विशाल माझा देह पसरुनी मंचकावरी पडलो आहे...

मस्त!

बैलाचे 'मनोगत' आवडले रे रंगा! :)

आपला,
तात्याबैल.

ब्रिटिश टिंग्या's picture

3 May 2008 - 2:13 am | ब्रिटिश टिंग्या

गुरगुरणारा 'वारा सरला' तेव्हा माझी कळीच खुलली
हावरून मी खातच सुटलो; सुस्तच आता पडलो आहे...

:D
बाकी इनायकभौ, एका बैलाचे 'मनोगत' हे तर मस्तचं :))

वरदा's picture

3 May 2008 - 3:23 am | वरदा

उसंत आली माझ्या नशिबी तीही केवळ काहि क्षणांची
शीतकपाटी 'केक' आठवुन त्यातच मी तरि रमलो आहे!...

:))
शीतकपाट हा शब्द कसा बरं सुचला असेल? :?

पिवळा डांबिस's picture

3 May 2008 - 4:01 am | पिवळा डांबिस

गुरगुरणारा 'वारा सरला' तेव्हा माझी कळीच खुलली
हावरून मी खातच सुटलो; सुस्तच आता पडलो आहे...

कालच पुरणपोळी आणि वालाचं बिरडं खाल्याने या स्थितीशी एकदम रिलेट करू शकलोय!:))
मस्त विडंबन!

चतुरंग's picture

3 May 2008 - 4:27 am | चतुरंग

अहो, पुरणपोळी + वालाचं बिरडं = आर.डी.एक्स. की हो!! :)) :)) :))

चतुरंग

पिवळा डांबिस's picture

3 May 2008 - 5:25 am | पिवळा डांबिस

:))

केशवसुमार's picture

3 May 2008 - 9:19 am | केशवसुमार

रंगाशेठ :B ,
एकदम झकास विडंबन... =D> =D>
शितकपाट .. :D
चालू द्या...
(3:-O )केशवसुमार
स्वगतः-केश्या तू अता हरी हरी करायला मोकळा

तिमा's picture

3 May 2008 - 5:11 pm | तिमा

वाहव्वा, चतुरंग सायेब, लई म्हन्जे लईच ब्येस. आमचा पण नगाराच झालाय या असल्यापाई!

जयवी's picture

3 May 2008 - 6:21 pm | जयवी

चतुरंग..... एकदम भारी हं :)

मन's picture

3 May 2008 - 6:39 pm | मन

लै भारी..........

:-)
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 May 2008 - 10:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अंग बदलले, पोटच सुटले, 'शेप'हीन मी आता उरलो
विशाल माझा देह पसरुनी मंचकावरी पडलो आहे...

चतुर,
एका 'बैलाचे' मनोगतलै भारी बरं का !!!