जयाच्या रथा एकची चक्र पाहीं।
नसे भूमी आकाश आधार काहीं।
असे सारथी पांगुळा ज्या रथासी।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी।।1।।
हे प्रभाकरा मी सूर्यफूल नाही जे की पराकोटीच्या भक्तीने आपले गोजीरवाणे मुख तुझ्याकडे करून तुझे दर्शन घेते.
हे कमलिनीनाथा मी कोमल कमलिनीदेखील नाही जी की तू उगवताक्षणी पाकळ्यारूपी बाहू फैलावून सस्मितवदनाने तुझे स्वागत करते.
हे हिरण्यगर्भा मी इवलीशी पणती नाही जी तुझ्याकडुनच तेजाचा अंश घेऊन जगाला तेजाचा संदेश देते.
हे दिनकरा किंवा मी कोणी ऋषीमुनीदेखील नाही की तुला मी अर्घ्य देऊ शकेन.
हे तेजोनिधये फार काय माझे आणि तुझे विपरीत भक्तीचे नातेसुद्धा नाही जे तुझे अंधःकाराबरोबर आहे. ज्याचे अस्तित्व केवळ तुझ्या आगमनाने मिटून, विरून जाते.
मी तर केवळ एक क्षुद्र मानव आहे.
पण मला एवढे माहीत आहे की मी रोज पहाटेतुझ्या आगमनाची अत्यंत आतुरतेने वाट पहाते.
क्षितीजावरील केशरी , लसलसते,कोवळे सूर्यबिंब माझ्या मनात अनामिक उल्हासाची लहर जागवते.
सर्वांगसुंदरा, तुझ्या तेजस्वी दर्शनाने माझ्या कणाकणात चैतन्याचा तेजोमय वर्षाव होतो.
हे भास्करा, तुझ्यामुळे माझ्या रोमरोमात निरामय उत्साह सळसळतो.
मी रोज नव्याने, तितक्याच नवलाईने तुझी वाट पहाते.
असे म्हणतात की तुझ्यापासून काही लपत नाही. तू सर्व सत्कर्मांचा अधिष्ठाता आहेस, तू सर्वसाक्षी आहेस.
हे सकलेश्वरा, भास्करा माझे मन जाणून घे, माझा प्रणाम स्वीकार कर.
प्रतिक्रिया
8 Feb 2011 - 1:36 am | शुचि
पहील्या ४ पद्य ओळी या पारंपारीक सूर्यस्तुतीच्या आहेत.
8 Feb 2011 - 2:04 am | प्राजु
छान लिहिले आहेस.
कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम्, प्रभाते कर दर्शनम्। ।
या श्लोकाची आठवण झाली.
8 Feb 2011 - 2:41 am | वडिल
खुपच छान.
मनापासुन लिहिलं आहे असे वाटते आहे. शाळेतल्या प्रार्थनेची आठवण झाली आणि डोळे पाणावले. ( खरोखरी.. मिपा स्टाइल पाणावले नाहित !)
अस्तोर्मा ज्योतिर्गमयः मृत्योर्मा अमृतं गमय !
( ऑप्टिमीझम, यर्निंग, विरह, व्याकुळता... असले सगळे रस काहि वाक्यात मस्त उतरवलेत)
8 Feb 2011 - 9:13 am | सुनील
अस्तोर्मा ज्योतिर्गमयः मृत्योर्मा अमृतं गमय !
माझ्या आठवणीप्रमाणे हा श्लोक असा आहे -
असतो मा सत् गमय
तमसो मा ज्योतिर्गमय
मृत्योर्मा अमृतम् गमय
बाकी लेख ठीक!
9 Feb 2011 - 5:41 am | वडिल
सुनील,
तुमचं बरोबर आहे.
8 Feb 2011 - 6:39 am | सहज
फक्त सुर्यप्रकाशावर जगणार्या श्री श्री श्री हिरा रतन माणेकजी यांची आठवण झाली.
8 Feb 2011 - 8:43 am | मनिम्याऊ
वाह शुचिताई,
आम्ही लहानपणी रोज सकाळी सुर्यनमस्कार घालतना आजोबांच्या पाठोपाठ हा श्लोक म्हणत असू...
तसेच एक संस्कृत शोल्क पण म्हणायचो,
आदित्यस्य नमस्कारम ये कुर्वन्ति दिने दिने
जन्मांतरः सहस्रेषु दारिद्र्यम लोप जायते
अकालमृत्युहरणम सर्वव्याधीविनाशनम
सूर्यपादोदकम्तीर्थम जठरे धारयम्यहम...
आज बर्याच वर्षांनंतर या धाग्यामुळे आठवण झाली...
8 Feb 2011 - 6:25 pm | सूर्यपुत्र
दिर्घमायुर्बलंविर्यं तेजस्तेषां च जायते
अशी आम्ही म्हणतो....
-सूर्यपुत्र.
8 Feb 2011 - 11:09 am | अवलिया
मस्तच !
वाल्मिकी रामायणातील आदित्य हृदय स्तोत्र पण छान आहे... इथे वाचायला मिळेल
8 Feb 2011 - 1:18 pm | ५० फक्त
आम्ही तर फक्त सुर्यनारायण हा एकच या पुर्ण जगाचा उर्जा स्त्रोत आहे हे मानतो, त्यामुळे या माहिती साठी अतिशय धन्यवाद.
हर्षद.
8 Feb 2011 - 2:04 pm | गणेशा
मस्त लिहिले आहे...
विशेष करुन ही ओळ जास्त मनात घर करुन गेली..
क्षितीजावरील केशरी , लसलसते,कोवळे सूर्यबिंब माझ्या मनात अनामिक उल्हासाची लहर जागवते.
छान लिहिले आहे... रसग्रहन ही येवुद्या असेच श्लोकांचे
8 Feb 2011 - 3:51 pm | डावखुरा
शुचि तै बर्याच दिवसांनी छान हलका फुलका लेख....रुपाने उगवल्या मिपावर...
छान लिहिले आहे... रसग्रहण ही येवुद्या असेच श्लोकांचे
असेच म्हणतो...
8 Feb 2011 - 4:03 pm | अमोल केळकर
सुंदर श्लोक
अमोल केळकर
8 Feb 2011 - 7:39 pm | नरेशकुमार
छान आहे.
8 Feb 2011 - 8:03 pm | मराठे
सुंदर प्रार्थना... मला उगवणार्या सूर्याच्या दर्शनाइतकेच मावळणार्या सुर्याचे दर्शन सुद्धा आवडते...
आणि 'मावळत्या दिनकरा...' आपोआप मनात उमटतं.
6 Feb 2013 - 2:10 am | शुचि
माझा हा लेख मी कुठेही सेव्ह केला नसल्याने मला वाईट वाटत होते. पण आता सर्व लेख पूर्ववत दिसत आहेत त्याबद्दल मिपा तंत्रज्ञ, सल्लागार व व्यवस्थापनाची आभारी आहे. :)
6 Feb 2013 - 2:58 am | विकास
"रात्र झाली तरी सूर्य कुठेच गेलेला नसतो, आपल्याला तसे वाटते." :-)
6 Feb 2013 - 5:07 am | स्पंदना
आज ३७ डिग्रीज असणार आहे इथे. त्यात तुझा सुर्यनारायणावरचा लेख! अक्षरशः शरण जायची वेळ आलेय सुर्याला.
असो!
शुची लेखन आवडल. फारच सुंदर शब्द योजना!
6 Feb 2013 - 11:07 am | परिकथेतील राजकुमार
सहमत आहे.
इकडे तर सहा महिनेच सूर्य दिसतो फक्त. सहा महिने अंधार.
6 Feb 2013 - 12:22 pm | बॅटमॅन
ऐला म्हंजे तुम्ही आर्यांच्या मूळस्थानात राहतां की कांञ???
6 Feb 2013 - 12:27 pm | कवितानागेश
तो टोटल दिवस आणि टोटल रात्रींबद्दल बोलतोय.
काय भौराया? काई कळंना हल्ली तुमास्नी... :)
6 Feb 2013 - 12:45 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
अतिशय सुंदर आणि ओघवते लिखाण.