चांदण्यारात्री गवताच्या पात्यावरच्या दवाबिंदुला फुंकर मारून त्या ओघळणार्या मोत्यांना पाहताना...
वार्याच्या खोड्यांमुळे नदीच्या हलणाऱ्या चंदेरी पदराला पाहून...
पहाटेच्या गार वार्यात कासेला बिलगून पच पच आवाज करून दुध पिताना वासराला पाहून...
मंदिराच्या धुपाने भरलेल्या गाभार्यात घंटानादात मंद तेवणाऱ्या सामायीला पाहून...
सांजवेळी वाळूत हळुवारपणे पावलांना शिवून परत मागे पळून जाणार्या अल्लड लाटांना पाहून...
एखाद्या तेजोवालायाधारी तपास्वीसारखा स्वतःच्या द्वैताची आहुती देऊन अद्वैत दिनकरला सागरात विलीन होताना साक्ष देताना...
वाटतं आयुष्य इथेच थांबावं...
प्रतिक्रिया
6 Feb 2011 - 10:00 pm | निवेदिता-ताई
मस्त ..
7 Feb 2011 - 5:19 pm | ज्ञानराम
सुंदर...
7 Feb 2011 - 5:30 pm | गणेशा
शब्द .. विशेषने खुपच जबरदस्त ... एकदम छान वाटले वाचुन ..
मस्त लिहिले आहे, मांडनी मध्ये अजुन थोडा प्रयत्न करता येइल ..
बाकी शब्द न शब्द मस्त
8 Feb 2011 - 10:49 am | कच्ची कैरी
कविता खूपच छान आहे पण अजुन थोडी मोठी हवी होती असो पण मस्त!
8 Feb 2011 - 1:48 pm | टारझन
ओ काकु .. ती कविता आहे ... फसवणुक प्रकरण -२३वे नाही ... भले मोठे असायला ..
8 Feb 2011 - 7:51 pm | नरेशकुमार
कविता छान !
वाटतं, आयुष्य इथुन सुरु व्हावं
8 Feb 2011 - 8:27 pm | विजुभाऊ
कवितेच्या एकेका ओळीत एकेक कविता बनेल