अन्तर्यात्रा

मूकवाचक's picture
मूकवाचक in जे न देखे रवी...
4 Feb 2011 - 8:43 pm

ओवीबद्ध अनुवाद:

हृदयकुहरीच्या| गाभार्यात साच|
ब्रह्म एकलेच| प्रकाशते||

आत्मस्फुरणेने | सनातन सत्य|
'मी' 'मी' असे नित्य| प्रत्यया ये||

कोहम शोध घेता| मन हो विलीन|
ईशपदी लीन| हृदयांतरी||

रोधुनिया प्राण| होई आत्मनिष्ठ|
बाकी इष्टानिष्ट| नसे काही||

मूळ श्लोक:
हृदयकुहरमध्ये केवलं ब्रह्ममात्रं
ह्यहमहमिती साक्षादात्मरूपेण भाती
हृदिविशमनसा स्वम चिन्वता मज्जता वा
पवनचलनरोधात आत्मनिष्ठो भवत्वं

- भगवान रमण महर्षी

शांतरसधर्म

प्रतिक्रिया

स्वानन्द's picture

4 Feb 2011 - 9:17 pm | स्वानन्द

धन्यवाद.

विलासराव's picture

4 Feb 2011 - 9:27 pm | विलासराव

+१
>>>>>>>>स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!
त्रिकालाबाधीत सत्य.

आपल्या ब्लॉगवर रमण महर्षींचा हा श्लोक वाचला होता.
अनुवाद फार सुरेख जमला आहे.
प्राण म्हणजेच पवन असा अर्थ येथे होतो काय?

मूकवाचक's picture

4 Feb 2011 - 11:44 pm | मूकवाचक

इथे तसाच अर्थ होतो. अनुदिनीवर सविस्तर लिहीले आहे.

प्रतिसाद देणार्या सर्वाना धन्यवाद.

(एका ख. व. मधील एक सुरेख वाक्य वाचून सुचलेल्या ओव्या)

सहज प्रासादिक| भक्ताची प्रवृत्ती|
वृत्ती ची "निवृत्ती"| तेणे साध्य||

केले गंगार्पण| वृत्तीचे निर्माल्य|
उरले कैवल्य| "ज्ञानदेव"|

अमला भक्तीने| चित्ती समाधान|
ज्ञानाचा "सोपान"| प्रकटला||

ज्ञानाच्या उजेडी| मायेचा अंधार|
लोपला साचार| तीच "मुक्ती"||

साष्टांग नमन माऊलि.

नि:शब्द.

अवलिया's picture

5 Feb 2011 - 8:26 am | अवलिया

सुरेख !

खरे सांगतो, श्लोक अजिबात झेपला नाही!

तू लिहिलेला अनुवाद मात्र नीट समजला..
हृदयांतरी हे जास्त महत्त्वाचे! शीर्षक समर्पक आहे अनुवादाला!! :)

राघव

टारझन's picture

12 Feb 2011 - 1:07 am | टारझन

कशाबरोबर खायचं हे ?

- बुकवाचक