कसे दिवस मस्त होते ...!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
1 Feb 2011 - 7:03 pm

कशे दिवस मस्त होते
तारुण्याचे , गाभूळ्लेले
व्यायामाचे ,
योगाचे ...!!
कवितेचे, स्वप्नाचे ,
प्रेमाचे दिवस होते
घराला घरपण होते
घर म्हणजे श्रीखंड होते
आंबट चिंबट चवदार होते
सगळे कसे मस्त होते

तशात ती आली
गोरी नव्हती काळी नव्हती
मधला असा रंग होतां
असा रंग असा रंग
डंख मारून पसार झाला

जाड नव्हती ,लुकडी नव्हती
गाभुळलेली मस्त होती
अशी चव- तशी चव
कधीसुद्धा माहित नव्हती
गळ्यात चेन
कानात रिंग
केसात गजरा
आणि असे मस्त गाणे
वातावरण भारून गेले

छानच होती
मस्त होती
सुंदर अशी गझल होती
गीत होते
सूर होते

सास तेरी मदिर मदिर
जैसे रजनी गंधा .....

अशे मस्त... अशे मस्त
सुंदर ,भन्नाट
गीत होती
पुढे काय ..?
आज देखील म्हणतो आहे
दिवस कसे मस्त होते .....

आठवणीची पाखरे
कधीतरी येऊन बसतात
मनाच्या फांदीवर
छान झुलत झुलत
मस्त शिळ घालून जातात ......!

शृंगारकविता

प्रतिक्रिया

कच्ची कैरी's picture

1 Feb 2011 - 7:16 pm | कच्ची कैरी

तुमच्या मनाच्या फांदीवर सध्या आठवणींचे पाखरु फारच गर्दी करायला लागले आहेत (गुस्ताकी माफ)
बाकि कविता नेहमीसारखीच मस्त हं!

गझल .. गीत .. सूर अश्या उपमा खुप छान वाटल्या ..
कविता तेंव्हाही आवडली होती आता ही आवडली आहेच..

आणि
अशीच एक अधुरी कविता पुर्ण करायला उमेद मिळाली आहेच.

पाषाणभेद's picture

2 Feb 2011 - 10:04 am | पाषाणभेद

प्रकाशकाका जुने दिवस आठवले. एकदम रापचिक

निवेदिता-ताई's picture

2 Feb 2011 - 3:06 pm | निवेदिता-ताई

छान आहे